✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काय चुकतंय ?

व — वैशाली ., Sun, 06/03/2012 - 20:17
हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी काढून टाकावी ह्या मनावरून.. तसंच हे आयुष्य!! ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ?? आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला.. आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय.. कळत नाहीये पण काहीतरी वेगळं चाललंय.. मी जे आता दुखाचे हुंकार गातेय ते चुकीचे कि कधी सुखात चिंब भिजायचे ते चुकत होतं.. हि आजची मानसिक कुरूपता चुकीची कि कधी वाटून गेलेली सुंदरता... चुकीचा तो ओला श्वास कि तो ओला गंध मदिर? ते जत्रेत हरवलेला पोर चुकलं होतं कि दोष त्या सुसाट वाऱ्याचा होता .. मी आज फुकट बसलेय ते चुकतंय कि ह्याआधी १२-१२ तास काम करायचे ते चुकत होतं.. आज उगीच कुणावर जीव भाळावं वाटलं हे चुकलं, कि आधी झालेला प्रेमभंग चुकिचा? त्या अथक प्रयत्नांना आलेला अपयश चुकीचं कि ते प्रयत्नच चुकीचे ! कालचा दिवस जाता जाता मला हूर हूर लावून गेला .. रखरखीत वाटला होतं.. आज तोच मला सुंदर वाटतोय!! मग चुकतंय कुठे ?? नक्की चुकतं आहे ना ???

प्रतिक्रिया द्या
2661 वाचन

💬 प्रतिसाद (20)

छान

शैलेन्द्र
Sun, 06/03/2012 - 21:31 नवीन
:) छान
  • Log in or register to post comments

आभारी :)

वैशाली .
Mon, 06/04/2012 - 10:21 नवीन
आभारी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

कायतरी चुकल आहे हे नक्की....

पक पक पक
Sun, 06/03/2012 - 22:09 नवीन
कायतरी चुकल आहे हे नक्की.... ;) आयुष्याच गणित हे बरेचदा चुकलेलच असतं.. :) अन जे उत्तर मिळत तेच बरोबर आहे अस मानायच असत.. :) बाकी छान आहे.....
  • Log in or register to post comments

बरोबर उत्तराचीच वाट आहे..

वैशाली .
Mon, 06/04/2012 - 10:22 नवीन
बरोबर उत्तराचीच वाट आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@मग चुकतंय कुठे ?? नक्की

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/03/2012 - 22:15 नवीन
@मग चुकतंय कुठे ?? नक्की चुकतं आहे ना ??? >>> अश्याच अजुन २/४ कविता लिहा,सगळं बरोब्बर वाटायला लागेल. ;-)
  • Log in or register to post comments

@मग चुकतंय कुठे ?? तुमच्या

पक पक पक
Sun, 06/03/2012 - 22:20 नवीन
@मग चुकतंय कुठे ?? तुमच्या समोर व्यक्त केलं हेच चुकलं ,आता सुधारतील पुढ्च्या वेळेला... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नक्कीच ! :)

वैशाली .
Mon, 06/04/2012 - 10:21 नवीन
नक्कीच ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

आयुष्याच गणित हे बरेचदा चुकतच

रघु सावंत
Sun, 06/03/2012 - 23:32 नवीन
आयुष्याच गणित हे बरेचदा चुकतच . पण पुन्हा पुन्हा आपण आयुष्याच गणित आयुष्याचा सारिपाठ मांडायचा असतो. बाकी कविता छान आहे. रघू
  • Log in or register to post comments

तुमचा नक्की प्रॉब्लम काय आहे?

संजय क्षीरसागर
Sun, 06/03/2012 - 23:41 नवीन
इथे उत्तरं देणारे एकसोएक आहेत पण तुम्हाला प्रॉब्लमच आयडेंटिफाय करता येत नसेल तर कठीण आहे >P.S. : इस घटना के सभी पत्र काल्पनिक है !! इस घटना का किसीभी जीवित या मृत व्याक्तिसे कोई लेना - देना नहीं !! ही सही आहे की डिस्क्लेमर? का सगळंच "असच कहितरि" मग "काय चुकतंय ?" कुणाला विचारताय?
  • Log in or register to post comments

कवितेच पहिल वाक्य की ओळ

स्पंदना
Mon, 06/04/2012 - 08:06 नवीन
कवितेच पहिल वाक्य की ओळ म्हणुया? जे काय असेल ते खुप छान, पण पुढे विस्तार नाही जमला एव्हढा. तरीही.....एका वाक्यावरुन अपेक्षा वाढल्यात म्हणेन मी.
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी लिहितेय..

वैशाली .
Mon, 06/04/2012 - 10:20 नवीन
खूप दिवसांनी लिहितेय.. त्यामुळे कदाचित.. सहजीकता यायला अजून १-२ टुकार कविता लिहायला लागतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

डायरी!

संजय क्षीरसागर
Mon, 06/04/2012 - 11:59 नवीन
डायरीमुळे घरच्या घरी चांगली प्रॅक्टिस होते असा अनेकांचा अनुभव आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली .

टुकार?

स्पंदना
Mon, 06/04/2012 - 18:26 नवीन
टुकार कश्या करता? मला पहिली ओळ अतिशय भावली. मनावरच शरीर उतरवण ही कल्पना अतिशय भावनात्मक आहे. झालय एव्हढच की त्या पुढ थोडा वेळ देउन मग लिहिल असत तरी चालल असत. एकदा अशीच अडकले होते. मग एका जाणत्या व्यक्तीकड संताप व्यक्त केला. तर त्यांनी सांगितला, "फिटे अंधाराचे जाळे .." या काव्याच्या पुर्णतेचा काळ. 'रान जागे झाले सारे..' या अंतरा नंतर दुसरा अंतरा सुचायला तब्बल सहा महिने लागले, अन तेव्हढे देउन हे काव्य पुर्ण केल गेल. ही गोष्ट लक्षात घेउन मी जेंव्हा जेंव्हा हे गाण ऐकते , तेंव्हा तेंव्हा पुन्हा नव्यान सलामी जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली .

तेच तर सांगितलय

संजय क्षीरसागर
Tue, 06/05/2012 - 01:21 नवीन
सध्या डायरी वापरा आणि एकदा जमलं की इथे टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 12:02 नवीन
फार आशेने धागे उघडतोय. हेच बहूदा चुकतंय.
  • Log in or register to post comments

बरा आलास!

संजय क्षीरसागर
Mon, 06/04/2012 - 12:14 नवीन
डायर्‍या आहेत ना शिल्लक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

संपत आल्या आहेत.

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 12:17 नवीन
डायरीया जाम फोफावला आहे हो आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असा आरशात बघून वैफल्य

कवितानागेश
Mon, 06/04/2012 - 12:31 नवीन
असा आरशात बघून वैफल्य जाणवण्याचा एक प्रसंग 'फॅशन' मध्ये आहे. तो अंगावर येतो खूप.
  • Log in or register to post comments

दोन चार परिक्रमा करून बघा...

भडकमकर मास्तर
Mon, 06/04/2012 - 13:53 नवीन
दोन चार परिक्रमा करून बघा... दीक्षा मिळेल, बरे वाटेल...
  • Log in or register to post comments

अच्छा परिक्रमा होय मला आधी

नाना चेंगट
Mon, 06/04/2012 - 13:54 नवीन
अच्छा परिक्रमा होय मला आधी वाटले दोनाचे चार करा बरे वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा