Skip to main content

तातडीने मदत हवी आहे

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 29/06/2012 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
मला टाटाडोकोमोच्या सेवेतील त्रुटीची तक्रार करायची आहे. माझा प्रीपेड मोबाइल क्रमांक मी १४ मे २०१२ ला आयडिया मधून टाटाडोकोमो मध्ये MNP द्वारे वाहून नेला. त्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता करूनही मी उत्तर भारतात गेलेलो असताना माझी सेवा २२ जून २०१२ ला अपूर्ण कागदपत्रांचे कारण देऊन बंद करण्यात आली. यासंदर्भात मी listen@tatadocomo.com आणि appellate.ap@tatadocomo.com यांना याआधी मेल लिहिले पण काही उपयोग झाला नाही. मोबाइल कंपन्यांच्या वाईट सेवांबद्धल यापूर्वी झालेली चर्चा वाचल्याचे स्मरते पण नेमका दुवा मिळत नाहीय. मला खालील बाबींवर तातडीने मदत/ माहिती हवी आहे.
  1. संबंधित कंपनीने समस्या सोडवली नाही तर पुढे कोणाकडे तक्रार करावी?
  2. ट्राय (TRAI) किंवा इतर सरकारी संस्था कितपत सक्षम आहेत?
  3. ग्राहक न्यायालयात जावे का?
  4. संबंधित दुवे आणि विरोपाचे पत्ते
  5. इतर उपयुक्त माहिती
आंध्रप्रदेश टाटाडोकोमोमध्ये कुणी सेवेत असल्यास मदत होईल का? -वामन देशमुख, हैदराबाद

वाचने 2744
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

प्रत्येक मोबाइल कंपनीत त्या त्या राज्यासाठी एक नोडल ऑफीसर नेमलेला असतो. मी स्वतः idea व airtel च्या नोडल ऑफीसरशी संपर्क साधलेला आहे व माझ्या समस्येचे निराकरण सुद्धा केले गेले. खालील दुव्यावर आंध्राच्या डॉकोमो नोडल ऑफीसरची माहिती मिळेल. http://www.tatadocomo.com/downloads/Nodal-team.pdf अमृत

लेखाचे शीर्षक अत्यंत चुकीचे आहे.. फोन बंद पडला यात कसली आली आहे तातडी? मला वाटले , कोणाला रक्त वगैरे हवे आहे की काय ? असली दिशाभूल करणारी शीर्षके देऊ नयेत ... नुसती "मदत हवी आहे "असे म्हटले असते तरी चालले असते ना ?

In reply to by विटेकर

सहमत ... ( मी ही घाबरतच हा धागा उघडला :( )

In reply to by विटेकर

+१ लेखाचे शीर्षक अत्यंत चुकीचे आहे.. असली दिशाभूल करणारी शीर्षके देऊ नयेत ...

अमृत आणि इतरांचे आभार. माझ्या फोनची सेवा आठ दिवसांनंतर आज सुरु झाली आहे. appellate.ap@tatadocomo.com येथील अधिकाऱ्यांनी मला मदत केली. संपादकांनी हा धागा उडविल्यास माझी हरकत नाही.

In reply to by वामन देशमुख

माझे काम झाले आहे. श्री. विटेकरांच्या प्रतिक्रियेवर भाष्य कशाला करायचे? त्यामुळेच, संपादकांनी हा धागा उडविल्यास हरकत नाही.