✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक कोडे घालु ?

प
पियुशा यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 15:03  ·  लेख
लेख
एक कोडे घालु ? :p एक घर , घरात नऊ मुले , मुले मोठी झाली ,लग्ने झाली , वाद होउ लागले म्हणुन सगळ्यानी वेगळे व्हायचा निर्णय घेतला, वाटण्या करुन टाका आता, अशी बापाकडे मुलांची मागणी . जमिन जुमला नव्हता , होता दुधाचा व्यवसाय ,८१ म्हशी होत्या. नऊ मुलांना नऊ-नऊ याप्रमाणे ८१ म्हशींचे वाटप झाले पण पुन्हा मुलांमध्ये वाद ! कारण होते प्रत्येक म्हशीला क्रमांक दीलेला होता ,कारण प्रत्येक म्हशीचे दुध देण्याचे प्रमाण वेगवेगळे होते . उदा. म्हणजे क्रमांक १ ची म्हैस १ लि. दुध देत होती. क्रमांक १० ची ,१० लि. कमांक २५ ची २५ लि. अन क्रमांक ८१ ची ८१ लि. समजले ? मग नऊ मुलांना समसमान दुध मिळेल अशा प्रकारे ८१ म्हशी कशा विभागुन द्यावयाच्या ? हा प्रश्न बापासमोर ठा़कला आहे . मिपाकर्स , जरा ह्या मुलांच्या बापाला मदत करा ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16912 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/31/2012 - 15:06 नवीन
जरा ह्या मुलांच्या बापाला मदत करा
घरात नऊ मुले
आता अजून कशाला त्याला मदत ?
  • Log in or register to post comments

मेलो

रमताराम
Fri, 06/01/2012 - 12:22 नवीन
हल्कत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक कोडे घालु ? - आधी या

५० फक्त
गुरुवार, 05/31/2012 - 15:09 नवीन
एक कोडे घालु ? - आधी या प्रश्नाचे तरी उत्तर येई द्यायचे, लगेच घालुन मोकळे झालात ते. हा अन्याय आहे.
  • Log in or register to post comments

जादूचा चौरस

क्लिंटन
गुरुवार, 05/31/2012 - 15:24 नवीन
अंकगणितात जादूचा चौरस म्हणून एक संकल्पना आहे. त्याचा वापर करून याचे उत्तर येईल. माझे उत्तर पुढीलप्रमाणे: पहिला मुलगा: म्हैस क्रमांक ४७,५८,६९,८०,१,१२,२३,३४,४५ दुसरा मुलगा: म्है.क्र ५७,६८,७९,९,११,२२,३३,४४,४६ तिसरा मुलगा: म्है.क्र ६७,७८,८,१०,२१,३२,४३,५४,५६ चौथा मुलगा: म्है.क्र ७७,७,१८,२०,३१,४२,५३,५५,६६ पाचवा मुलगा: म्है.क्र ६,१७,१९,३०,४१,५२,६३,६५,७६ सहावा मुलगा: म्है.क्र १६,२७,२९,४०,५१,६२,६४,७५,५ सातवा मुलगा: म्है.क्र. २६,२८,३९,५०,६१,७२,७४,४,१५ आठवा मुलगा: म्है.क्र. ३६,३८,४९,६०,७१,७३,३,१४,२५ नववा मुलगा: म्है.क्र. ३७,४८,५९,७०,८१,२,१३,२४,३५ प्रत्येकी बेरीजः ३६९ अर्थात हे एकच उत्तर नाही. मी जादूच्या चौरसाच्या rows प्रमाणे म्है.क्र. दिले. तेच column प्रमाणेही देता येतील. शाळेत असताना असले जादूचे चौरस बनविणे मला फार आवडायचे. आज खूप वर्षांनंतर परत त्याचा आनंद उपभोगता आला त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

<<शाळेत असताना असले जादूचे

शिल्पा ब
Fri, 06/01/2012 - 02:33 नवीन
<<शाळेत असताना असले जादूचे चौरस बनविणे मला फार आवडायचे. काय सांगता!! मला तर तुम्ही सांगेपर्यंत ही काय भानगड आहे हे माहीती नव्हतं. चालायचंच. सगळेच असे अभ्यासु वगैरे असते तर टवाळक्या कुणी केल्या असत्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मी पण गं शिल्पि , मागच्या

