साहित्य :
कोळंबी - १/२ किलो
लिंबाचा रस
केशर
२ टीस्पून गुलकंद
आलं - लसून पेस्ट १ चमचा
३-४ कांदे बारीक चिरलेले
४-५ टोमॅटो बारीक चिरलेले
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
कढीपत्ता काही पाने
१ टेस्पून कसूरी मेथी
बारीक चिरलेली कोथींबीर
बारीक चिरलेला पुदिना
२-३ टेस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
लवंग , काळी मिरी आणि दालचिनी
मोकळा शिजवलेला भात.
मीठ चवीनुसार
पाककृती :
कोळंबीला लिंबाचा रस आणि मीठ लावून मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे. कमीत कमी १ तास ठेवली तरी पुरे आहे. कोळंबी छोटीच असेल तर चांगली, मला मिळाली नाही म्हणून मी मोठी कोळंबी घेतली आहे.
एक छोटी वाटी पाणी घेऊन त्यात गुलकंद आणि केशर घालून ठेवावे.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंग, काळी मिरी , दालचिनी, आले-लसूण पेस्ट , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर परता.
त्यावर लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद ,कसूरी मेथी घाला व सगळा मसाला तूप सुटेपर्यंत परता.
नंतर त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घाला. याला चांगली वाफ सुटून कोळंबी तशीच शिजून द्या.
कोळंबी शिजल्यावर त्यात मोकळा शिजवलेला भात आणि गुलकंद आणि केशर चे पाणी घालून वाफवून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घाला.
प्रॉन्स बिर्याणी तयार ! !
वाचने
11165
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंपासु.
फटूच्या लिंक गंडल्या काय हो
छान छान! मिसळपाववरचा हा पहिला
समस्त मस्त
वाह!
+१ हेच बोल्तो...
In reply to वाह! by दिपक
परांचा
त्या कढईतले
केशर आणि गुलकंद मिश्रित पुलाव
अरेरे..!
In reply to केशर आणि गुलकंद मिश्रित पुलाव by निनाद मुक्काम …
घरी नेमून दिलेली कामे न करता
In reply to अरेरे..! by प्रभाकर पेठकर
शुभेच्छा..
In reply to घरी नेमून दिलेली कामे न करता by निनाद मुक्काम …
तरी बरंय कॅथ्रिनवैनींना मराठी
In reply to शुभेच्छा.. by प्रभाकर पेठकर
प्रतिक्रियांबद्दल , मनापासून आभार....
मस्त !!