आज टाईम्स ऑफ इंडीया मध्ये एक बातमी वाचताना, भारत सोडून सार्या (सेक्यूलर) जगात जी समान नागरी कायदा पद्धत चालते तीच्या अभावाने, नागरीकांसाठी अनपेक्षित समस्या याचे एक वेगळेच उदाहरण समोर आले...
दुवा : Hindu marriage ties non-Hindus in knots, couple gets HC wrap
तर झाले असे, मार्क रिबेलो नामक ख्रिश्चन व्यक्तीने सकीना खान नामक व्यक्तीशी (दोन्ही नावे बातमीसाठी बदललेली आहेत), १९९५ साली कोर्टाबाहेरील लग्न लावणार्या दलालांकरवी विवाह केला. केला तो केला, तो वैदीक पद्धतीने केला. (आता वेदकाळात लग्न कसे लावले जायचे, अथवा लग्ने होती का वगैरे प्रश्न येथे काढू नयेत ही विनंती! :-) ) . १९९८ साली त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि २००५ सालापर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडत होते. पण नंतर या दांपत्यात आत्यंतिक फरक तयार झाला आणि त्याची परीणती घटस्फोट मागण्यापर्यंत (२००८ मध्ये) झाली. पण कोर्टाने ठरवले की त्यांचे लग्नच बेकायदेशीर आहे. Marry in (a) hurry and repent at leisure असे या वर न्यायमुर्तींनी भाष्य केले.
आता यातून अनेक प्रश्न निर्माण होतात असे वाटते.
- सर्वप्रथम कुठल्यापद्धतीने लग्न केले याने काय फरक पडतो? विशेषतः जेंव्हा दोन्ही व्यक्ती ते लग्न झाल्याचे मान्य करतात तेंव्हा.
- अजून एक गृहीत धरले की या दांपत्याने जर ख्रिस्तीपद्धतीने अथवा मुस्लीम पद्धतीने लग्न केले असते तर कोर्टाचा न्यायनिवाडा असाच ठरला असता का? तेच हिंदू-ख्रिश्चन, हिंदू-मुस्लीम विवाहासंदर्भात देखील...
- जर त्यात पतीच्या धर्माप्रमाणे केलेले धार्मिक लग्न योग्य ठरवले तर ते स्त्रीशी असमानता दाखवेल का? का अशा जोडप्यांना धार्मिक पद्धतीने लग्न करणे शक्यच नाही, अर्थात धार्मिक हक्कच नाकारले जात आहेत?
- कदाचीत हे एक अपवादात्मक उदाहरण असेल. पण ते होताना, या अपवादाने जो नियम सिद्ध झाला, तो असमान नागरी कायद्याचा... मग असा कायदा लोकशाही आणि सेक्यूलर राष्ट्रात असावा का? का समान नागरी कायदा असणे योग्य ठरेल?
वाचने
8832
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
लग्न कुठल्याही पद्धतीने केले
आपला भारत हा एक गंमतशीर देश आहे...
अशांसाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट
रजिस्टर्ड
In reply to अशांसाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट by सुनील
माझे मत
In reply to रजिस्टर्ड by विकास
धर्म न बदलता लग्न करण्यासाठी
In reply to अशांसाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट by सुनील
एक शंका
समाजमान्यता.....
In reply to एक शंका by ज्ञानोबाचे पैजार
हम्म
अधिक जटिलता निर्माण होऊ शकते...
In reply to हम्म by रमताराम
समस्या!
In reply to अधिक जटिलता निर्माण होऊ शकते... by श्रीरंग_जोशी
शहाणे, पण उंटावरचे
In reply to हम्म by रमताराम
इथे मात्र असहमत! जर लग्नच
In reply to शहाणे, पण उंटावरचे by श्रावण मोडक
काय झालं?
In reply to इथे मात्र असहमत! जर लग्नच by ऋषिकेश
नाय हो
In reply to काय झालं? by श्रावण मोडक
समजा -
In reply to नाय हो by रमताराम
म्हणूनच
In reply to हम्म by रमताराम
एक मुद्दा
In reply to म्हणूनच by विकास
गृहीतक
In reply to एक मुद्दा by रमताराम
रमताराम आणि सुनील यांच्याशी
फारच किचकट आहे ब्वॉ.. तरी
मला वाटलं गुंतागुंती
च्यायला लग्न करण्यापेक्षा
कारण
In reply to च्यायला लग्न करण्यापेक्षा by नाना चेंगट
एक जोडपे विवावाशिवाय एकत्र
In reply to कारण by विकास
चेंगटपणा
In reply to च्यायला लग्न करण्यापेक्षा by नाना चेंगट
उपप्रश्न
In reply to चेंगटपणा by सुनील
मला ही बेकायदेशीरची भानगड
शंका
ते झालं. पण जर दांपत्याला मुल
In reply to शंका by नितिन थत्ते
ते झालं. पण जर दांपत्याला मुल
In reply to शंका by नितिन थत्ते
अहो किती मुलं आपलं..
In reply to ते झालं. पण जर दांपत्याला मुल by शिल्पा ब
+१
In reply to शंका by नितिन थत्ते
(शंका) समाधान
In reply to शंका by नितिन थत्ते
"सात फेर्या" मारल्या काय
In reply to (शंका) समाधान by विकास
म्हणूनच सुडोसेक्यूलॅरिझम
In reply to "सात फेर्या" मारल्या काय by ऋषिकेश
सहमत आहेच. मात्र...
In reply to म्हणूनच सुडोसेक्यूलॅरिझम by विकास