'चटका' लावणारा चंदेरी किल्ला
ऐन उन्हाळ्यात शरीराचे हाल हाल करायला कुठल्या किल्ल्यावर जायचं असा विचार करत होतो तेवढ्यात लक्षात आलं, अरे बरेच वर्षात चंदेरीला भेट झाली नाही, ठरलं तर मग या शनिवारी चंदेरी करून टाकू. मी आणि सुजित तर तयार होतोच पराग आणि भूषण सुधा येतो बोलले, मग काय शनिवारी पहाटे ७ वा. कर्जत local पकडली आणि ८.०० च्या सुमारास वांगणी स्टेशनला उतरलो. आमच्या पाठीवरच्या ओझ्यांकडे पाहून रिक्षावाल्यांमध्ये एकदम चलबिचल झाली. वांगणी स्टेशन बाहेरच वडापाव आणि चहा घेतला, तोपर्यंत रिक्षावाला हजर. चंदेरीला नेता का विचारले तर लगेच तयार झाला इथे आमच्या मनात चलबिचल झाली कारण ठाण्यात रिक्षावाल्याला विचारले आणि तो लगेच तयार झाला हे चित्र जरा दुर्मिळच. कारण एकतर त्यांचा मूड नसतो, तो असला तर gas संपलेला असतो, हे दोन्ही व्यवस्थित असेल तर आपल्यावर उपकार केल्या सारखे नुसते मानेनेच खुण करून हे आपल्याया उपकृत करणार.
असो रिक्षावाल्याने साधारण २०-२५ मिनिटात आम्हाला चंदेरीच्या पायथ्याशी असलेल्या चिंचवली गावात सोडले, त्याचा mobile नं. दिला आणि खाली उतरल्यावर फोन करा १०-१५ मिनिटात घ्यायला येतो हेही सांगितले, आता मात्र आम्ही गहिवरून गेलो. साश्रू नयनांनी त्यांचा निरोप घेऊन आम्ही चंदेरीच्या वाटेला लागलो. साधारण १५-२० मिनीटाच एक टेकाड चढून गेलो आणि जरा पठाराला लागलो.
चिंचवली गावातून सुरुवात केल्यावरचा पहिला चढ
पठारावरून चंदेरी आणि म्हैसमाळ ची जोडी छान दिसत होती.
साधारण नऊ-साडे नऊच झाले होते उन्हाचा चटका जरी जाणवत नसला तरी हवेतील उकाडा मात्र कमालीचा होता. संपूर्ण पठारावर सावलीला झाड काही दिसत नव्हत.
तसेच अर्धा तास पठारावरून चालल्यावर चंदेरी आणि म्हैसमाळ यांच्या मधील बेचक्यात आपण येऊन पोहोचतो.
येथून चंदेरी छानच दिसत होता लगेच झूम्लो (zoooom).
आता पठार संपून चढणीला सुरुवात झाली आणि थोडी फार झाडी दिसायला लागली.
लगेच पाणी आणि सावली पिऊन घेण्यासाठी थांबलो.
आणखी पुढे २०-२५ मिनिट चढून गेलो आणि ऐन चंदेरी आणि म्हैसमाळच्या खिंडीत येऊन थडकलो. इथे चंदेरीला जाण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून पाय-या तयार केलेल्या आहेत.
उजवीकडे म्हैसमाळला जाणारी थोडी घसा-याची पायवाट.
इथे सुजितला एकदम म्हैसमाळला जायची इत्च्छा झाली. आणि तो व भूषण म्हैसमाळच्या रोखाने निघाले, तर मी व पराग चंदेरीच्या.
म्हैसमाळच्या वाटेवरील सुजित व भूषण १५-२० मिनिट चढले आणि पुढची वाट न मिळाल्याने पुन्हा चंदेरीच्या वाटेला लागले.
मी व पराग मात्र चंदेरीच्या मुख्य चढणीला लागलो होतो.
सूर्यनारायण आता आपला प्रताप दाखवायला लागले होते.
मुख्य चढण संपवून वरती आलो.
उजव्या बाजूच्या वाटेने गुहेकडे निघालो आणि खरोखर १० मिनिटातच चंदेरीच्या गुहेत पोहोचलो.
चंदेरी गुहा
गुहेतील शंकराची पिंडी
गुहेतून दिसणारा परिसर
वातावरण धुरकट असल्याने समोरच असलेले प्रबळ आणि इर्शालगड अस्पष्ट दिसत होते. पण माथेरानचे पठार मात्र त्याच्या विस्तीर्ण पणामुळे लगेच ओळखता येत होत.
प्रबळ आणि इर्शालगड
माथेरानचे पठार
गुहेतच जवळचे तहानलाडू-भूकलाडू खाल्ले, बाजूलाच असलेल्या टाक्यातील थंडगार पाणी प्यायले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.
पाण्याची टाकी
साधारण २-२.३० च्या कडकडीत उन्हातून उतरायला सुरुवात केली. मस्त शिजून निघालो. त्यात कोणीतरी बाजूच्या डोंगरावर वणवा लावला होता (तो लावला होता का आपोआप लागला होता हे कळायला मार्ग नाही). सावलीला झाड तर दिसत नव्हतच. छोट्याश्या कारवीची सावली देखील अमृततुल्य वाटत होती.
वणवा
घसारा
निष्पर्ण वृक्षाच्या सावलीत
मुख्य उतार उतरून पुन्हा पठारावर आलो. वारा नावाचा काही प्रकार असतो हे एव्हाना विसरलो होतो, याच चंदेरीला काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात आलो होतो तेव्हा अक्षरशः वादळी वा-याचा अनुभव घेतला होता, इतका कि सरळ चालण शक्य नव्हत बसत बसत चंदेरी चढलो होतो.
या वैशाख वणव्यात सुद्धा श्रावण सरींची वाट पाहत मिलनासाठी आतुर झालेले हे प्रेमी युगुल पाहून थोडी गम्मत वाटली.
परतीच्या वाटेवर
आजचा दिवसच काहीतरी खास असावा सगळ कसं अगदी आमच्या वेळेत होत होत. चिंचवली गाव दिसायला लागल आणि mobile ला सुद्धा रेंज मिळाली. लगेच आमच्या रिक्षावाल्याला फोन लावला, १५ मिनिटात येतो बोलला आणि खरोखरच आम्ही गावात येतोय तोपर्यंत रिक्षा हजर. ताबडतोब रिक्षात बसलो वांगणीला आलो जेमतेम चहा प्यायला लगेच गाडी आली ती सुद्धा चक्क फास्ट ट्रेन निघाली (म्हणजे कल्याण नंतर फास्ट). गाडीला गर्दी नव्हती हे आणखी एक विशेष. कल्याण स्टेशनच्या आधी न थांबता सरळ स्टेशनात घुसली आणि लगेच निघाली देखील अहो काय हे.
असो अश्यातर्हेने रणरणत्या उन्हातून शरीराचे थोडे हाल करून घ्यायची आमची हौस मात्र पूर्ण झाली. पण कैमेरा नेमका बाहेर गेला असल्याने फोटोची तहान मोबाईलवर भागवावी लागली ईतकेच काय ते शल्य.
बज्जू गुरुजी
पठारावरून चंदेरी आणि म्हैसमाळ ची जोडी छान दिसत होती.
साधारण नऊ-साडे नऊच झाले होते उन्हाचा चटका जरी जाणवत नसला तरी हवेतील उकाडा मात्र कमालीचा होता. संपूर्ण पठारावर सावलीला झाड काही दिसत नव्हत.
आता पठार संपून चढणीला सुरुवात झाली आणि थोडी फार झाडी दिसायला लागली.
आणखी पुढे २०-२५ मिनिट चढून गेलो आणि ऐन चंदेरी आणि म्हैसमाळच्या खिंडीत येऊन थडकलो. इथे चंदेरीला जाण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून पाय-या तयार केलेल्या आहेत.
सूर्यनारायण आता आपला प्रताप दाखवायला लागले होते.
गुहेतील शंकराची पिंडी
गुहेतून दिसणारा परिसर
वातावरण धुरकट असल्याने समोरच असलेले प्रबळ आणि इर्शालगड अस्पष्ट दिसत होते. पण माथेरानचे पठार मात्र त्याच्या विस्तीर्ण पणामुळे लगेच ओळखता येत होत.
प्रबळ आणि इर्शालगड
गुहेतच जवळचे तहानलाडू-भूकलाडू खाल्ले, बाजूलाच असलेल्या टाक्यातील थंडगार पाणी प्यायले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.
आजचा दिवसच काहीतरी खास असावा सगळ कसं अगदी आमच्या वेळेत होत होत. चिंचवली गाव दिसायला लागल आणि mobile ला सुद्धा रेंज मिळाली. लगेच आमच्या रिक्षावाल्याला फोन लावला, १५ मिनिटात येतो बोलला आणि खरोखरच आम्ही गावात येतोय तोपर्यंत रिक्षा हजर. ताबडतोब रिक्षात बसलो वांगणीला आलो जेमतेम चहा प्यायला लगेच गाडी आली ती सुद्धा चक्क फास्ट ट्रेन निघाली (म्हणजे कल्याण नंतर फास्ट). गाडीला गर्दी नव्हती हे आणखी एक विशेष. कल्याण स्टेशनच्या आधी न थांबता सरळ स्टेशनात घुसली आणि लगेच निघाली देखील अहो काय हे.
असो अश्यातर्हेने रणरणत्या उन्हातून शरीराचे थोडे हाल करून घ्यायची आमची हौस मात्र पूर्ण झाली. पण कैमेरा नेमका बाहेर गेला असल्याने फोटोची तहान मोबाईलवर भागवावी लागली ईतकेच काय ते शल्य.
बज्जू गुरुजी
वाचने
6986
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनकवडा बज्जू
>>>वाटले हे काय असावे बरे ? व
In reply to मनकवडा बज्जू by चौकटराजा
मस्त फोटो आणि
वॉव खुपच चटपटित वर्णन केलय
मस्त
मस्त की रे बज्जु.. एकदा तरी
जबरा !!
मस्त
मस्त!
मस्त रे...