देह
मृत्यू या लेखावर बरीच चर्चा झाल्यानं हा लेख इथे देतोय.
बिफोर वी स्टार्ट दोन गोष्टी क्लिअर करतो; पहिली गोष्ट, हा शरीराचा विश्लेषणात्मक अभ्यास नाही तर विदेहत्व समजलेल्या व्यक्तीचं रोजच्या जगण्याला उपयोगी व्हावं असं शरीराचं आकलन आहे आणि दोन, "आपण कधीही शरीर होत नाही, आपल्याला शरीराची जाणीव असते" या वस्तुस्थितीचं सतत भान असणं तुमच्या जवळजवळ सर्व शंकांचं निरसन करेल.
अस्तित्वातलं सर्व प्रकटीकरण शून्यातनं (किंवा अवकाशातनं ) होतं त्यामुळे ते निराकार आणि सर्वव्यापी अवकाश सतत प्रत्येक आकार अंतर्बाह्य व्यापून आहे, म्हणजे आपल्याला आपण शरीर झालो (किंवा शरीर आहोत) असं वाटत असलं तरी मूळात आपण निराकार आहोत हा सर्व आध्यात्माचा केंद्रिय सिद्धांत आहे.
थोडक्यात शून्य हे आपलं स्वरुप आहे आणि आपण शरीर आहोत असं वाटणं हे स्वरुपाचं विस्मरण आहे. विस्मरण अस्वास्थ्य निर्माण करतं पण स्वरुप बदलू शकत नाही हा पहिल्या सिद्धांताचा पर्यायनं येणारा उपसिद्धांत आहे.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण शरीर भासत असलो आणि तसेच जगत असलो तरी मूळात आपण शून्य आहोत आणि राहतो त्यामुळे हा उलगडा होणं प्रत्येकाला सहज शक्य आहे. ते रहस्य नाही, आता या क्षणी असलेली वस्तुस्थिती आहे.
लेखनचा हेतू - शरीराबरोबर मजेत कसं जगावं, शरीराविषयी नक्की काय दृष्टिकोन असावा आणि शरीर ही कशी कमालीची साधी आणि अफलातून रचना आहे हे समजावं असा आहे.
______________________________
पहिली गोष्ट, आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत. आपल्याला आपण केवळ शरीराच्या आत आहोत असं वाटतं पण वस्तुस्थिती तशी नाही, हे शरीर समजून घ्यायला अत्यंत उपयोगी आहे. थोडक्यात शरीर कार सारखं आहे, कार आपल्याला इकडून तिकडे नेते खुद्द आपण हालत नाही आणि आपण कारच्या आत काय आणि बाहेर काय सारखेच असतो तसा फिनॉमिना आहे. फक्त सतत कारमधेच बसलेल्यामुळे आणि कार हीच आपली ओळख झाल्यामुळे आपल्याला आपण कार आहोत असं वाटतय.
मूल जन्मल्यावर त्याचं पहिल्यांदा जेव्हा लक्ष वेधलं जातं तेव्हा त्याला `आपण आहोत' ही जाणीव होते आणि मग कुठे आहोत? तर शरीरात! अशी जी सुरुवात होते ती मग शेवटापर्यंत तशीच राहते.
म्हणजे शरीर चाललं की आपणच चालतोय असं वाटतं, शरीराला भूक लागली की आपल्यालाच भूक लागली असं वाटतं आणि मृत्यूपर्यंत तर हे तादात्म्य इतकं गहन झालेलं असतं की आपणच मरतोय असं वाटतं.
आपण शरीराच्या आत आहोत म्हणून बंदी झालोत असं वाटतं आणि शरीराचं ओझं वाटतं. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत याची नुसती दखल घेणं जगण्याचा सगळा रंग बदलतं, तुमचा मूड दिवसभर एकदम लाइट राहतो.
_____________________________
दुसरी गोष्ट, शरीर हे केवळ तीन मूलभूत प्रक्रियांनी सक्रिय आहे: श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन. या तीन प्रक्रिया जर सक्षम असतील तर पूर्ण शरीर आरोग्यदायी राहतं.
श्वसन उत्तम राहण्यासाठी दोन अत्यंत सोपे उपाय आहेत एक : प्राणायाम (भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोमविलोम) आणि दोन खेळ (टेबलटेनीस सर्वोत्तम).
सर्वात सोपा प्राणायाम म्हणजे पाठ टेकून कुठेही शांत बसा आणि तोंडानं श्वास पूर्णपणे सोडा. जेव्हा श्वास पूर्ण बाहेर जाईल तेव्हा पोट पाठीकडे ओढलं जाईल मग फक्त तोंड बंद करा की नाकानं श्वास आत येईल. ही क्रिया तुम्ही खाल्यानंतरचे दोन तास सोडून केव्हाही आणि कुठेही करू शकता. श्वासाचा जोम कमी होण्याच एकमेव कारण म्हणजे उत्छ्वासाची प्रक्रिया शिथिल होणं आहे. तुम्ही उत्छ्वास जितका जाणीवपूर्वक आणि संपूर्ण कराल तितका श्वास सखोल होईल. केवळ दहा मिनीटात तुम्हाला उत्साह वाटायला लागेल. या प्रक्रियेत श्वास रोखणं नसल्यानं ती कुणीही निर्धास्तपणे करू शकतं.
खेळणं व्यायामापेक्षा जास्त उपयोगी आहे कारण व्यायाम बंधन वाटतो, खेळाचं तसं नाही आणि चांगला ग्रुप असेल तर खेळणं दिवसाची धमाल सुरुवात करतं. प्राणायाम आणि खेळ श्वसन उत्तम ठेवतात. टेबलटेनीस मन आणि शरीर (विशेषतः डोळे) यांचा सहज समन्वय साधून देणारा हलका आणि वर्षभर, कोणत्याही वेळी आणि ऋतूत खेळता येणारा खेळ आहे. टेबलटेनीस इच्छा असेल तर कोणत्याही वयात शिकता येतं.
अभिसरणासाठी योगासनाला पर्याय नाही. (१) पोटावर दाब येईल अशी आसनं (वज्रासनात हाताच्या मुठी पोटाशी ठेवून कपाळ समोर जमिनीला टेकवणं), (२) मांडी घालून बसून शरीराच्या वरच्या भागाचं रोटेशन (पिंगा), (३) त्याच स्थितीत मानेचं रोटेशन, (४) त्याच स्थितीत पावलांचं रोटेशन (५) खांद्यांचं रोटेशन आणि (६) बसून किंवा उभ्यानं पायाचे अंगठे धरणे या सहा प्रक्रियांनी संपूर्ण शरीर लवचीक ठेवून अभिसरण उत्तम ठेवता येतं आणि ते उत्सर्जनाला अत्यंत उपयोगी ठरतं.
उत्सर्जन ही क्रिया सर्वस्वी: (१) शरीराची लवचीकता, (२) भरपूर आणि अनेकवेळा पाणी पिणं (३) श्वसनाचा जोम आणि (३) शरीराला रुचेल असा पूर्ण समाधान देणारा आहार यावर अवलंबून आहे.
श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन या तीन प्रक्रिया उत्तम असतील तर पूर्ण मानसिकता विधायक होऊन इंडोक्राईन सिस्टिम (ग्रंथीस्त्रावाची प्रक्रिया) सक्षम राहते आणि कायम उत्साह वाटतो. उत्साह हा आरोग्याचा एकमेव मानदंड आहे.
_________________________
संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण असल्यामुळे अत्यंत मनस्वी आहार हा जीवनातला फार मोठा आनंद आणि आरोग्याचा आधार आहे. आहार या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि संपूर्ण दुर्लक्षित घटक भूक आहे. एक गोष्ट मी अत्यंत निश्चिंतपणे सांगू शकतो की भूके ऐवजी ` वेळ' हा भोजनाचा निर्णायक घटक केल्यानं आणि `चव' या नैसर्गिक संवेदनेएवजी `घटक पदार्थांचं विश्लेषण' करत बसल्यानं भोजनातली मजा संपली आहे.
______________________________________
विश्रांतीचं मुख्य सूत्र मानसिक प्रक्रिया जवळजवळ थांबणं हे आहे, झोपण्यापूर्वी सर्व कामं होताहोईल तो संपवणं हा मानसिक प्रक्रिया चालू न राहण्याचा एकमेव मार्ग आहे; न झालेली कामं माणूस मनानं करत राहतो आणि ते विश्रांती न मिळण्याचं कारण आहे.
___________________________
प्रत्येकाची व्यक्तीगत ध्येय निरनिराळी असली तरी निसर्गाचा एकमेव उद्देश पुनर्निर्मीती आहे (to proliferate itself) त्यामुळे सक्षम शरीरात प्रणयाची शक्यता नेहेमी जागृत असते. प्रणयाची क्षमता किंवा उर्जा माणूस सृजनासाठी वापरू शकतो मग ते गाणं असेल, कविता असेल, गद्य लेखन असेल किंवा चित्रकला असेल, ज्यात तुम्हाला गती आणि रूची आहे अशा कोणत्याही प्रकारचं सृजन तुम्ही करू शकता.
आपण शरीर झालो नाही किंवा होत नाही, आपल्याला `शरीर आहे' ही संवेदना आहे. निसर्गानी शरीर हे आपल्याला दिलेलं साधन आहे त्याचा सृजनासाठी, अभिव्यक्तीसाठी आणि मजेत जगण्यासाठी उपयोग करा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुंडलीकवर्दाहारीविठ्ठल
विचार करायला लावणारा लेख.
डायवर कोन हाय
पहिला भाग समजला नाही
'डायवर कोन हाय?' आणि लायसन?
आधीच जास्त झालीय. यकु हे
उपरोक्त लेखाचे विरुपण करुन
विरुपण? तुम्हाला निरुपण
ओ ताई, ते सोडा, आधी मूळ
हो हो मला निरुपण म्हनायचे
:yawn:
'देहा' वरच्या धाग्याशी आपल्या
देह देवाचे मंदीर
दोन बोळे आठवले पहिला भाग वाचून
आदि, एक तर तुम्हाला लेख समजला नाहीये
आयच्या गावात...
अर्धवटराव, आदि म्हणतोय तसं दारू हे जर सर्व प्रश्नांचं उत्तर असतं
:)
पेग शॉर्टकट आहे पण उतरला की प्रश्न उभे आहेतच, जाताय कुठे?
ही तो मानवाची इच्छा !!!
अराशी व्य.नि.तून झालेल्या चर्चेवरुन लेखाचा पहिला भाग वाचकांना
मस्त.
जरा जपून हं
छान
अस्तित्वातलं सर्व प्रकटीकरण
हे समजून घेणे फारच सोपे आहे.
क्या बात है
डांगे आण्णा दंडवत स्विकारा गरिबाचा