Skip to main content

'बोलक्या बाहुल्या'काराचे हार्दिक अभिनंदन.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 19/06/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शब्दभ्रमकार श्री. रामदास पाध्ये ह्यांना चीन मध्ये झालेल्या जागतिक शब्दभ्रमकारांच्या मेळाव्यात, २००० शब्दभ्रमकारांच्या शंभराहून अधिक कार्यक्रमातून त्यांनी साकारलेल्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमास THE BEST ENTERTAINING PERFORMANCE म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले. श्री. रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे हार्दिक अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4598
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार.

In reply to by नाखु

आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार
. असेच म्हणतो.

अर्धवटराव आणि आवडाबाई झिंदाबाद. श्री. पाध्ये यांनी हॉलिवुडच्या चित्रपटासाठीही आपल्या बाहुल्यांची कामगिरी बजावली असे ऐकुन आहे.

२००० शब्दभ्रमकारांच्या शंभराहून अधिक कार्यक्रमातून
वाह !! अभिनंदन पाध्ये कुटुंबाचे. धन्यवाद पेठकरकाका.

आवडाबाई, अर्धवटराव आणि त्यांचे जन्मदाते रामदास पाध्ये व पाध्ये कुटुंबीय यांचे हार्दिक अभिनंदन. आणि ही बातमी पोचवल्याबद्दल पेठक्रकाकांना धन्यवाद.

रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये, अर्धवटराव, आवडाबाई यांचे हार्दिक अभिनंदन आणि पेठकर काकांना धन्यवाद!

वा वा वा !! मस्त बातमी इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद काका. बाकी (धाग्याच नाव न वाचताच) सुरवात वाचुन आधी काळजात एकदम चर्र झालं होतं. :)

>>

धन्यवाद पेठकर काका. रामदास पाध्ये यांचे हार्दिक अभिनंदन! सुमीत भातखंडे

अरे वा!! छान. पाध्यांचं हार्दिक अभिनंदन. अन बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार.

अरे, मला कसले धन्यवाद देताय? एका मराठी माणसाचे कर्तृत्व मिपाकरांच्या कानी घालावे म्हणून हा उपद्व्याप. असो. शब्दभ्रम ह्या कलेचा परिचय श्री. रामदास पाध्ये ह्यांच्यामार्फतच झाला. आधी अशी काही कला अस्तित्वात आहे हेच मला ठाऊक नव्हते. फार तरूणपणी, (माझ्या आणि त्यांच्या), त्यांचा 'बोलक्या बाहुल्यां' हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांचा पंखा बनलो होतो. पुढे एकदा कार्यक्रमानिमित्त ते मस्कतमध्ये आले असता भेटण्याचाही योग आला होता. इतका चांगला कलाकार असूनही एक व्यक्ती म्हणून फार विनम्र वाटले मला ते. आज त्यांचा होत असलेला गौरव पाहून खुप खुप आनंद झाला आणि स्वाभाविकपणे तुमच्या बरोबर हा आनंद वाटून घेण्यासाठी मिपावर हा धागा टाकला. सर्वांचा आभारी आहे.

रामदास पाध्ये यांचे अभिनंदन आणि पेठकर यांना धन्यवाद! सदर कार्यक्रम यु ट्युबवर वगैरे उपलब्ध आहे काय?

In reply to by सुनील

काही कल्पना नाही, सुनिल. शोधून पाहावा लागेल. मी झी च्या कुठल्याशा कार्यक्रमात ही बातमी/श्री. रामदास पाध्येंची मुलाखत पाहिली.

त्रिवार अभिनंदन पाध्ये कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन आणि पेठकर काकांना धन्यवाद !

रामदास पाध्ये आणि कुटूंबाचे हार्दिक अभिनंदन!! परवाच त्यांचा 'तात्या विंचू' पुन्हा एकदा पाहिला...