अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी
सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी
पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा
तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी
विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा
आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी
भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी
पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली
फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी
पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली
धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2023
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
JAGOMOHANPYARE साहेब, खरच विचार करायला लावणारी कविता
परखड !
हा हा हा !!!
In reply to परखड ! by परिकथेतील राजकुमार
बापूंचा मार्ग जनतेने सोडला
In reply to परखड ! by परिकथेतील राजकुमार
जबर कविता - वस्तव प्रतिसाद.
In reply to परखड ! by परिकथेतील राजकुमार
संस्कृतीचे वाजवीती रोज बारा
कविता