Skip to main content

"गांधीजींनंतरचा महान नेता"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/06/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे. या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच आहेत.. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे. समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे. असो बघू यात नेमके काय होते ते.. स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते. पण दुसर्‍या अंगाने ते बरेच झाले कारण या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे आणि सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?. आले वागळेच्या मना तेथे कोणाचे चालेना

वाचने 21381
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

अहो कसला तो IBN आणि कसला तो माहिमचा वागळे घे॑वून बसलात? हल्ली बर्‍याच वर्षांनी बघितला टी.व्ही.वर. डोक्यावरचे केस कमी झालेत आणि सोनेरी फ्रेमचा चष्मा आलाय. आता ज्येष्ठ पत्रकार वाटतो.

>>>डॉक्टर साहेब म्हणजे नक्की कोण??????? >>>सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?. तुम्हाला नक्की काय वाटते???????? असो. लोकमत ग्रुपच्या दर्डांची निष्ठा कुठे वाहिलेली आहे हे जगजाहीर असल्याने आश्चर्य वाटले नाही की राग आला नाही. बाकी तुमचा रोख जर लौकर स्पष्ट करा.

आता तुम्हीच म्हनले ते गांधिजींपेक्षा महान हुते म्हनुन , मग आनि आय बी एन च्या यादीत त्यांचे नाव का नाही, म्हनुन परत धागाही काढलात..

In reply to by सुनील

गहू, तान्दूळ, डाळ, रवा, शेवया.. इ. सारख्या नेहमी लागणार्‍या अन्नधान्यासाठी "दर्डा" ची क्वालिटी अत्युत्तम असून ते आर्थिक दृष्ट्याही आम्हाला मॉलपेक्षा किफायतशीर वाटते!!!! :) त्यामुळे "दर्डा"कडे न मिळणार्‍या गोष्टी आम्ही मॉलमधून आणतो!! :)

In reply to by सुनील

तुम्ही जिलब्या कुठून आणता? आम्ही बर्‍याचदा रसमलाई, काजूकतली वगैरे आणतो!!!....जिलबी आम्हाला जास्त आवडत नाही!!! मागे एकदा कुठल्याश्या थन्डीतल्या सणाच्या दिवशी दान्डेकर पूलावर काही गरीबांना आम्ही जिलब्या वाटल्या होत्या.... ;) बाकी आपण कुठून आणता जिलब्या? :)

In reply to by मृत्युन्जय

त्यानी डॉक्तरसाहेब असा उल्लेख केला आहे, ते बहुदा तेच असावेत. याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते... आणि हे इचारतात ते कुणीतरी आहेत ते सावरकरांचं का नाव घेत नाहीत? :) का, नुसतं डॉक्टर असे म्हनुन संशयाचा फायदा हेगडेवाराना द्यायचा डाव आहे की काय? :)

In reply to by JAGOMOHANPYARE

काय मिस्टर मारोपिछेसेसारे ?? परत वेडाचा झटका आला वाटते?? की ब्रिगेड विचारसरणी ची कावीळ उमळली परत?? :sick: काळजी घ्या ब्वॉ ... :crazy:

In reply to by JAGOMOHANPYARE

याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते.
या साठी न चुकता रोज ते वैद्यांचा पाटणकर काढा घेत असतात सकाळ-संध्याकाळ ;-) . . . . . . . (लुगडेवार )

धाग्याची शंभरी लवकर गाठण्यासाठी माझा खारीचा वाटा .....

आर्थिक परिस्थितीला घरघर लागलेल्या चॅनेलचे पैसे मिळवण्याचे प्रयत्न असतात असल्या एसएमएसने स्पर्धा आयोजित करण्याच्या कल्पना... . सोडून द्या ! :) किंवा एक काम करा त्यांना मदत म्हणून रु.१/- (रुपये एक मात्र) चा चेक पाठवून द्या. :)

In reply to by संजय क्षीरसागर

मी का नाही आज फुला फुलांचा रंगीबेरंगी शर्ट घातलाय आणि मला तद्दन टुकार चारोळ्या पण सुचत आहेत.

In reply to by नाना चेंगट

पाडा जिलब्या पटापट प्रतिसाद मिळतील सटासट संपादक धावतील झटाझट पंख लागतील फटाफट 'ट' वृत्तातली आणि 'टा' गणातली ही चारोळी नानाला समर्पीत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फट तिथे खटपट भाता चाले रटरट आमचा नेता नटखट बोंबा मारे पटपट आमचे बडबडगीत पराला समर्पित.

In reply to by मृत्युन्जय

आमचे बडबडगीत पराला समर्पित.
हे गर्दूलविकृतीडीत वृत्तातील गीत अतिशय आवडले.

In reply to by JAGOMOHANPYARE

गांधीनंतर कोण???? इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी
... ओह याssss... राजीव गान्धी!!!!... .. राजीव'जी इज ( माईट बी ओन्ली) द पर्फेक्ट मॅन आफ्टर मोहनदास करमच्न्द गान्धी!... .दॅट्स व्हाय.....आय लव हिम सो मच!!!.... राजीव'जी.. इवन इफ आय डोन्ट लाईक 'बनाना'....बट......................खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजकाल तुमची आठवण येते!!... प्लीज कम बॅक.. (इफ पॉसिबल)!!!! तुमच्या वेड्या मुलाकडे पाहिलं.. की देशापेक्षा त्याच्याच भविष्याची जास्त चिन्ता वाट्टे! ;) ओह.. जोक्स अ पार्ट........बट... राजीव'जी....स्टील वी लव यु... मिस यु!!!!!! :) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

In reply to by JAGOMOHANPYARE

थोडक्यात तुमचा ब्राह्मणांवर जो राग आहे तो कशाही प्रकारे निघालाच पाहीजे.. बाकी सावरकरांवर बरंच लिखाण वाचलंय त्यामुळे वरचा मुर्खपणा बाद.

In reply to by JAGOMOHANPYARE

त्यात पण मोहन आलाच.. किती रे गाधीं प्रेम ऊतु जाते तुझे... प.पू. नथुरामजी आज हवे होते आज, म्हणजे या मोहनला ही जागो च्या जागो भगवान को प्यारे केले असते.. :cry:

In reply to by JAGOMOHANPYARE

इथे काय संदर्भ? हे अधिकृत दस्तावेज आहेत काय? मला तरी वाटते कोल्हापुरच्या शाहुच्या सुनहर्‍या कहाण्यांइतकेच तथ्य आहे यात. काय म्हणता?

In reply to by मृत्युन्जय

त्याच्या वर एक धागा निघु देत.. प्रतिक्रियन्ची डबल सेन्चुरी झालीच म्हनुन समजा.. :wink:

In reply to by कौतिक राव

होय होय मी त्याच कहाण्यांबद्दल बोलतो आहे. कोल्हापुरात गेल्यावर मी प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

मे महीन्याच्या सुट्ट्यान्मधे त्या ऐतिहासिक कहाण्या चवीने चावल्या जाय्च्या.. तुम्च्या मुळे आज त्या सुखद आठवणी परत ताज्या झाल्या.. :)

In reply to by मृत्युन्जय

'मर्दानी आणि मैदानी व कसरतीच्या' या खेळांमुळे मीदेखील प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. हे खरे पौरुष! त्यापुढे शनिवारवाड्यातली "ती" वरणभात घट**की म्हंजे किस घटकी **की :P

In reply to by JAGOMOHANPYARE

याच लेखाच्या खाली हे लिहिले आहे. ते वाचले असेलच (' आऊटलूक ' च्या या अंकातच गांधी हत्या कटातील सावरकरवाद्यांच्या सहभागाविषयी पूर्ण विरुद्ध भूमिकाही मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राचे संपादक असणा-या तरुण विजय यांचा लेखही तुम्हाला ' सलाम सावरकर ' मध्ये वाचता येईल) अर्थात आपल्या पूर्व-निष्कर्षाला सोयीचे तेवढेच वाचणार्‍या तुम्ही दुसरी बाजू वाचण्याची तसदी घेतली नसेल याची खात्रीच आहे.

गांधीं"नंतर"चे म्हणजे ३० जानेवारी १९४८ नंतर महान समजले केलेले का?

>>बाकी आपण कुठून आणता जिलब्या? दान्डेकर पुलावरून दांडेकर पुलाखालीही उत्तम प्रतीच्या मिळतात जिलब्या

In reply to by नर्मदेतला गोटा

अहो आता कुठे ३२ खपल्यात. अजून ६८ बाकी असतीलच ;) पण तरी काही भरवसा नाही. काही ठिकाणच्या मंडळींना "उपलब्ध आहेत" पेक्षा "संपले" अश्या पाट्या लावण्याचाच उत्साह जास्त !!

In reply to by अविनाशकुलकर्णी

यामध्ये 'कुमारी सुशेरी बेहेन मायावती' यांचे नाव नसल्याबद्दल तीर्व निशेध!! हा समस्त स्त्री जातीवर अन्याय आहे!..

In reply to by अविनाशकुलकर्णी

या लिस्ट मध्ये काहीतरी कट शिजत असल्याचा वास येत आहे. कारण रजनीकांत २० व्या क्रमांकावर आहे. ते शक्यच नाही. गांधीजींच्या आधी, वेळेस आणि पश्चात फक्त एक आणि एकच महान नेता आहे आणि तो म्हणजे रजनीकांत!
------------

In reply to by अविनाशकुलकर्णी

नेत्यांच्या यादीत सचिन, तेंडुलकर, कलाम, मदर तेरेसा आणि जे आर डी टाटा यांची नावं पाहून मौज वाटली. यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध.

In reply to by नितिन थत्ते

+१ सहमत!

In reply to by नितिन थत्ते

आँ!!! सुधीर मुतालिक?? चिच्चा, बिच्चारे जीव देतील हो हा प्रतिसाद वाचून. बरं चिच्चा ते चिच्चा.. प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत? अवांतरः तुम्हाला प्तमोद मुतालिक म्हणायचं आहे का?

In reply to by मस्त कलंदर

प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत? ऋ बद्दल ऋ च सांगेल! :-) पण मी विचार केला, नितिनराव म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार म्हणून नेहमी प्रमाणे सहमती दाखवली. ;)

In reply to by विकास

त्याला मिपाच्या भाषेत बाडिस असे म्हणतात!

In reply to by नितिन थत्ते

यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध. >>>>>> =)) =)) =)) =)) हसून हसून जीव गेला की ओ थत्तेचाचा !! ;) मायला काही कंट्रोल ठेवत जा की ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

मुलायम , लालू, इमाम बुखारी, निहाल अहमद, टिपू सुलतान, औरंग्जेब, राघोबादादा,जावळीचेमोरे वगेरे लोकांची नावे असती तर लज्जत आली असती पोल ला...

डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता, कष्ट, त्याग, समाजासाठी व लोकशाहीसाठीचे योगदान, त्यांचा दूरदर्शीपणा व इतर अनेक गोष्टी... या यादीमध्ये माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटले. त्यांच्या दूरदर्शीपणाची फळे आज आपण उपभोगतो आहे.

पहिल्या फेरीमध्ये १० मते देता येतात. त्यापैकी ९ मते मी दिली. माझी ९ मते: (in no particular order) जवाहरलाल नेहरू, Dr. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, होमी भाभा, विक्रम साराभाई, Sam Manekshaw, इला भट, बाबा आमटे , मदर टेरेसा. या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले. तसेच भारतीय judiciary मधील कोणाचेच नाव नाही हे बघूनही वाईट वाटले. निदान न्यायमूर्ती हंसराज खन्ना, (त्यांच्या डाव्या विचारांना समर्थन नसले तरी) न्यायमूर्ती कृष्ण अय्यर किंवा एस. एम. सिकरी यांच्यासारखी नावे या यादीत हवी होती असे वाटते. निदान bollywood मध्ये अंगप्रदर्शनाची लाट आणणारे राज कपूर किंवा रजनीकांत यांच्यापेक्षा या धुरीणांचे योगदान अधिक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by क्लिंटन

नेहरु? का बॉ? नेहरुंनी तर गांधींना ब्लॅकमेल करुन पंतप्रधानपद पदरी पाडुन घेतलं म्हणे! काश्मीर प्रश्नाचं घोंगडं अजुन भिजकटच आहे.. :( आग्रह नाही पण कारण सांगितलं तर आवडेल.

In reply to by शिल्पा ब

अगदी बरोबर आपले नेते सुब्रमण्यम स्वामी ज्यांनी नुकताच ३जि घोटाळा बाहेर काढला त्यांनी पाकिस्तानी वाहिनीवर लाइव मुलाखतीत आय एस आय च्या माजी प्रमुखांना सांगितले की ते नेहरू आणि त्यांनी युन मध्ये नेलेला काश्मीर प्रश्न अजिबात मानत नाही त्यामुळे घोगड भिजत पडलाय. नेहरू ह्यांनी हा निर्णय लोकशाही पद्धतीने सल्ला मसलत न करता घेतला हे देखील सांगितले.