भरलेली खानदेशी मिरची
णमस्कार्स लोक्स (एका जुन्या मित्राची आठवण झाली)
ही पाकृ माझ्या आजीने सांगितलेली आहे. तिच्या हातच्या जेवणाची फार आठवण होत होती म्हणून रेसेपी मागवुन घेतली आणि ती तुम्हालाही सांगावी असे वाटले.. एकदा नक्की करुन पहा. :) घ्या मग साहित्य
काही लोकांनी ;) साहित्यापासून सगळं निगुतीने करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे, तो पेशंस माझ्यात नाही म्हणून डायरेक्ट शेवटचाच फोटु टाकणार आहे.
साहित्य
४-५ खानदेशी किंवा जाड/ मोठ्या मिरच्या ही मिरची कमी तिखट असते. जास्त खाल्ली तरी त्रास होणार नाही :)
उसात पण मिळतील.
कपभर शेंगदाणे
२-३ लसूण पाकळ्या
जिरे पावडर - २ छोटा चमचा
धने पावडर - २ छोटे चमचे
हिंग - अर्धा छोटा चमचा
हळद - १ छोटा चमचा
चवीपुरते मीठ
कृती
१. मिरचीचे साल खुप जाड असेल तर तव्यावर तेलाचा वापर न करता थोड्या भाजून घ्याव्यात.
२. मिरचीला एका बाजुने मधुन उभी चिरुन त्यातील बिया काढून टाका आणि थोडं मीठ लावून ठेवुन द्या १५-२० मिनिटे
३. शेंगदाणे भाजून घ्या. मिक्सर मधे किंवा खलबत्त्यात शेंगदाणे, हळद, जिरे पावडर, हिंग, मीठ, धने पावडर आणि लसूण चांगले बारीक करुन घ्या. तव्यावर थोडं तेल घालून ह्या मिश्रणाचा गोळा करुन घ्या. किंवा मिश्रणात गरम तेल घाला. लगदा होईलसे बनवा.
४. हे मिश्रण मिरचीत व्यवस्थित भरुन घ्या.
५. तवा गरम करुन त्यावर थोडेसे तेल घाला.
६. ज्या बाजुने मसाला भरला आहे ती बाजू तव्याला लागेल अशा पद्धतीने ठेवा.
७. मसाला लालसर झाल्यानंतर मिरचीची बाजु बदला.
८. थोडा वेळ परता. आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला ही मिरची घ्या.
टीपः ही पाककृती अंडे घालुन करता येते की नाही माहित नाही कारण मी अंडे घालत नाही. जे मिपाकर अंडे घालतात त्यांच्याशी सम्पर्क साधावा. धन्यवाद.
वाचने
11427
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
व्वा!!
नक्की
व्वा व्वा... तों.पा.सू.
In reply to व्वा व्वा... तों.पा.सू. by उदय के'सागर
उदय, खरे आहे.. त्याला कटाची
In reply to उदय, खरे आहे.. त्याला कटाची by मराठमोळा
आधी कुणी प्रकाशित केली आहे की
वा!
सारण निट शिजत नाही :(
In reply to सारण निट शिजत नाही :( by समर्थिका
मयुरी तै, तुम्ही वर दिलेल्या
हा धागा वाचला. सध्या इतकंच
मिर्ची
छान
या पदार्थाबद्दल ऐकून होते.
In reply to या पदार्थाबद्दल ऐकून होते. by रेवती
रेवती तै, मिरची म्हंटल की
जमायला लागला की स्वयंपाक ,
In reply to जमायला लागला की स्वयंपाक , by सुहास..
जमायला लागला की स्वयंपाक ,
वावा..
व्वा! मस्त पाकृ! बागेत बनाना
आयला,
वाँव मस्त माझी आई या मिरच्या
ममो
मस्त डिश...
मस्त मस्त मस्त!!!
लहानपणी इंदुलकर नावाच्या
झक्कास!!!
>>भरलेली खानदेशी मिरची अच्छा
नॅन्स, ही मिरची एखाद्या
In reply to नॅन्स, ही मिरची एखाद्या by मराठमोळा
>>अवांतरः मला वाटलच होत की
कालच रात्रि केल्या होत्या,घरी