Skip to main content

गुरु पौर्णिमा

लेखक jaypal यांनी मंगळवार, 03/07/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसको लागुं पाय । बलिहारी गुरु आपने, गोविंद दिया बताय ॥" गुरु पौर्णिमेचा हा धागा माझ्या आयुष्यात आलेल्या तमाम गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणुन समर्पीत. मला असंख्य गुरु लाभले पैकी १) माझे वडील , २) माझा मित्र/गुरु सर्वकाही आणि ३) माझे ज्युडोचे शिक्षक यांचा माझ्या आयुष्यावरील प्रभाव मला वाटत मी जिवंत असे पर्यंत कायम राहणार. त्यांच्या शिकवणींची परतफेड कोणत्याही रुपाने या जन्मी शक्य नाही. १) वडिलांकडुन या व्यवहारी जगात व्यवहारी राहुनही परोपकारी कस जगाव हे शिकलो. आशावाद,प्रचंड मेहनत, लिनता, व्यवहार चातुर्य, आणि मिठे बोल बडे अनमोल हे बाबां कडुन शिकायला मिळाल. २) माझा मित्र/गुरु = हा माझ्या मोठ्या भावाचा मित्र माझ्या पेक्षा ६/७ वर्षांनी मोठा. माझ्या वयाच्या १५/१६ दर्म्यान हा माझ्या आयुष्यात आला. हा स्नेह आज तागायत टिकुन आहे. आयुष्याच्या एका खडतर टप्प्यावर घरच्यांनी देखिल पाठ फिरवली असताना या माणसाने मला पुन्हा उभे केले आणि थकलेल्या, मरगळलेल्या, निराश पंखांवर आशेची जादुई फु़ंकर मारली. जबरदस्त प्रेक्टीकल आणि आशावादी माणुस. थोडं जरी नैराश्य आल तर मी याच्याशी केवळ गप्पा मारल्याने अथवा सहवासात राहील्याने चार्ज होतो. ३) जुदो सेन्सई (गुरु)= जुदो बरोबर, झेनची तोंड ओळख यानेच करुन दिली. हा देखिल जबरदस्त प्रेक्टीकल आणि आशावादी माणुस. या तिघांच्यात एकच साम्य आहे आणि ते म्हणजे "जबरद्स्त आशावाद" आपल्या गुरंविषयीच्या आठवणिंना तुम्ही पण उजाळा द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2358
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by कुंदन

सांगुन आम्हाला पण शहाण करावे हि विनंती. तुम्हाला असे अनुभव उपल्ब्ध करुन देणा-यांना गुरुच म्हटले पाहीजे. त्यांना माझा दंडवत.

अनुभव हा आपल्या मेंदूत साठवला जातो आणि पुढच्या वेळी आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतो तो आपलाच मेंदू! म्हणून तोच आमचा गुरु.