जेनी...
Fri, 06/01/2012 - 06:05 नवीन
मी पण गं शिल्पि , मागच्या बाकावर बसुन जाम टवाळक्या केल्यात शाळेत असताना त्यामुळे हे गणित सोडवायचा\ सुटायचा काय प्रश्नच येत नाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

माझ्या माहिती प्रमाणे

चौकटराजा
Fri, 06/01/2012 - 05:41 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे या जादूच्या चौरस करण्याची वेगवेगळी घराणी ( schools ) आहेत. त्याची माहिती कदाचित जालावर मिळू शकेल. पण मराठीतही या घराण्यांची माहिती वाचली असल्याचे समजते. अशा घराण्यांमुळे या प्रश्नाचे " एकच एक" असे उत्तर येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

@अशा घराण्यांमुळे या

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/01/2012 - 11:10 नवीन
@अशा घराण्यांमुळे या प्रश्नाचे " एकच एक" असे उत्तर येत नाही. >>> तेच तर त्यांचं प्रमुख काम आहे... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जादूचा चौरस

इरसाल कार्टं
Tue, 12/06/2016 - 10:31 नवीन
आता हि नवीन भानगड आम्हालाही माहित नव्हती... तसेही आमुचे गणित यथातथाच होते आणि आहे.. तरीही एक लेख होऊद्याच जादूच्या चौरसावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सोप्प आहे.

अमृत
गुरुवार, 05/31/2012 - 15:26 नवीन
एकूण ८१ म्हशी = ३३२१लिटर दूध ते ९ मुलांमधे वाटायचे = ३३२१/९=३६९लिटर प्रत्येकाला खालिइलप्रमाणे म्हशी द्याव्यात १ - १ते११,१३,१५,१७ते२३ आणि २५ते २९ २ - १२ आणि ५७ ते ६२ ३ - १४ आणि ६९ ते ७३ ४ - १६, ४०,४१,४२ आणि ४४ ते ४८ ५ - २४ व ३० ते ३९ ६- ४३,६३,६४,६५,६६ व ६८ ७ - ४९,५०, ५२ ते ५६ ८ - ६७ व ७४ ते ७७ ९ - ५१ व ७८ ते ८१ झाल्ल्ल्ल्ल्ल्ल कल्ल्ल काय???? बक्षिस कुठे आहे???? हा जाऊन त्या म्हशींचं दुध पी असं नको म्हणूस.. :-) अमृत
  • Log in or register to post comments

अहो पण तुमच्या उत्तराप्रमाणे

उदय के'सागर
गुरुवार, 05/31/2012 - 16:00 नवीन
अहो पण तुमच्या उत्तराप्रमाणे इथे प्रत्येकाला ९ म्हशी मिळत नाहियेत... तो पण एक महत्त्वाचा 'क्लॉज' आहे ना कोड्यातला... (माझंच काहि चुकत असेल तर सोडुन द्या) म्हणुन क्लिंटन ह्यांचे उत्तर बरोबर आहे, हे अपलं माझं मत...बाकि पियुशा सांगेलच :) @क्लिंटन - १ नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

अरे भाऊ

अमृत
गुरुवार, 05/31/2012 - 16:36 नवीन
तिने दुधाचा criteria ठेवला आहे ना म्हशींचा नाय.... अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

@ अमृत म्हशीपण समान विभागुन

पियुशा
गुरुवार, 05/31/2012 - 16:50 नवीन
@ अमृत म्हशीपण समान विभागुन द्यायच्या आहेत कोड्यात वर लिहिलेय तस मी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

आत्ता ग बया

अमृत
गुरुवार, 05/31/2012 - 17:43 नवीन
पहिले ठरव बुआ म्हशी का दूध??... म्हशी म्हन्शील तर ते क्लिंटन साहेबांना विचार :-) त्यांची लालूंशी जवळीक आहे म्हने.. :-) अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आता भोगा फळं आपल्या कर्माची

रघु सावंत
गुरुवार, 05/31/2012 - 15:28 नवीन
बर झालं बापाला ताप झाला तो हम दो हमारे दो तिथे नौ बार
  • Log in or register to post comments

