✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वन हिट वंडर - २ -> 'Disco Duck'

प
प्रास यांनी
Tue, 06/12/2012 - 12:12  ·  लेख
लेख
साधारण सत्तर च्या दशकात युरोप आणि अमेरिकेत डिस्कोची लाट आली. ब्लूज, सोल्स, जाझ इ. पेक्षा वेगळं अधिक टेक्नो आणि अधिक लयकारी असलेलं नर्तनीय (म्हणजे ज्या संगीताचा भर नृत्य-धुंद करण्याकडे जास्त असतो) प्रकारचं संगीत यात येऊ शकतं. (आपल्या इथेही ते ८० मध्ये आलं आणि बर्‍यापैकी टिकलं पण संख्यात्मक, गुणात्मक नव्हे.) या प्रकारच्या 'डिस्को' संगीताने नटलेलं एक जरा हटके असं होतं, 'रिक डीज्'चं 'Disco Duck' हे गाणं. रिक हा अमेरिकन डिस्क जॉकी, तेव्हा मेम्फिसमधल्या WMPS-AM नावाच्या रेडियो सेन्टरमध्ये कार्यक्रम करायचा. डिस्को हा संगीतप्रकार लोकप्रिय होत असताना त्याने हे 'Disco Duck' गाणं लिहिलं पण ते कुणीतरी सादर करावं यासाठी त्याला फार प्रयत्न करावे लागले. या गाण्यामधला डोनाल्ड डक या लोकप्रिय डिस्ने कार्टूनचा आवाज हा कळीचा मुद्दा होता. हा आवाज रिकचा सहकारी केन प्रुईटने दिला आहे. रिकने हे गाणं रेकॉर्ड केलं आणि ते सिंगल स्वरूपात लोकप्रिय झालं पण तरी रिकच्या अडचणी दूर झाल्या नाहीत. 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्ट'च्या नावाखाली रिकची रेडियो कंपनी WMPS-AM त्याला हे गाणं त्याच्या स्वतःच्या कार्यक्रमातही वाजवू देत नव्हती. इतर रेडियो कंपन्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या कार्यक्रमाची जाहिरात होईल असं वाटून हे गाणं त्यांच्या कार्यक्रमामध्ये वाजू दिलं नाही. इतकंच काय की रिकने आपल्या कार्यक्रमामध्ये केवळ या गाण्याचा उल्लेख केला म्हणून WMPS-AM रेडियोने त्याच्या हातात नारळ दिला. मग रिक टेलिव्हिजनकडे आपल्या गाण्याच्या प्रमोशनसाठी वळला. त्याने 'रिक डिज् अ‍ॅण्ड हिज कास्ट ऑफ इडियट्स' या ग्रूपच्या माध्यमातून अनेक टिव्ही शोज् मध्ये हे गाणं सादर केलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेत या गाण्याच्या ६० लाखाहून जास्त रेकॉर्ड्स खपल्या. काही काळानंतर WHBQ-AM या WMPS-AM च्या प्रतिस्पर्धी रेडियो कंपनीने रिकला आपल्याकडे नोकरी दिली. आजही रिक अमेरिकमधलं लोकप्रिय रेडियो व्यक्तिमत्त्व आहे. १९७६ साली 'बिलबोर्ड काउन्टडाउन' मध्ये १ ल्या क्रमांकापर्यंत पोहोचलेलं हे 'रिक'चं एकमेव गाणं. तसं हे गाणं दुसर्‍या क्रमांकावर ४ आठवडे आणि पहिल्या दहांमध्ये सुमारे १० आठवडे राहिलं पण शेवटी रिक डिजसाठी 'Disco Duck' हे वन हिट वंडरच ठरलं. काहीही म्हणा पण हे गाणं फुल्टू सॉल्लिड टाईमपास आहे आणि माझ्यासारख्या 'डोनाल्ड डक' पंख्यासाठी तर नक्कीच. तेव्हा आता या 'Disco Duck' चा आनंद घ्या.
'Disco Duck' गीत - Rick Dees: Went to a party the other night All the ladies were treating me right Moving my feet to the disco beat How in the world could I keep my seat All of a sudden I began to change I was on the dance floor acting strange Flapping my arms I began to cluck Look at me... I'm the disco duck Duck: Ah get down mama, I've got to have me a woman, ha ha ha ha ha CHORUS: Disco, disco duck Duck: Got to have me a woman CHORUS: Disco, disco duck Duck:Oh get down mama CHORUS: Try your luck, don't be a cluck, disco Duck: Disco CHORUS: Disco Duck: Disco CHORUS: Disco - disco - disco disco duck Duck: All right CHORUS: Disco disco duck Duck: Ah get down mama, oh mama shake your tail feather, ha ha ha ha ha Rick Dees: When the music stopped I returned to my seat But there's no stoppin' a duck and his beat So I got back up to try my luck Why look it's the disco Duck! Duck: Everybody’s doin' the CHORUS: Disco, disco duck CHORUS: Disco, disco duck CHORUS: Try your luck Duck: Wave to me CHORUS: Don't be a cluck Duck: I’m so happy to be here CHORUS: Disco Rick Dees: Thank you duck CHORUS: Disco Rick Dees: For gettin' down CHORUS: Disco disco disco Rick Dees: Thank you so very much CHORUS: Disco duck Duck: You're welcome CHORUS: Disco Disco Duck CHORUS: Try your luck, don't be a cluck, disco, disco, disco... वन हिट वंडर - १ -> http://www.misalpav.com/node/21895

Book traversal links for वन हिट वंडर - २ -> 'Disco Duck'

  • ‹ वन हिट वंडर - १ -> That Thing You Do
  • Up
  • वन हिट वंडर - ३ -> 'King Tut' ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2289 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

माहित नसलेली भन्नाट गाणी

प्रचेतस
Tue, 06/12/2012 - 13:04 नवीन
माहित नसलेली भन्नाट गाणी माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वल्लीशी

jaypal
Wed, 06/13/2012 - 00:05 नवीन
बाडिस. प्रास ही लेखमाला थांबवु नकोस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त माहिती...

मुक्त विहारि
Tue, 06/12/2012 - 15:01 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एकुण प्रस्थापितांच्या राज्यात

स्पंदना
Wed, 06/13/2012 - 05:37 नवीन
एकुण प्रस्थापितांच्या राज्यात कुणाचच शहाणपण चालत नाही. कहाणी समान चरित्र आवडल. अन डोनाल्ड डक म्हणाव तर त्यान तर आमच बालपण फुलवल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा