✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माफक ईच्छा...मिपाधर्म वाढवावा......

न
नि३ यांनी
Sat, 08/09/2008 - 16:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6799 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/09/2008 - 17:27 नवीन

१००%

अनुमोदन तुमच्या मताला आमचे ही ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/09/2008 - 17:29 नवीन

आजपर्यंत

आजपर्यंत सर्वच नव्हे, परंतु मिपावर निखळ प्रेम असणार्‍या मिपाकरांच्या साथीने मिपाधर्म वाढवण्याचा प्रयत्न केला. उद्याचं माहीत नाही! नुकतंच नीलकांतला भेटून मिपावर थोडा अधिक खर्च करून अजून काही चांगल्या सुधारणा करण्याबद्दल, सर्व्हरबद्दल वगैरे चर्चा केली. परंतु आता मन नाही. आहे ते मिपा ठीकच आहे! असो, नितिनराव, आपल्या अपुलकीबद्दल कृतज्ञ आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 08/09/2008 - 17:44 नवीन

नुकतंच

नुकतंच नीलकांतला भेटून मिपावर थोडा अधिक खर्च करून अजून काही चांगल्या सुधारणा करण्याबद्दल, सर्व्हरबद्दल वगैरे चर्चा केली. परंतु आता मन नाही. आहे ते मिपा ठीकच आहे! असे उदास होवुन कार्य होणार नाही दुर्लक्ष करा अशी माणसे सर्वत्र असतात त्यांना टाळणे हाच उपाय याल तर सह, न याल तर .... हे विसरु नका म्हणाव त्यांना नाना (सर्व्हर बदलत असाल तर भारतातीलच बघा ... त्या अमेरीकन कंपन्यांचे काय खरे नाहि केव्हाही आता त्ञांचा बैंडबाजा वाजणार....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 08/10/2008 - 12:45 नवीन

सहमत... ++++१

तात्या, असा उदास होऊ नकोस. अरे माझ्या हापिसातले लोक देखील मिपा वाचत असतात नियमीत. पण असे आहे की एकानेही सदस्यत्व घेतलेले नाही. पण मिपा नियमीत वाचून ज्ञानार्जन करीत असतात. याचा अर्थ ते इतर स्थळावर जातात असे नाही. पण ते सर्व ठीकाणि वाचत असतात. मग जर मिपा अशाप्रकारे मराठी वाचकवर्गाला आकृष्ठ करत असेल तर त्यांचे नुकसान नाही का होणार. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 08/09/2008 - 17:39 नवीन

ईथे एवढी

ईथे एवढी चिखलफेक नाही झालीये ..पण ती पुढे वाढु नये हीच आमची ईछा मी पण सहमत आहे तसा मी काही लेखक नाहि इतकेच काय मी प्रतिक्रिया पण खुप कमी लिहितो पण वाचन होते ( जनामनातले सोडून ते काय आपल्याला झेपत नाहि) काही जणांना मी चांगलाच ओळखतो जरी ते मला ओळखत नसले तरी त्यामुळे त्यांचे झालेले अधःपतन मन विषण्ण करुन जाते कदाचित वैयक्तिक समस्यांमुळे असे होत असावे अशी शंका वाटते (ते जी कामे करतात त्या कामाच्या स्वरुपाबद्दल तसेच जिथे काम करतात त्या बद्दल मला संपुर्ण माहिती असल्यामुळे हे विधान करु शकतो) तरी या डिप्रेशन मधुन अशा व्यक्ति सुखरुप सहिसलामत पुर्वीच्याच जोशात बाहेर याव्यात अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो नाना
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/09/2008 - 17:43 नवीन

तरी या

तरी या डिप्रेशन मधुन अशा व्यक्ति सुखरुप सहिसलामत पुर्वीच्याच जोशात बाहेर याव्यात अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो वा ! अशीच काही शी प्रार्थना मी देखील देवा समोर करतो ! पुन्हा पुन्हा लिहीत आहे.. आपली सदविवेक बुध्दी जागृत ठेवली की असली वेळ येणार नाही .. की दुसरा कोणी आपल्यासाठी प्राथना करु लागेल. तेव्हा खाली वाक्य जरा गर्भित अर्थाने घ्या.... शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
संजय अभ्यंकर Sat, 08/09/2008 - 22:51 नवीन

तरी या डिप्रेशन मधुन अशा व्यक्ति सुखरुप ....

अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया! नानांशी सहमत! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/10/2008 - 08:07 नवीन

सहमत

नाना शी सहमत आहे. (स्वानुभवी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
जनरल डायर Sun, 08/10/2008 - 02:19 नवीन

+१

मिपाचा ,ईथल्या लिखाणांचा,ईथल्या टोपण नावांचा ,तात्याचा निस्सीम चाहता असेच म्हणतो (हागणदारीला वैतागलेला) सोकाजीराव
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 08/10/2008 - 02:40 नवीन

नितिनराव, आ

नितिनराव, आपला लेख आणि त्यातले विचार पटले. आपण मिपाकरांची ही जबाबदारी आहे, की मिपाच्या ह्या स्टेजला, मिपा वाढत असताना आपण सर्वांनीच काळजीपूर्वक वागले पाहिजे. झणझणीत आणि खमंग काही वाचायला मिळायलाच हवं, ती तर मिसळ्पावची खसियत आहे, पण त्याचबरोबर उत्तम दर्जेदार साहित्यही इथे दिसावं अशी आशा करायला हरकत नाही. तात्या, तुम्हाला सल्ले देण्याइतका मी मिपावर जुना नाही किंवा तुम्हाला जवळून ओळखतही नाही. पण इथे आल्यावर मला सर्वप्रथम भावलं ते इथलं अनौपचारिक वातावरण (लोकं स्वत:हून दुसर्‍याशी बोलतात, माझ्यासारख्या नवख्या सदस्याच्या प्रयत्नांचं कौतुक करतात) आणि त्या सोबतच चाललेली खुमासदार साहित्यनिर्मिती. पण तुम्हीच मन नाही म्हणून कसं चालेल? मालकांनीच मिपा सुधारायचा प्रयत्न सोडला तर कसं होणार???? आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही, अन ह्या असल्या गोष्टी मनावर घेता??? --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जनरल डायर
व
विसोबा खेचर Sun, 08/10/2008 - 04:33 नवीन

पण इथे

पण इथे आल्यावर मला सर्वप्रथम भावलं ते इथलं अनौपचारिक वातावरण धन्यवाद भटराव! पण तुम्हीच मन नाही म्हणून कसं चालेल? मालकांनीच मिपा सुधारायचा प्रयत्न सोडला तर कसं होणार???? सध्या मन नाही इतकंच म्हटलं आहे, प्रयत्न सोडला आहे असं नव्हे! आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही, अन ह्या असल्या गोष्टी मनावर घेता??? तसं नाही हो, परंतु ठराविक लोकांना अनेक फाट्यावर मारूनही त्यांच्या मर्कटलीला सुरूच असतात याची अंमळ गंमत वाटते! असो, तूर्तास त्यांना तरी मिपशिवाय कोण आहे? काय सांगावं, उद्या यातूनच एखाद्याला स्वत:चे वेगळे संस्थळ काढायचे सुचेल अन् मराठी आंतरजाल अधिक सशक्त होईल. मलाही त्या संस्थळावर अधनंमधनं हजेरी लावायला नक्कीच आवडेल! :) आयला, दुनिया फाट्यावर मारणारे गृहस्थ तुम्ही, ते तर आहेच! आणि यापुढेही मारीन! :) असो, आता संपवा हा विषय! मध्येच कुणीतरी काहीतरी हागून गेला की मिपावर हा विषयही डोकावतोच व वेगवेगळी मतमतांतरे ऐकायला मिळतात. अर्थात, मिपाचे खरे हितचिंतक कोण हे मला अधिक चांगल्या रितीने समजायला मदत होते हा भाग निराळा! ;) आपला, (सात भिकारचोट) तात्या. अवांतर १) : साला, तूर्तास आपण एकदम मुडात आहोत. आज पहाटे तीन पर्यंत मित्रमंडळीत झकासपैकी गाण्याची मैफल झाली. मजा आली! नंद रागावर भरभरून बोललो, त्यातली मला माहिती असलेली सौदर्यस्थळे प्रात्यक्षिकात दाखवली आणि त्याच रागातलं 'तू जहा, जहा चलेगा, मेरा साया साथ....' हे गाणं जमेल तितकं उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. इतरही काही गायलो. साला गायला मजा आली, पब्लिक खुश झालं, आपणही खुश झालो! माफक मद्यपान केलं, आणि झकासपैकी बिर्याणीही चापली! :) आपला, (गाण्यातला, खाण्यातला, पिण्यातला!) तात्या. अवांतर २) : स्वगत : चला! १५ ऑगस्ट जवळ येतोय, काही संस्थळांच्या मालकांना वर्धापनदिनाच्या भरभरून शुभेच्छांचे विरोप पाठवायचे आहेत! स्मरणाकरता शेंडीला अंमळ गाठच मारून ठेवली पाहिजे! ;) आपला, (राजकारणी!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
पिवळा डांबिस Sun, 08/10/2008 - 03:29 नवीन

