आज उपक्रम या संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. सुरवातीपासून सुरवात करतो ज्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात यावे
१. दिनांक 06/22/2012 रोजी खबरदार या आयडीने इथे आईची जात हा चर्चा विषय सुरू केला. या चर्चाविषयाचे शीर्षक मी ऐसीअक्षरेवर सुरू केलेल्या चर्चेचेच असल्याने काही व्यक्तींनी व्यनीतून माझ्याशी संपर्क साधून विचारणा केली की खबरदार हा आयडी माझा आहे का?
२. त्या धाग्यावरच्या प्रतिसादात मी खबरदार हा माझा आयडी नसल्याचे जाहीर केले. असे जाहीर करणे उपक्रमाच्या धोरणांविरुद्ध असल्याने/वाटल्याने ती घोषणा संपादकांनी संपादित केली (ज्याबद्दल माझी तक्रार नाही) व चर्चेचे शीर्षकही संपादित केले
३. 'निखिल जोशी' यांना मात्र मला असे व्यनी आले आहेत हे खरे वाटत नव्हते. त्यांनी मला खरड करून असा आरोप केला की मी खोटे बोलतो आहे व खरेच व्यनी आले आहेत का अशी पृच्छा केली. मात्र मी व्यक्तीगत निरोप हे 'व्यक्तीगत' असल्याने ते जाहीर करण्यास नकार दिला व सांगितले की
प्रतिसाद संपादित आहे. तरीही हट्टाने कोणी व्यनी केले ते मी जाहीर करणे मला गरजेचे वाटत नाहीशिवाय सदर प्रतिसाद नियमबाह्य असल्याचे संपादकांनी लिहिल्याने संबंधीत खरडी उडवल्या ४. खरडी उडवल्यावर निखिल जोशी यांनी पुन्हा खरड टाकली
इतरांना आलेल्या व्यनिंची यादी मिळविणारे स्क्रिप्ट बनविण्यास मला तीनचारच तास लागतील असा आत्मविश्वास वाटतो. जर तसे स्क्रिप्ट बनविणे शक्य झाले तर ते ज्याच्या खवमध्ये चिकटविण्यात येईल त्या व्यक्तीच्या व्यनिंची यादी स्क्रिप्ट पाठविणार्याच्या खवमध्ये/व्यनिमध्ये उमटेल अशी योजना शक्य असेल. बायदवे, तुम्ही माझ्या खरडी उडविल्यात म्हणून कुतूहल म्हणून चौकशी करतो आहे "तुम्ही खबरदार आहात काय" असे विचारणारे 'अनेक' लोकांचे व्यनि तुम्ही जपले आहेत की उडविले आहेत?५. माझे व्यनी पूर्णपणे व्यक्तीगत आहेत तेव्हा त्याबद्दल माहिती देणे मला बंधनकारक नाही. तसेच मला आलेले व्यनी उपक्रमावरच आले होते का इतर कुठे हेही सांगणे बंधनकारक नाही. त्यामुळे मी त्यांना कळवले
तुमचे कुतूहल शमविण्याचे मला कारण दिसत नाही.६. त्यावर त्यांनी उत्तर दिले:
आता मला स्वतःचे कुतूहलशमन शक्य असल्यामुळे तुमच्याकडे चौकशी करण्याची आवश्यकता संपलेली आहे. शिवाय, मुळात मी तुमच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला तेव्हा तुम्ही माझी खरड उडविलीत म्हणून सोम, 06/25/2012 - 17:55 ही खरड द्यावी लागली. आता माझ्या खरडी उडविणे तुम्ही बंद केलेले दिसत असल्यामुळे माझा मूळ कार्यभाग उरकला आहेच. पुन्हा भेटूच.७. त्यानंतर मला संपादक२ आणि वसंत सुधाकर लिमये यांच्या खरडवह्यांमध्ये धम्मकलाडू, चाणक्य आणि खुद्द माझ्या व्यक्तीगत निरोपांची यादी प्रकाशित झालेली दिसली. मी प्रशासनाकडे तक्रार करे पर्यंत ती उडालेली असली तरी मी त्यापैकी खरडीत प्रकाशित झालेल्या काही यादीचे स्क्रीन शॉट घेऊन ठेवले आहेत. (धम्मकलाडू / चाणक्य यांची परवानगी असल्यास ते इथेही प्रकाशित करू शकतो) ८. याचा अर्थ किमान माझे खाते 'कोणीतरी' हॅक केले होते व माझ्या व्यनीची यादी मिळवली होती. जे माझ्यासाठी धक्कादायक आहे निखिल जोशी यांनी अशी स्क्रिप्ट बनविली की नाही याची मला कल्पना नाही ते स्पष्ट करतील अशी आशा आहे. प्रश्न स्क्रिप्ट कोणी बनविली हा नसून अशी स्क्रिप्ट बनणे शक्य आहे हा आहे. जर अशी स्क्रिप्ट बनविणे एखाद्याला काही दिवसांत जमू शकते तर मराठी संस्थळाचे व्यनी कितपत सुरक्षित आहेत / राहतील असा प्रश्न मला पडला आहे. यानिमित्ताने चर्चेसाठी पुढील प्रश्न ठेवत आहे १. असे करणे केवळ उपक्रमावर शक्य असावे की सगळ्या मराठी संस्थळांवर हे शक्य आहे? २. ही ड्रुपलमधील त्रुटी आहे का? ३. ड्रुपलवर हे शक्य असल्यास त्यावर काय उपाय करता येतील? ४. सर्व संस्थळांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपार शोधला पाहिजे असे वाटते का? मी याविषयातला तंत्रज्ञ नाही. माझी भिती किती खरी होऊ शकते मी जाणत नाही. मात्र सदर प्रसंगानंतर गप्प बसून रहाणे मला धोक्याचे वाटतले. त्यामुळे माझ्यावर होऊ शकणार्या संभाव्य आरोपांना/व्यक्तीगत टिपण्यांना लक्षात घेऊनही मी इतरांना सावध करणे माझे कर्तव्य समजतो. टीपः सदर धाग्याचा हेतू कोणतेही संस्थळ अथवा आयडीची बदनामी/आरोप करण्याचा नसून एकूणच ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवरच्या सदस्यांनी योग्य तो बोध घेऊन सावध राहावे म्हणून हा धागा काढला आहे. रिंगिंग द बेल इतका आणि इतकाच हेतू यामागे आहे. उपक्रमावर पाहिलेल्या या घटनेमुळे जास्तीत जास्त मंडळी सावध व्हावीत म्हणून हा धागा अनेक ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवर टाकत आहे. तरीही प्रशासनास अयोग्य वाटत असेल तर हा धागा उडवू शकतात
वाचने
6798
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा
+१
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
मांत्रिकांना प्रश्न
In reply to +१ by रमताराम
वेल कम.
In reply to मांत्रिकांना प्रश्न by श्रावण मोडक
ऑइंग
In reply to वेल कम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग काय
In reply to ऑइंग by गणपा
बिरुटे आणि गणपा
In reply to ऑइंग by गणपा
थोडे धक्कादायक
"अशी संस्थळे (जी नफा
In reply to थोडे धक्कादायक by श्रीरंग_जोशी
उपक्रम का, बरं!
ह्म्म, यात काय ते नवल
एकादशीच्या घरी शिवरात्र
पुणेकर झालास रे, पुणेकर
In reply to एकादशीच्या घरी शिवरात्र by सूड
छ्या...
In reply to पुणेकर झालास रे, पुणेकर by विश्वनाथ मेहेंदळे
:)
In reply to छ्या... by श्रावण मोडक
हो ना
In reply to :) by नंदन
अस्सं होय...
In reply to हो ना by श्रावण मोडक
बाकी, प्रतिसाद डकवतोच.
नेट आहे
आपण वापरत असाल तर त्यातील
आंतरजालावर स्वत:ला प्रकाशित
अरं तिज्यामायला....
हम्म.
काही महिन्यांपूर्वी हे समजले
तत्व
माझी मते
हाहाहा.... मी तर मराठी
चला 'त्या' येडपटांवर लिहु काही.
हं... संपादक आणि मालक
अजून एक सांगायचंच राहीलं...
In reply to हं... संपादक आणि मालक by नाना चेंगट
>>>ज्याला बॅकएंडच्या
In reply to अजून एक सांगायचंच राहीलं... by नाना चेंगट
त्या वाक्याला "विशिष्ट"
In reply to >>>ज्याला बॅकएंडच्या by दशानन
अरे त्यांना आवरा रे कोणीतरी.
In reply to अजून एक सांगायचंच राहीलं... by नाना चेंगट
>>>किंवा कोडींग फिडींग करुन
In reply to अरे त्यांना आवरा रे कोणीतरी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to अरे त्यांना आवरा रे कोणीतरी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा प्रश्न वेगळा आहे
+१०००, असंच करतोय आम्ही
In reply to माझा प्रश्न वेगळा आहे by सुहास..