मिपा संपादकीय - "...रे भय्या छूटे लगान!"
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
...रे भय्या छूटे लगान!
जगातल्या सगळ्याच समाजांचे स्वत:चे असे मानबिंदू, मिथके आणि प्रतीके असतात. काही परंपरेने दिलेली - काही त्या समाजाने स्वत: कळत-नकळत विकसित केलेली. या प्रतीकांमध्ये त्या समाजाच्या भूत-वर्तमान-भविष्याचा आरसा असतो. जोवर हे आरसे स्पंदनशील आणि प्रवाही असतात, तोवर त्या समाजाची अस्मिता अभंग असते. मला माहीत आहे, हिंदी चित्रपट या गोष्टीला जर मी या पंगतीत नेऊन बसवले, तर बहुतांश लोक तत्काळ मला वेड्यात काढतील. पण मी तो धोका नि:संदिग्धपणे पत्करणार आहे. उण्यापुऱ्या शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या, हॉलिवुड या नावासकट अनेक गोष्टींची भ्रष्ट नक्कल करणाऱ्या, नाचगाणी आणि झगमगाटात धन्यता मानणाऱ्या एका थिल्लर उद्योगाने कळत-नकळत इतके मोठे श्रेय मिळवण्याचे कारण काय असा प्रश्न अपरिहार्य आहे.
पण कारणे आहेत आणि ती महत्त्वाची आहेत.
विश्वीकरणाच्या महाप्रवाहात जगभरातले सगळे मनोरंजन उद्योग अमेरिकी चित्रपट उद्योगाने गिळंकृत केले. पण बॉलिवुड मात्र मृतप्राय झाले नाही. त्याच्या आर्थिक ताकदीला तर धक्का लागला नाहीच. पण खरे महत्त्वाचे म्हणजे त्याच्या गाभ्यात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीला हा महाप्रवाह गिळंकृत करू शकला नाही. परकीय शैलीच्या स्वत्त्वहीन विनाकारण नकला अर्थातच बेसुमार झाल्या. पण या मातीची शैली असणाऱ्या दिग्दर्शकांचा एक प्रवाह सुदैवाने कायम जिवंत राहिला. मेलोड्रामा आणि नाचगाणी या उच्चभ्रू वर्गाने नाक मुरडलेल्या गोष्टी या प्रवाहाने आपले भूषण म्हणून मिरवल्या. शस्त्र म्हणून वापरल्या. ओळख म्हणून जिवंत ठेवल्या. प्रयोगशीलतेचे कुंपण होणारी एक चौकट या शैलीमुळे निर्माण झालीच, नाही असे नाही. पण वेळोवेळी ती गरजेप्रमाणे मोडून-घडवून घेत तिचा लवचीकपणा अभंग राखला गेला. यात कलावंतांचे श्रेय होते, तसेच आपली पसंती नि:संदिग्धपणे दाखवून देणाऱ्या भारतीय प्रेक्षकांचेही होते. बॉलिवुडने हॉलिवुडच्या वेगवान हाताळणीला, तांत्रिक झगमगाटाला आपलेसे केले, पचवले आणि चक्क एक ढेकर दिली.
अनेकानेक भाषा-बोली, रूढी-परंपरा, संस्कृती असणाऱ्या या विस्तीर्ण प्रदेशात संस्कृतीचे एक काहीसे बेगडी पण प्रातिनिधिक भावले उभे करण्याचे श्रेयही बॉलिवुडला जाते. मॉंग में सिंदूर आणि करवा चौथ या मूळच्या उत्तर भारतीय असलेल्या संज्ञा आता भारतभर ओळखल्या जातात त्याचे मूळ हिंदी चित्रपटांत आहे. आपल्याला आवडो वा न आवडो, हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे. आपली स्वत:ची अशी परिभाषा निर्माण करणे हे एका सशक्त अस्तित्वाचे लक्षण असते. ज्यांची कुठलीही स्पष्टीकरणे द्यावी लागत नाहीत अशा स्वयंपूर्ण संकल्पना अशा परिभाषेतून निर्माण होतात. अनारकली, मदर इंडिया, गब्बरसिंग, मुगल-ए-आझम, देवदास यांसारख्या आता स्वयंभू झालेल्या व्यक्तिरेखा आणि नवे अन्वयार्थ लावण्यासाठी एखाद्या पौराणिक व्यक्तिरेखेसारखाच होणारा त्यांचा वापर नेमके हेच बलस्थान दर्शवतो. एखादी संस्कृती आपल्या आविष्कारासाठी जेव्हा परकीय प्रतिमांचा वापर करते, तेव्हा त्या वापरात तिच्या विनाशाची बीजे दडलेली असतात असे म्हटले जाते. कुठल्याही अभिनिवेशावाचून हा वापर सहजगत्या टाळणाऱ्या आणि स्वत:ची प्रतिमासृष्टी रचणाऱ्या हिंदी चित्रपटांनी त्यांच्याही नकळत आपली मुळे या जमिनीत घट्ट रुजवत नेली. आपल्याच दैवतांची मनमुराद खिल्ली उडवण्याची या भूमीची निरोगी परंपरा आत्मसात करत त्यांनी अनेकवार आपल्याला निर्भीडपणे आरसा दाखवला. देशीवादाचा तो एक देखणा आविष्कार होता, हे त्यांच्या कधी लक्षातही आले नसेल!
