'बब्र्या, कामुन आसा गपचिप बसलास ?' सडनमदी यंट्री घेत दोस्त म्ह्न्ला.
आडनिड टाईमाला आलेल्या दोस्ताला बघुन म्या म्हन्लं. 'पेपरवाले - च्यानेलवाले कवाधरनं त्या कसाबच्या नावानं दांगुडा घालुन र्हायलेत, त्याला जिता ठिवलाय, बिर्यानी खातो, खर्चा होतो. या ब्याग्राउंडवर काल त्या पुन्याच्या पोराने आजुक यका कसाबचा जीव घेत्ला, सिद्दीकी की कोन त्यो, अन तेबी डायरेक्ट अंडासेलमदेच ! कॉमन म्यान म्हन्तो बरच झालं, कसाबसारखं यालाबी सांबाळण्यापेक्षा काट्यानं काटा गेला. तिकल्ड्या साईडला फिलॉसॉफर लोकांनी तर ह्ये चुक हाये म्हन्तान्ना पार ह्युम्यानिटीलाबी क्वैश्वनमदे घेतलय. तु सांग दोस्ता जे झाले ते बरुबर का चुक ?'
म्या नॉनश्टॉप यवडं बोल्लो त्यानं दोस्त जरा शिरेस झाला भौतेक. म्हन्लां - 'बबर्या, बरुबर का चुक आसं तु डोक्यावर बसलेल्या येताळावानी ईचारु नकोस. आसं बरुबर चुक कायबी नसतय.'. पहिल्याच शेंटेन्समधे दोस्त फिलोसॉफीच्या मुडमदे गेला हे मी वळखलं. दोस्त पुढे म्हन्ला, 'ज्यांनी मारलं ती काय क्रांतिकारक म्हनुनसनी जेलात हाईत ? दादागिरी करत पार खुना दरोड्याला पोचलेली मान्सं ती, ते कह्याच देशप्रेम करुन र्हायलेत ! बाकी सिद्दीकी मेलं म्हंतोस तर ते काय बरुबर झालं न्हाई, शिश्टीमचा किती टाईम बर्बाद झाला, त्याह्याकल्डी किती ईन्फोर्मेशन किती इंपॉर्टंट आसन, त्याचं काय ?'
उल्टा क्वश्चन टाकुन दोस्त गप झाला. त्याला म्हन्लं 'गड्या तु आगदी आज फिलॉसॉफीच्या मुडमध्येच हाईस. यक सांग, आजच्या टाईमाला जी आजुक नवी अतिरेकी पोरं तयार होउन र्हाईलेत त्या दरभंगातल्या मदरश्यात, त्यांना या गोष्टीनं जानार्या मॅसेजचं काय ? '
दोस्त जरायेळ गप झाला, म्हन्ल 'झिरोत गेला की काय ?'. पटदिशी हुबा र्हायला न म्ह्न्ला 'सांजच्याला लाय्ब्ररीत ये मंग बोलु'.
दोस्त तर टांग मारुन गायब झाला, गड्याहो तुमी काय म्ह्न्ता ?
वाचने
3915
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही नाव घेतलयं बब्रुवाहन,
कसं
In reply to तुम्ही नाव घेतलयं बब्रुवाहन, by गणामास्तर
बदल्ल रे भो
In reply to कसं by बब्रुवान
=))
स्वागत! ष्टाईल आवाल्डी!
+१, इश्टाईल आवडली
In reply to स्वागत! ष्टाईल आवाल्डी! by बिपिन कार्यकर्ते
तुमी बरोबर बोल्ता भाउ.
In reply to +१, इश्टाईल आवडली by बहुगुणी
तसं बी
In reply to +१, इश्टाईल आवडली by बहुगुणी
थँक्यु
In reply to स्वागत! ष्टाईल आवाल्डी! by बिपिन कार्यकर्ते
जगात चूक बरोबर असं काहीच
In reply to थँक्यु by बब्रुवान
आसं
In reply to जगात चूक बरोबर असं काहीच by बिपिन कार्यकर्ते
लोकशाहीय! कुनीपन कायपन बोलू
In reply to आसं by बब्रुवान
सदर लेखनाची 'मराठवाडी'
In reply to स्वागत! ष्टाईल आवाल्डी! by बिपिन कार्यकर्ते
व्हयं
In reply to सदर लेखनाची 'मराठवाडी' by गणामास्तर
=)) =))
मेलं तं मेलं बेनं! आन ते
ष्टाईल आवडली
कधी कधी फिलॉसॉपी पेक्षा
उत्तम धागा, एक महत्वाचा विषय
आता हाय का