तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती
लेखनप्रकार
प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे.
निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :)
समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो...
कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो...
आपली माणसं आपलीच नाती
तरी लेखकाची वाचकास भीती
तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती ||
आजवर ज्यांची वाचली समीक्षा
भलताच त्यांचा चेव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी
तुकोबात माझा जीव होता
कळावा पिच्चर म्हणूनिया किती
लेखकच्या झूंडी इथे येती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती ||
भांबावल्यागत व्यर्थ हे वाचणं
काही काही समजत न्हाई
एक एकेकाचे लेखन बघुनी उमगलं
जसा चष्मा तसा तो पाही
थेट्राच्या कापडी अन सारखीच फिल्म
तरी लेख वेगळे, वेगळा जुल्म
ट्यार्पीचीच भक्ती ट्यार्पीचीच प्रीती
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती ||
वाचने
4812
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
वेळ जात नाहीये का रे
खरं आहे :)
हम्म.
=))
= ))))))))))) आज खर्या
आवरा !
भारीच
तु खरच चेंगट आहेस !!!
लैच
(No subject)
आश्चर्य नाही
उद्या पालखीत म्हणावं
तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ
झक्कास..
आवडले.
जबरी...!
हाण !!!!!!!!! नान्या बॅक इन
हाहाहाहाहाअ
:)
मस्त
मिपावरही २ झेंडे...
तात्याबा...... कोणता झेंडा
In reply to तात्याबा...... कोणता झेंडा by घाशीराम कोतवाल १.२
अदृश्य वावर...!
>>एक एकेकाचे लेखन बघुनी
भारी! आणि समर्पक.