निवेदन - सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते.
निवेदन संपले.
***
तेच ते... तेच ते
ज्यांनी लंगोटीची अंडरपँट केली
सद-याचा शर्ट केला आणि
कुटुंबाची फॅमिली केली तेच ते...
बगळ्याच्या वेषातले धूर्त..
जेव्हा मरायला टेकली होती ती
तेव्हा मावशीचा आधार घेवुन
तुंबड्या भरत होते
सात पिढ्यांची सोय व्हावी म्हणुन
आणि तोडकं मोडकं जोडत तोडत
आम्ही कसं बसं व्यवहारात वापरत होतो तिला
साहेब पेमेंट रिलीज करा...
रेट काय लावला...
मला ट्रेनचं तिकीट बुक करुन दे...
ही टॅब्लेट सकाळी ही रात्री...
एट्सेट्रा एट्सेट्रा वगैरे इत्यादी.
आणि
चक्क ती पुरुन उरली...
नामशेष होईल नामशेष होईल
असे म्हणणारेच नामशेष झाले
इंडोआर्यन भाषाकुलातील
ती हजारो वर्षांची परंपरा
"दुस-या भाषेतील शब्द घेवुन आपले व्याकरण लावुन भाषेत सामावुन घेतात"
तिने जपली,
तिच्या लेकरांनी जपली
जोपासली
समृद्ध केली.
आणि
आता आले तेच परत ..
हो तेच ते
(कदाचित आर्थिक, सामाजिक, राजकीय गरजेपोटी)
आणि सांगत आहेत ...
अरे असे नका बोलु... तसे बोला...
अरे असे नका लिहु... तसे लिहा
कानाउकारमात्रांच्या सुतळ्या बांबुला
बांधुन तिची तिरडी उचलण्याचा
त्यांचा कावा आमच्या लक्षात आला आहे
कारण
भाषा प्रवाही रहात नाही,
तिच्यात तोच तो पणा येतो
तेव्हा ती मृतावस्थेकडे जाते
हे सत्य
त्यांना माहित आहे की नाही
हे माहित नाही,
पण आम्हाला माहित आहे
आणि
म्हणुनच
जेव्हा जेव्हा ते
होय तेच ते..
आम्हाला "शुद्ध बोला शुद्ध लिहा" असा उपदेश करतील
तेव्हा एकच उत्तर ... जमणार नाही !!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4497
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ नमनार न्हाय अन् जमनार बी
मस्त.. नाय जमणार आम्हालापण
छान
:)
लिखित भाषा , शूद्धच हवी..
संदर्भ
In reply to लिखित भाषा , शूद्धच हवी.. by मुक्त विहारि
>>>पाणि = हात आणि पाणी=
In reply to लिखित भाषा , शूद्धच हवी.. by मुक्त विहारि
>>फक्त कृत्रिम भाषांमधे (जसे
In reply to >>>पाणि = हात आणि पाणी= by नाना चेंगट
पाणिनीय संस्कृतावर पतंजलीचे
In reply to >>फक्त कृत्रिम भाषांमधे (जसे by बॅटमॅन
प्रवाही रूप नष्ट झाले हे
In reply to पाणिनीय संस्कृतावर पतंजलीचे by नाना चेंगट
काय गप्पा चालल्यात तुम्हा
In reply to प्रवाही रूप नष्ट झाले हे by बॅटमॅन
तुम्हीपण या की आज्जीबै कोण
In reply to काय गप्पा चालल्यात तुम्हा by शिल्पा ब
आले असते पण वाती बनवतेय.
In reply to तुम्हीपण या की आज्जीबै कोण by बॅटमॅन
उगीच बनवू नका हं
In reply to आले असते पण वाती बनवतेय. by शिल्पा ब
(No subject)
In reply to उगीच बनवू नका हं by बॅटमॅन
वळतात की बनवतात
In reply to आले असते पण वाती बनवतेय. by शिल्पा ब
हौ तर येतं ना सुद्द लेकनात हे
In reply to वळतात की बनवतात by अस्वस्थामा
>>>प्रवाही रूप नष्ट झाले हे
In reply to प्रवाही रूप नष्ट झाले हे by बॅटमॅन
संस्कृत साहित्याच्या
In reply to >>>प्रवाही रूप नष्ट झाले हे by नाना चेंगट
(No subject)
:)
लय भारी!
सदर काव्य दोनअडीच
>>>>मला आठवतं आहे की मुळात हे
In reply to सदर काव्य दोनअडीच by राजेश घासकडवी
सभ्यतेचे संकेत समाज
In reply to >>>>मला आठवतं आहे की मुळात हे by नाना चेंगट
माफ करा
In reply to सभ्यतेचे संकेत समाज by राजेश घासकडवी
नॅन्स, आधी वाचली नव्हती.. पण
नाना तुस्सि ग्रेट हो... आपुन
सही आहे. जमणार
सर्व वाचक, प्रतिसादकांचे