एक्झॅक्टली!!

लिहिता येत नाही म्हणता, पण वर अगदी सुसूत्रतेने आणि मुद्देसूदपणे लिहिलंय की तुम्ही! :) तुम्ही माझं नांव घेऊन टीका केलीय तेंव्हा उत्तर देणं भागच आलं.... मिपाचा तुम्हाला जितका जिव्हाळा आहे तितकाच आम्हालाही आहे. आमची वाटचाल जर न्याहाळली तर मिपावर आम्ही विधायकच स्वतंत्र लिखाण केलेले आहे. मिपावरचं वातावरण जेंव्हा तणावपूर्ण होतं तेंव्हा तो ताण कमी करण्यासाठी (कविता हा आमचा प्रांत नसतांना) विडंबक कविताही प्रकाशित केलेल्या आहेत. लोकांच्या चेहर्‍यावर हसू फुटावं, चिडाचिड कमी व्हावी हाच त्यामागचा उद्देश आहे. तुम्हाला ठाऊक नसेल पण मिपामालकांना माहिती आहे की जेंव्हा वेळ पडली तेंव्हा मिपाची बाजू घेऊन भांडलेलोही आहोत. तेंव्हा आमच्या मिपाप्रेमाच्या पातिव्रत्याबद्दल शंका घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये..... आमचं म्हणणं इतकंच की जर कुणाला मिपावर काय चाललंय हे आवडत नसेल तर काही नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करा ना. त्यासाठी कोणी लेखक/ कवी असायची गरज नाही. इथे कोणीही पुल वा कुसुमाग्रज नाही. लेखन हा कुणाचाच पूर्णवेळ व्यवसाय नाही. तुम्ही संगीत, चित्र, शिल्प, अर्थकारण, राजकारण, समाजकारण कशाचीही चर्चा सुरु करू शकता! काहीच नसेल तर रोजच्या वर्तमानपत्रात वाचलेले किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला जाणवलेल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर 'काथ्याकूट' मध्ये चर्चा सुरु करा..... काहीही करा पण या प्रोसेसमध्ये स्वतः सहभागी होऊन स्वतः काही नवी दिशा द्यायचा प्रयत्न करा. मी तुमचं दोन्ही बाहू पसरून स्वागत करतो...... पण तसं काहीहि न करता फक्त वाचनमात्र राहून अचानक एखादे दिवशी "हे काय चाललंय, आणि ते काय चाललंय" असे जाब विचारल्यासारखे वाटणारे वांझोटे प्रश्न उपस्थित करण्यात काय मतलब आहे? हृषिकेशने म्हटल्याप्रमाणे अशाने परिस्थिती सुधारत नाही तर आणखी चिघळते. नुसतेच नेहमी लिहिणार्‍या ऍक्टिव्ह मेंबर्सकडून हाय अपेक्षा आहेत असे म्हणत राहू नका, स्वतः या क्रियेत सहभागी व्हा. आपलं लिखाण मनासारखं वठत नाहिये अशी जर शंका असेल तर तुमच्या आवडत्या अशा मिपावरच्या कुठल्याही लेखक/ कवीला व्यनि करून ते पाठवा आणि सुधारणा मागवा. माझी खात्री आहे की इथला कोणताही लेखक/कवी आपल्या फेलो मिपाकराला आनंदाने मदत करेल. जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/10/2008 - 04:11 नवीन

सुंदर..

