डुबुकवड्यांची आमटी
मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
घरची गरम मसाला पावडर आवडत असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती:
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला चिकटला नाही म्हण्जे मसाला चांगला परतला गेला असे समजावे. नंतर जरुरीपुरते पाणी घालावे. व ही आमटी एकीकडे उकळु द्यावी. आधी जोरात करुन एकदा उकळी फुटली की बारीक गॅसवर. म्हण्जे आमटीला तेल चांगले सुटते.
आता डुबुकवड्यांसाठी:
वाटीभर बेसन पाणी टाकुन आणि वरील जिन्नस टाकुन म्हणजे ओवा, मीठ, हवं असल्यास लाल तिखट, हळद, भजीच्या पीठासारखं किंवा त्याहीपेक्षा थोडसं घट्ट एकजीव कालवावं.
आणि ही आमटी चांगली उकळली की त्यात भजीसारखे थोडे थोडे सोडावे. नंतर आमटीत या डुबुकवड्यांना खाली वर करुन शिजु द्यावे. चमच्यात घेउन शिजले की नाही हे बघता येईल.
वरुन कोंथिंबीर बारीक चिरुन घालावी व पुन्हा एक उकळी घ्यावी. गॅस बंद करावा.
भात, चपातीबरोबर ही खाता येते.
फोटो मोबाईलवर काढल्याने क्लॅरीटी नसेल. तरी समजुन घ्या लोक्स!
आमच्याकडे व्हेजवाल्यांसाठी रविवारी हा पदार्थ असतो. पटकन होण्यासारखा कारण नॉनव्हेजींसाठी वाटलेला मसाला तयार असतो.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे
फोटो मोबाईलवर काढल्याने क्लॅरीटी नसेल. तरी समजुन घ्या लोक्स!
आमच्याकडे व्हेजवाल्यांसाठी रविवारी हा पदार्थ असतो. पटकन होण्यासारखा कारण नॉनव्हेजींसाठी वाटलेला मसाला तयार असतो.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
डुबुकवड्यांची आमटी थंड झाली की घट्ट होत जाते. म्हणुन पाणी आधी थोडेसे जास्त घालुन भरपुर उकळु द्यावे
वाचने
15148
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
रंग बघून जीव गेला.. आम्ही
खल्लास !
आहाहा!
करु करु एकदा करु कधीतरी. भारी
अहा!
पोळी....
In reply to पोळी.... by सूड
ही रेसिपी म्हणजे गोळ्यांच्या
In reply to पोळी.... by सूड
ही रेसिपी म्हणजे गोळ्यांच्या
मस्त ....डुबुक वडे..ढकल
नाव भारी आवडलं. आमटी छान
हाय हाय... क्या खत्री दिख रहा
आमच्याकडेही वरचेवर ही आमटी
छान
लहानपणी गावाला खाल्ले होते
का सकाळी सकाळी भुका चाळवायला
In reply to का सकाळी सकाळी भुका चाळवायला by गणपा
बघा बघा! कोण बोलतंय
व्वा झक्कास आमटी
डुबुकवड्यांची आमटी....
डुबुकवडे , चुमुकवडे ,
मस्त आहे पाकृ
क्या बात है!
म् स्त.......
हे