झाल तर

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 05/31/2012 - 15:37 नवीन
हे बघा टोटल दूध झाले ३३२१ लिटर (१ ते १० चे ५५;११ ते २० चे १५५ ,२१ ते ३० चे २५५ and so on;) आपल्याला हे दूध ९ लोक्स मध्ये वाटायचे आहे असे समजू म्हणजे प्रत्येकी ३६९ लिटर , आता reverse summation 1st man 81 80 79 78 51 369 2nd man 77 76 75 74 67 369 3rd man 73 72 71 70 69 14 369 4th man 68 39 66 65 64 39 38 379 5th man 63 62 61 60 59 58 6 369 6th man 57 56 55 54 53 52 42 369 7th man 50 49 48 47 46 45 44 40 369 8th man 43 41 40 27 25 37 36 35 32 28 22 3 369 9th man rest all
  • Log in or register to post comments

@ मन्द्या सेम नं

पियुशा
गुरुवार, 05/31/2012 - 16:05 नवीन
@ मन्द्या सेम नं डिस्ट्रीब्युट होत नाहिये :)
  • Log in or register to post comments

अतिशय दुखद धागा !! त्या

सुहास..
गुरुवार, 05/31/2012 - 17:01 नवीन
अतिशय दुखद धागा !! ;) त्या माउली ने तब्बल नऊ वेळा ( हुणीले...आय मीन...गुणीले नऊ महिने, नऊ दिवस ! ) आणि मदत मात्र बापाला करा ....शिवाय हा धागा एका पाशवी स्त्री ने काढला असल्याचे पाहुन मॉनीटर पाणावला ;)
  • Log in or register to post comments

सहमत.

चिंतामणी
Fri, 06/01/2012 - 08:17 नवीन
धागाकर्ती एक स्त्री असून तीला त्या मातेचे दु:ख नाही कळले याचे वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

@ सुहास , चिंका काका तुम्ही

पियुशा
Fri, 06/01/2012 - 09:58 नवीन
@ सुहास , चिंका काका तुम्ही मला त्या मातेच्या दुखा:ची जाणीव करुन दिलित त्याबद्दल मी आपली फार्फार आभारी आहे ;) झालेल्या चुकीबद्दल आज मि पा.वर २ मिनिटाचे मौन पाळीन म्हणते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

चला आता, निरासगता आणि

५० फक्त
Fri, 06/01/2012 - 12:07 नवीन
चला आता, निरासगता आणि सौजन्यानंतर अजुन एक आंतरजालीय प्राणी सापडला पाळायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

खालीलप्रमाणे वाटणी करता येइल.

बाळ सप्रे
गुरुवार, 05/31/2012 - 17:06 नवीन
खालीलप्रमाणे वाटणी करता येइल. असच ९ प्रकारे करता येइल. यावर एक pivot table टाकून प्रत्येक मुलाच्या म्हशींची टोटल बघा ३६९ येते. म्हैस क्र मूल क्र 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 2 11 3 12 4 13 5 14 6 15 7 16 8 17 9 18 1 19 3 20 4 21 5 22 6 23 7 24 8 25 9 26 1 27 2 28 4 29 5 30 6 31 7 32 8 33 9 34 1 35 2 36 3 37 5 38 6 39 7 40 8 41 9 42 1 43 2 44 3 45 4 46 6 47 7 48 8 49 9 50 1 51 2 52 3 53 4 54 5 55 7 56 8 57 9 58 1 59 2 60 3 61 4 62 5 63 6 64 8 65 9 66 1 67 2 68 3 69 4 70 5 71 6 72 7 73 9 74 1 75 2 76 3 77 4 78 5 79 6 80 7 81 8
  • Log in or register to post comments

माझे उत्तर

वपाडाव
गुरुवार, 05/31/2012 - 17:10 नवीन
१ = १,११,२१,३१,४१,५१,६१,७१,८१ २ = ९,१०,२०,३०,४०,५०,६०,७०,८० ३ = ८,१८,१९,२९,३९,४९,५९,६९,७९ ४ = ७,१७,२७,२८,३८,४८,५८,६८,७८ ५ = ६,१६,२६,३६,३७,४७,५७,६७,७७ ६ = ५,१५,२५,३५,४५,४६,५६,६६,७६ ७ = ४,१४,२४,३४,४४,५४,५५,६५,७५ ८ = ३,१३,२३,३३,४३,५३,६३,६४,७४ ९ = २,१२,२२,३२,४२,५२,६२,७२,७३
  • Log in or register to post comments