सुंदर प्रतिसाद! डांबिसाने गमत्याला दिलेला प्रतिसाद पटला नव्हता परंतु या वेळेस मात्र डांबिसाचा प्रतिसाद अधिक खुलासेवार असल्यामुळे नक्कीच पटण्याजोगा आहे! :) आपला, (प्रांजळ) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुनील Sun, 08/10/2008 - 07:09 नवीन

पटले

सुरेख विवेचन. जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का? माझ्यापुरते म्हणाल तर, हे आता पाळण्याचे ठरवले आहे. इतके महिने केवळ प्रतिसादापुरता राहिला होतो. आता पुनः काही लिहिन म्हणतो. बघूया... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/10/2008 - 12:34 नवीन

सूंदरच!

पिडाकाका, बरोब्बर बोललात. जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का? +१ आणि तुम्ही खरोखरच पॉझिटीव्ह विचार (आमच्या अपेक्षेप्रमाणे) मुद्देसूद मांडले आहेत. आतापासून मी पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे पॉझिटीव्हच लिहिण्याचा प्रयत्न करेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्राजु Sun, 08/10/2008 - 04:06 नवीन

नितिनजी, अ

नितिनजी, अगदी प्रामाणिक आणि मनापासून लिहिलेलं आहे तुम्ही. पिडां काका म्हणतात त्याप्रमाणे अगदी सुसूत्रही लिहिलं आहे. आपल्या भावना अगदी निट पोचवल्या आहेत आपण. मिपाची सदस्य आणि हितचिंतक म्हणून मी माझ्या परीने चांगल्यात चांगले लेख , व्यक्तीचित्र, कविता अगदी मनापासून लिहित आले आहे. आणि कोणी कितीही टिका करो अथवा नावे ठेवो मी इथले लेखन थांबवणार नाही हे नक्की. कोणी काही वातावरण नासवणारे लेखन केले तर त्याला मी कधीही प्रतिसाद देऊन प्रोत्साहीत नाही केले आणि करणारही नाही. एका मर्यादेपर्यंत मजा असते नंतर अती तिथे माती होते हे मी पूर्णपणे जाणून आहे. जर जास्तीतजास्त मिपाकरांनी लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं ठरवलं तर चिखलफेक करणारं लिखाण आपोआपच मायनॉरिटीत जाणार नाही का? हे मात्र खरं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/10/2008 - 08:42 नवीन

वातावरण नासवणे

इतिहासाची तमा नसे तर भविष्य तममय वाटतसे (इति कवी सर्किट) आजकाल येथे चिखलफेक, मिपाचे शत्रू, वगैरे असे अनेक वाक्प्रचार दिसताहेत. हे सर्व लोक, म्हणजे असे वाक्प्रचार दाखवणारे, आजवर वाचनमात्र होते असे दिसते. आजच मिपाच्या जीवनमूल्याविषयी आपापले दात पुढे दाखवू लागलेले आहेत असे दिसते. आणि पिडांकाकांचे नाव पुढे देताहेत. काकांचे नाव द्यावे नक्की. पण पिडांकाकांचे नाही. इतिहासाची तमा नाही, हे नक्कीच. कुठल्या काकांचे नाव द्यावे हे जर कळत नसेल, तर सोडा ना ! कळत नाही, हे स्पष्ट सांगा ! इथल्या अनेक काकांनी अनेक पुतण्यांना आजवर शहाणपणा (?) शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे आले, एक पिडाकाकांचे पुतणे !!! हे असे लेख आणी प्रतिसाद जर मिपावर राहणार असतील, त्रा खरेच, मिपाचे अष्टप्रधानमंडळ झोपले आहे का ? हाच प्रश्न उरतो ! मिपाच्या जन्माचा उद्देश, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे जर कुणालाही जाणून घेता आले, तर असे प्रतिसाद येणार नाहीत, हे नक्की. काय तात्या ? - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/10/2008 - 09:04 नवीन

