मूळा सहसा कोणाला आवडत नाही. मला पण त्याच्या उग्र वासामुळे तो विशेष आवडत नसे. पण एकदा मूळ्याचे पराठे खाल्ले आणि तेव्हापासून मूळ्याचे पराठे माझे फेवरेट झाले.
साहित्यः
किसलेला मूळा, मीठ, साखर, तिखट, डाळीचे पीठ, कढिलिंब, तेल, जिरे-मोहरी, हिंग, हळद, कणकेचे (गव्हाचे) पीठ
कृती :
१) रोजच्या पोळीला लागते त्यापेक्षा थोडी सैल कणिक मळून घ्या. मळलेली कणिक झाकून ठेवा. एका सालकाढणीने मूळ्याचं बाहेरचा भाग स्वच्छ करून घ्या. मग मूळा खिसून घ्या.
२) एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद, कढिलिंब टाकावे. त्यात किसलेला मूळा टाकून मूळा चांगला परतून घ्या. ४-५ मिनिटं मध्यम आचेवर मूळा परतून घ्या.
३) मग १-२ मिनिटे झाकण ठेवून मूळा चांगला शिजू द्या. (मूळ्यात पाण्याचा खूप अंश असतो. त्यामुळे शिजताना वरून पाणी घालावे लागत नाही.)
४) आता त्यात चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घालून परता. (साखरेमूळे मूळ्याचा उग्रपणा कमी होतो.) या मिश्रणाला दाटसरपणा येण्यासाठी त्यात २-३ चमचे डाळीचे पीठ घालून २-३ मिनिटं परतून घ्या. मग हे मिश्रण एका ताटलीत काढून गार होऊ द्या. मूळ्याच्या पराठ्याचं सारण तयार.
५) कणकेच्या छोट्या गोळ्यामध्ये हे सारण भरा. आणि मग त्याचा पराठा लाटा. हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. हिरवी/खोबर्याची/शेंगदाण्याची/लसूणाची चटणी आणि दही/बटर/तूप बरोबर खा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( http://tivalyabavalya.wordpress.com वर पूर्वप्रकाशित )
वाचने
6387
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकृ आणि फोटो. यात
मस्तच.. इथले मुळे काही चवदार
छानच दिसतायत पराठे. माझ्या
+१
In reply to छानच दिसतायत पराठे. माझ्या by एमी
बेश्ट !!! मुळा, मुळातच, मुळी
बेष्ट्यय !!!
छानच दिसतायेत.....
हा धागा वाचलाय.
छानच दिसत आहेत
काय अफलातून दिसताहेत पराठे.
मस्त!
धन्यवाद