हे कसे? ते कसे? विचारू नकोस
जे बोलले जात नाही त्या ठिकाणी
एखादे वारूळ आहे...
समज अपसमजाच्या कवड्या घेऊन खेळलेले हे डाव
पोहताना, नदीचे विशाल पात्र चिरायची जिद्द घेऊन हात चालवत नव्हतो.
मासे जगतात तसा जगायचा प्रयत्नही नव्हता...
केवळ कसल्याशा फाटकेपणाला
आकांताने टाके घालत होतो.
शब्दावर वजन देऊन बसलो आहे.
तू येतेस तेव्हा फडफड होते
मग तू पंख देतेस नेहमीच
हे वजन त्यांच्या मानेवर जाड झालेलं आभाळ आहे
एकमेकापासून काहीतरी चोरताना
आपण एकमेकात रुतत गेलो की रुजत?
ही फुले वितळून गेली आहेत...
दिवस पिळून काळा रस सगळी कडे उतरला आहे...
चित्रावती नंतर हातांना कालवण्यासाठी
तू शरीर वाढवून, सजवून ठेवले आहेस.
मचामचा जेवणाऱ्या अनेक क्षणांची पंगत कर्कशं आहे.
माझ्या गावात समुद्र नाही.
तुला सामावून उसळण्या इतकी माझी खोली नाही.
ह्या कागदावर उन्हाळ्यातील वाळवणासारखी
पसरवून ठेवली आहेत अटीतटीची सारी द्वंद्वे
खोली आवरतेस तसे एकदा माझे सारे रकाने स्वतःपुढे धर
तुझा स्पर्श झालेले सारे शुभ्र होते...
ओझे होते कसे म्हणू?
तुझी काळी सावली विणायची खूप इच्छा आहे..
हे कसे? ते कसे? विचारू नकोस!
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1391
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे (असे) कसे...?
वा सुंदर कविता (?).. हे कसे
मेलो...मेलो... म.मो... अता
In reply to वा सुंदर कविता (?).. हे कसे by मराठमोळा
ह.ह.ग.लो.
In reply to वा सुंदर कविता (?).. हे कसे by मराठमोळा
ख्खिक्क!! _/\_
In reply to वा सुंदर कविता (?).. हे कसे by मराठमोळा
जबरदस्त....
In reply to वा सुंदर कविता (?).. हे कसे by मराठमोळा