अष्टप्रधान मंडळ

लेख आणी प्रतिसाद जर मिपावर राहणार असतील, त्रा खरेच, मिपाचे अष्टप्रधानमंडळ झोपले आहे का ? हाच प्रश्न उरतो ! अष्टप्रधान मंडळापैकी कोणालाही असे लेख,प्रतिसाद, उडवणे फार सोपे काम आहे. पण अशा चर्चेतील सहभागाबरोबर उत्तम लेखन करणे हा गढूळ वातावरणावर उत्तम पर्याय असतो. तेव्हा अधिक जोमाने उत्तमोत्तम लेखन व्हावे असे मिपामालकाबरोबर आम्हालाही प्रामाणिकपणे वाटते आणि ते होणारच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ए
एकलव्य Sun, 08/10/2008 - 09:11 नवीन

अवांतर - सर तुम्हीसुद्धा!

सर... तुम्हीदेखील अष्टप्रधानांत आहात हे क्षणभर विसरलोच होतो. मुजरा!! (राजदरबारापासून दूर - पण सरांच्या जवळ राहणारा) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/10/2008 - 09:14 नवीन

ही तुमची व्याख्या ?

उत्तम लेखनाची ही तुमची व्याख्या असेल तर मग सगळे संपले !!! काही दिवसांपूर्वी, आदरणीय सरपंचांनी "मिसळपावाविषयी मिसळपावावर लेखन होऊ नये" असे स्पष्ट खरडले होते, हे आम्हाला आठवतेय ! तसेच, धर्म, जाती ह्याविषयी देखील लिखाण होऊ नये, हेही खरडले होते. तसे असूनही, हिंदूंविषयी मुसलमान धार्जिण्यांनी, आणी मुसलमानांविषयी हिंदू धार्जिण्यांनी वाट्टेलते लिहिलेले आजवरही इथे तसेच आहे. तुम्हा अष्टप्रधानांना नीट दिशा सरपंचांनी किंवा आणिबाणीच्या शासनकर्त्यांनी दिलेली नाही, हे स्पष्ट दिसले मग, मिसळपावाविषयी मिसळपावावर लिहिलेले स्पष्ट दिशादर्शन केलेले असतानाही तुम्ही काही काढून टाकणार नाही, हे स्पष्ट दिसते आहे, असे दिसले कुणाला, तर काय बिघडले आहे ? सरपंच, तुमचे दिशादर्शन स्पष्ट नाही, की तुमचे हे अष्टप्रधान मंडळ त्यांना दिलेल्या अधिकाराचे पालन करत नाही ?? काय हे ? - सर्किट (असे भाड्यांनो, तुम्हाला जर अधिकार मिळाले आहेत, तर त्याचा योग्य उपयोग करा ना ? उगाच व्यक्तिगत संबंध गढूळ होतील, ह्या विचारात का गुंतला आहात अजून ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/10/2008 - 09:44 नवीन

भाषा :(

(असे भाड्यांनो, तुम्हाला जर अधिकार मिळाले आहेत, तर त्याचा योग्य उपयोग करा ना ? उगाच व्यक्तिगत संबंध गढूळ होतील, ह्या विचारात का गुंतला आहात अजून ?) अधिकाराचा योग्य उपयोग कसा करावा त्याचे शहाणपण सुदैवाने आम्हाला आहे. ते शहाणपण आम्हाला तरी कोणी शिकवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Sun, 08/10/2008 - 09:18 नवीन

पुरे...!

या विषयावरील चर्चा आता थांबवण्यात आली आहे! पुरे झालं आता! सर्व मिपाप्रेमींचे आभार... यापुढील येथील सर्व प्रतिसाद उडवले जातील... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा