गल्फ मधील अनुभव आणि माझा झालेला फायदा..
प्रिय मिपा करांनो,
गेली ५/६ वर्षे मी गल्फ आणि भारतात जॉब निमित्ताने फिरत आहे.त्या आधी १७ वर्षे फक्त भारतातच नौकरी करत असल्याने गल्फ विषयी जास्त माहिती न्हवती.कुवैत, यु.ए.इ आणि सौदी हे देश आणि इथली मॅनेजमेंट बघीतली आणि नकळत तूलना झाली. (एक भारतीय नागरिक म्हणून , माझे भारतावर प्रेम आहे, पण... आपण मागे का आहोत, ह्याचा विचार करावासा वाटला म्हणून लिहीत आहे.)
१. कायदा आणि कायद्याचा मान... २००७ मध्ये मी दुबईला होतो.सलमान साहेबांची केस चालू होती.तीच ती कारच्या अपघाताची.त्याच सुमारास माझ्या कं.तील एका मित्राने, हाय-वे वर , एका माणसाला उडवले.मित्राने फोन करून पोलिसांना बोलावले.मग पोलिस आल्यावर, त्यांच्या परवानगीने, घरी फोन केला.साहेब मस्त ए.सी. कोठडीत.मग जबानी वगैरे इतर सोपस्कार पार पडले.अपघात स्थळावर पोलीसांनी परत एकदा तालीम घेतली.गाडीचा स्पीड , त्याने त्या माणसाला केंव्हा बघितले, ब्रेक केंव्हा मारला. १७६० गोष्टींची नोंद केली.
अपघात झालेला मनुष्य "कोमात" गेला होत.त्याला हॉस्पीटल मध्ये ट्रीटमेंट चालू झाली आणि ती पण सरकारी खर्चाने.२/३ दिवसांनी त्याची जबानी घेतली.त्या माणसाने त्याची चूक कबूल केली.६व्या दिवसाला कोर्टाने निर्णय दिला की मित्राची काही चूक नाही.
अपघात झालेल्या माणसाला तो २ महिन्यांनी बरा झाल्यावर. ४/५ दिवसांनी शिक्षा दिली, कारण हाय्-वे वर रस्ता ओलांडू नये असा कायदा आहे.
कं.तील इतर माणसे म्हणाली की. इथल्या शेखच्या मूलाला पण ट्रॅफिक पोलीस सोडणार नाहीत. ट्रॅफिक पोलीसांना खूप मान आहे आणि कामाच्या बाबतीत ते तेव्हढेच कठोर पण आहेत.
२. मॅनेजमेंट... गल्फ मधील सगळ्या मुलांना शिकवले जाते, की ते शासनकर्ते आहेत.२५व्या वर्षीच त्यांच्यावर जबाबदारी टाकल्या जाते.वरचे अधिकारी वेळो-वेळी त्यांना मदत करत असतात.इथे लहान-लहान मूले सर्रास गाड्या चालवतात.बाजूला वडील बसलेले असतात आणि ते पण त्याला मदत करत असतात.
३. भाषा...गरज असेल तरच इंग्रजीचा वापर.इथे बर्याच वेळी , मीटींग मध्ये अरेबिक मध्ये संभाषण चालते.कोर्टात आणि इतर सरकारी खात्यात अरेबिक मध्ये जे काही लिहिले असेल तेच सत्य.
आपल्याकडे पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या होत्या म्हणूनच आपण एकेकाळी हिंदूस्थानाच्या राजाचे रक्षण केले.(पानीपतची लढाई)
१. कायदा आणि कायद्याचा मान... राघोबांनी केलेला खून आणि न्यायमुर्तींचा निवाडा
२. मॅनेजमेंट... बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे ह्यांनी २०/२५ वर्षांचे असतांनाच पेशवेपद सांभाळायला सूरुवात केली..(इथे पेशव्यांचे उदाहरण हे "मॅनेजमेंट" म्हणून दिले आहे.शासनकर्ते म्हणून नाही)
३. भाषा... १८१८ पर्यंत महारष्ट्राची , मराठी , भाषा शासन्कर्त्यांपासून ते थेट तळागाळ्यातील लोक वापरत असत आणि बहूदा इंग्रज पण ही भाषा वापरत असावेत्.इथे अमेरिकन आणि युरोपियन लोक जर अरेबिक बोलायचा प्रयत्न करतात्.मग त्या काळी पण ते मराठी बोलायचा प्रयत्न नक्कीच करत असतील.(जाणकार इतिहासकारांनी प्रकाश टाकावा)
मी घेतले धडे आणि माझा झालेला फायदा...
१. कायदा आणि कायद्याचा मान... आमच्या घरात काही नियम, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले आहेत.
२. मॅनेजमेंट... लहानपणापासून मुलांना त्यांची खरेदी स्वतःची स्वतः करायला दिली.सुरुवातीला खरेदी करतांना फसले.पण आज काल तेच स्वतः बाजारात जातात, भाव काढतात, तूलना करतात आणि मग वस्तू विकत आणतात... हे मॅनेजमेंटचे धडे मी गल्फ मध्ये येण्या अगोदरच मुलांना देत होतो आणि मी योग्य करत आहे, ह्याची खात्री इथे आल्यावर झाली.
३. भाषा... आम्ही सगळेच मराठी माध्यमात शिकलो.अगदी अमेरिका आणि इतर देशांत स्थायीक झालेले देखील. पण आज-काल सगळेच ज्ञान इंग्रजीत असल्याने मुलांना सेमी-इंग्रजी मिळाले (शाळेत काही ठराविक मार्क्स मिळाले, तरच , परवानगी मिळते) तेंव्हा मी नकार दिला नाही.
माझी विचारसरणी चूकीची असली तर जरूर सांगा आणि इथे गल्फ मधील आणि इतर देशांतील मंडळी असतीलच. तर त्यांनी पण आपले अनूभव सांगावेत , अशी विनंती करतो. आपला देश बदलायला ह्याचा उपयोग होणार नाही , आणि शासनकर्त्याने बदलावे, अशी अपेक्षा पण नाही.त्यांना बदलवणे , आपल्याला शक्य होणार नाही.त्यामूळे शासनाला सल्ला न देता, परदेशातील अनुभवामूळे , आपला वैयक्तीक फायदा कसा झाला तेच सांगीतले तर जास्त बरे...
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सूपंथ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धाग्याचे स्वागत !!
आवडले...
नाही रे बाबा...
ठीक है भाय...
हम्म
मुवि, लेख आणि निष्कर्श चांगले आहेत!
साधारणपणे मुलं काय वयाची
माझ्या पोराला ही स्वावलंबी
लेख आवडला.. यातून देश बदलेल
अगदी सहमत.... आपण सरकार,
छान
माझ्या माहितीप्रमाणे
बराच टप्पा गाठायचा आहे
हम्म्म...! तुमचे अनुभव
मान्य आहे...
नियमांचा आदर असो वा कायद्याचा
पोलीसमामा काही सातारा
दुबईत असताना माझा पोलिसांचा
कुरकुरीत प्रतिसाद..
एकदम आवडलं.
बिपिन कार्यकर्त्यांच माझं
वाचलंय की!!
आवडल तुमच कंपॅरिझम. आपल्या इथ
चांगला लेख
मान लिया आपको.