कलाविष्काराच्या व्यावसायिक अंगाला अनेकवार उच्चभ्रूंच्या उपहासाला सामोरे जावे लागते. हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाला हा उपहास कधीच चुकलेला नाही. पण खरे पाहता प्रयोगशील शाखा आणि व्यावसायिक अंगे ही अनेक अर्थांनी परस्परांच्या अस्तित्वाला पूरक असतात. उदाहरणादाखल एक किस्सा मुद्दामहून ऐकण्यासारखा आहे. अतुल कुलकर्णी हा मराठी रंगकर्मी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये असतानाची गोष्ट. ’अमुक एका नाटकाचा मंगळवारी दुपारी प्रयोग आहे’ असे काहीसे तो एका व्यावसायिक मराठी नाटकासंदर्भात म्हणाला. ते ऐकून एका अमराठी रंगकर्मीने बुचकळ्यात पडून त्याला विचारले, 'मंगळवारी दुपारी? आठवड्यातल्या मधल्याच वारी, तोही दुपारी? व्यावसायिक? कोण येते तो पाहायला?' त्यावर अतुलने त्याला प्रयासाने आणि अभिमानाने समजावून सांगितले की 'आमच्या व्यावसायिक रंगभूमीवर असे अधल्यामधल्या दिवशीही प्रयोग होतात आणि त्याचा खर्च परत मिळवून फायदाही मिळण्याइतके प्रेक्षक त्याला असतात.' ही व्यावसायिक रंगभूमीची सशक्त अवस्थाच नवनवीन प्रयोगांना बळ देत असते आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन नवी परंपरा रचत जात असते, हे वास्तव आहे. नेमके हेच समीकरण हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहालाही लागू होते. त्यांचे आर्थिक सामर्थ्य आणि त्यांची निर्विवाद लोकप्रियता ही त्यांच्या मजबूत पायाची महत्त्वाची कारणे आहेत. ती नसती, तर प्रयोगशील बंडखोरीचा गळा आवळला जाण्याला फारसा वेळ लागला नसता, हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.
असे म्हटले जाते, की विश्वीकरणाच्या प्रवाहात जगभरातल्या सगळ्याच संस्कृतींचे सपाटीकरण होत जाईल. भाषा, कलाविष्कार, जीवनशैली या साऱ्या अंगांवर एकाच बलवान संस्कृतीची एकसुरी छाप उमटत जाईल. सगळे जग एकसारखे होत जाईल. हा अनेक संस्कृतींच्या अपरिहार्य मरणाचा कालखंड आहे.
अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे. अनेक क्षेत्रांनी त्यांचा हा धडा गिरवला, तर आपल्याला आपल्या मरत्या संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचे काहीच कारण उरणार नाही.
पाहुणी संपादक : मेघना भुस्कुटे.
वाचने
16751
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
अशा
खरंच की
In reply to खरंच की by प्रकाश घाटपांडे
गंमत आहे
बिलकुल नाही!
थीम आवडली ..पण......
In reply to थीम आवडली ..पण...... by अभिज्ञ
अजून मोठा
प्लीज
बॉलिवुडने
मस्त
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
प्रतिसाद आवडला...
In reply to प्रतिसाद आवडला... by मनिष
केलॉग्स
In reply to प्रतिसाद आवडला... by मनिष
अमेरिकन
In reply to अमेरिकन by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपले
In reply to अमेरिकन by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते माहिती आहेच!
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
सहमत!
वा..
एका दृष्टीने -
In reply to एका दृष्टीने - by विसुनाना
सहमत आहे
जगभरातल्य
In reply to जगभरातल्य by विसोबा खेचर
अप्रतिम हि॑दी स॑गीत
तात्या
छान अग्रलेख!
प्रतिक्रिया
इकडे चायना
In reply to इकडे चायना by अनिल हटेला
हॉलिवुडमध
In reply to हॉलिवुडमध by विसोबा खेचर
हा हा हा
In reply to हा हा हा by सहज
:)
In reply to :) by विसोबा खेचर
तेच तर
In reply to इकडे चायना by अनिल हटेला
अगदी सहमत..
In reply to अगदी सहमत.. by भाग्यश्री
अकॉर्डियन ?
In reply to अकॉर्डियन ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ह्म्म..
In reply to अकॉर्डियन ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अमर
मला एक
हिन्दि चित्रपट संगीत
अनेक
अग्रलेखाम
- वास्तवीक संस्कृती म्हणून म्हणालच तर भारतीय चित्रपटसृष्टीची सुरवात करणार्या सुरवातीच्या मराठी (आणि कधी चालू झाले ते माहीत नाहीत पण बंगाली देखील) चित्रपटात "कॉपिकॅट" प्रकार कमी दिसून येतो. प्रभातचे कुंकू , शेजारी आणि माणूस सारखे चित्रपट तर सरळ सरळ सामाजीक होते. पण "संत ज्ञानेश्वर" सारखा चित्रपट पण सामाजीक जाणीव करून देणारा, लोकशिक्षण देणारा होता असे आता पाहील्यावर वाटते... ते करत असताना मूळ मातीशी इमान सोडले नव्हते. पण जे काही दाखवले ते तत्कालीन समाजाला शिकवण्यासाठी मांडले तत्कालीन समाजाचे चित्रपटातील रूप म्हणून मांडले नाही. अर्थात मी नंतरच्या मराठी चित्रपटांबद्दल बोलत नाही. नाही म्हणायला "वोरीजीनल" बोलपट काढून जनसामान्यात (केवळ बुद्धीवाद्यांत नाही) यशस्वी करणारा असामी कलावंत म्हणजे - दादा कोंडके!
- या उलट पुर्वीच्या काळातील गुरूदत्त, राज कपूरचे जुने चित्रपट आणि नंतर अर्थातच स्मीता पाटील, शबाना आझमी सारख्या असामान्य नट्यांचे कलात्मक चित्रपट सोडल्यास काय दिसते? - तर जे समाजात आहे, अथवा होवू घातले आहे त्याचे प्रतिबिंब.
- मला हे चित्रपट आवडतात आणि पुन्हा पुन्हा पाहू शकतो, पण विश्लेषण म्हणून विचार करा - शोले: पेड प्रायव्हेट आर्मी... , दिवार - समाजातील गुंडगिरीचे अप्रत्यक्ष उदात्तीकरण (ऐकीव माहीतीप्रमाणे तो चित्रपट हाजी मस्तान वर आहे), मग अनेक चित्रपट हे निव्वळ हॉलीवूडची कॉपी होऊ लागले. बप्पी लेहरी आला आणि फ्रिक्वंट फ्लायर माइल्सचा उपयोग करत जगभर हिंडून संगीत चोरू लागला...बर्याचदा (अर्थात त्यातपण अपवाद आहेतच), जे काही नाच दिसू लागले ते पहाताना "सर्वांग हिडीस व्यायाम" असे वर्णन योग्य वाटण्यासारखे झाले. (उ.दा. म्हणून साध्या पोषाखात पण एखादा पाश्चात्य पद्धतीचा नाच चांगला कसा वाटू शकतो हे गीता बालीने इतके चांगले दाखवले तरी ... )
- मग याला संस्कृती कसे म्हणायचे?
तरी देखील एक गोष्ट राहून राहून वाटते - की लता-आशा-किशोर-रफी-मुकेश आणि मग इतर अनेक यांच्या प्रसिद्ध हिंदी गाण्यांचा एक परीणाम नक्की झाला दक्षिणेत पण हिंदी विरोध काही अंशी हळू हळू कमी होवू लागला...अजून एक प्रतिसाद..
In reply to अजून एक प्रतिसाद.. by अभिज्ञ
अभिज्ञराव,
मेघना ताई..
छान अग्रलेख !!!
अग्रलेख आवडला
In reply to अग्रलेख आवडला by ऋषिकेश
सहमत आहे
वेगळे विचार
पटले
प्रतिसादा
अग्रलेख
माझी फिल्लमबाजी...
थोडक्यात
मेघना,
राष्ट्र जोडण्याचे सामर्थ्य आणि क्षमता...