हम्म्म ................. काही

पियुशा
गुरुवार, 05/31/2012 - 17:16 नवीन
हम्म्म ................. काही जण खरच छान प्रयत्न करताहेत ,पण याची अतिशय ,अतिशय सोप्पी पद्धत आहे अगदी :) उद्या सांगते तब तक चलने दो ;)
  • Log in or register to post comments

अबब...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/31/2012 - 18:11 नवीन
आधी ती (दररोज) ८१ लिटर दूध देणारी म्हैस (अजून जिवंत असेल तर..) पाहूदे जरा....
  • Log in or register to post comments

अ‍ॅ हॅ हॅ

रमताराम
Fri, 06/01/2012 - 13:38 नवीन
काठेवाडी म्हस हाय ही. -रर्रा मांडवगणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खाली दिलेल्या टेबल प्रमाणे

मराठे
गुरुवार, 05/31/2012 - 18:44 नवीन
खाली दिलेल्या टेबल प्रमाणे अंकांची उभी किंव आडवी बेरिज ३६९ आहे (तिरकी सुद्धा). प्रत्येक मुलाला उभ्या किंवा आडव्या रांगे प्रमाणे गायी / म्हशी वाटून देता येतिल. वर क्लिंटन यांनी सांगितलेला मॅजिक स्क्वेअर.. असा मॅजिक स्क्वेअर कुठल्याही विषम संख्येचा बनवता येऊ शकतो. कधी एके काळी मजा म्हणून असा मॅजिक स्क्वेअर बनवण्याचा प्रोग्रॅम लिहिला होता... (अरेरे गेले ते दिवस ..वगैरे) ४७५८६९८०११२२३३४४५ ५७६८७९९११२२३३४४४६ ६७७८८१०२१३२४३५४५६ ७७७१८२०३१४२५३५५६६ ६१७१९३०४१५२६३६५७६ १६२७२९४०५१६२६४७५५ २६२८३९५०६१७२७४४१५ ३६३८४९६०७१७३३१४२५ ३७४८५९७०८१२१३२४३५
  • Log in or register to post comments

हे उत्तर काढण्यासाठी ९ बाय ९

राजेश घासकडवी
Fri, 06/01/2012 - 03:58 नवीन
हे उत्तर काढण्यासाठी ९ बाय ९ चौरसात १ ते ८१ आकडे लिहावेत. त्याच्याच शेजारी तसाच चौकोन काढावा. खाली दाखवल्याप्रमाणे. Image removed. पहिल्या मुलाला १ पासून सुरू करून तिरक्या रेषेत जाऊन आकडे निवडायला सांगावेत. १, ११, २१... पुढच्याने त्या शेजारच्या तिरक्या रेषेतले आकडे १९, २९, ३९... निवडावेत. नऊही जणांनी हे केलं की प्रत्येकाला समान दूध मिळेल, समान म्हशी मिळतील.
  • Log in or register to post comments

सुंदर उत्तर.

JAGOMOHANPYARE
Fri, 06/01/2012 - 11:59 नवीन
सुंदर उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

त्यापेक्षा सरळ सगळ्या मुलानी

जेनी...
Fri, 06/01/2012 - 08:25 नवीन
त्यापेक्षा सरळ सगळ्या मुलानी बापाने वाटुन देलेल्या म्हशींच रोज दुध काढुन त्याची टोटल मारावि ( आपप्ल्या घरी :) ) त्यातलं लागेल एवढ दुध काढुन घ्यावं ( चहा आणि पोराबाळानसाठी) आणि मग सगळ्या भावानी चावडी वर एकत्र यावं ( तम्बाखु ,शेगारेटीनसाठी ) तिथे सगळ्यानी आपापल्या किटल्या एकत्र ठेवुन द्याव्यात ,त्यावर त्या किटलीत किति दुध आहे त्याच लेबल लावलेल असावं ( हे काम त्यांच्या बायका व्यवस्थित करतील :P ) आणि मग सगळ्यात मोठ्या भावाने त्या किटल्यांच्या लेबलावर डोळे झाकुन विश्वास ठेवावा ,दुध मोजावं ,त्याला नऊ ने भागावं आणि शांत पणे दुध वाटणी करावी . आणि समजा वर एखाद लिटरभर दुध ( पाव्,अर्धा,पाऊन ) राहिलच तर ते तिथल्या तिथे वाटुन पिऊन टाकावं. हे काम भाऊ भाऊ व्यवस्थित करतील ,कारण बाहेरची प्रकरण बाहेरच दाबन्यात पूरुषांचा चांगलाच हातखंडा असतो ;) अस ऐकिवात आहे . बघा पटतय का ...... :)
  • Log in or register to post comments

हे त्रेतायुग नाही गं पोरी...

अमृत
Fri, 06/01/2012 - 09:14 नवीन
वेल्कम टु कलियुग... इतकच जर त्या भावांच प्रेम उफाळून आलं असतं तर वाटण्या कशाला केल्य अस्त्या????? अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अहो भावांच प्रेम असतच

जेनी...
Fri, 06/01/2012 - 09:25 नवीन
अहो भावांच प्रेम असतच एकमेकांवर ,त्यांच्या बायकांच नसतं :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

@त्यांच्या बायकांच नसतं >>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/01/2012 - 11:17 नवीन
@त्यांच्या बायकांच नसतं >>> Image removed. अबाबाबाबाबा...! मेलो.... म्या हंसून हंसून Image removed. बालिके, हे तूच सांगितलस ते बरं झालं,अता खरं बोलल्याबद्दल पाशवी शक्ति तुला छळणार ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

भावांचं एकमेकावर प्रेम नसतं,

५० फक्त
Fri, 06/01/2012 - 12:17 नवीन
भावांचं एकमेकावर प्रेम नसतं, त्यांच्या बायकांचं एकमेकांवर नसतं, पण भावांचं एकमेकांच्या बायकांवर असु शकतं किंवा उलटंही. आता एवढं मोठं घर, बैल बारदाना आहे म्हणजे गेला बाजार किमान १२-१५ तरी टिव्ही असतील, त्याचा काहीतरी परिणाम होत असेलच ना ? असो, मी म्हणतो या सगळ्या म्हशींचं दुध काढुन विकायचं काम आउटसोर्सस केलं तर, सगळंच सोपं होईल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ओ ५० राव,निरागसता जपा की

प्यारे१
Fri, 06/01/2012 - 12:30 नवीन
ओ ५० राव, निरागसता जपा की जरा. ;) ल्हान प्वारं हायती मिपावर. गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या खेळ्त्यात नव्हं का? ;) साडे तीन मिन्टाचा सौ. जन्य स्पा तह (आयला चुकलं का बरोबर आहे हो? ;) ) चालू हाय तवर दीड मिन्टाचं मौन पाळतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ल्हान प्वारं हायती मिपावर -

५० फक्त
Fri, 06/01/2012 - 13:00 नवीन
ल्हान प्वारं हायती मिपावर - ते सगळे वाचनमात्र आहेत अन आपल्या भावना पोस्टमणांच्या मार्फत पोहोचवतील, त्यांची काळजी तुम्हाला नको. सौ. जन्य - हे संसर्गजन्य अशा चालीवर वाचायचं काय ? अवांतर - मन्या फेणेंच्या लग्नाला गेला होता काय ? निरागसता जपा सप्ताहातच उरकलंन बेट्यानं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा हा हा

इरसाल कार्टं
Tue, 12/06/2016 - 10:34 नवीन
हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

क्लिंटन,राजेश घासकडवी ,वपाडाव

पियुशा
Fri, 06/01/2012 - 13:19 नवीन
Image removed. क्लिंटन,राजेश घासकडवी ,वपाडाव ,मराठे अभिनंदन :) बाकिच्यानी ज्यानी प्रयत्न केले त्याचे देखील अभिनंदन :) अवांतरे करुन ज्यांनी-ज्यांनी धाग्याची ट्यार्पि वाढवली त्यांचे देखील अभिनंदन ;)
  • Log in or register to post comments

आता

रमताराम
Fri, 06/01/2012 - 13:42 नवीन
आता दुशलं शांग. ('पहिली गोष्ट ऐकून झाल्या झाल्या अशी फर्माईश झाली की पहिलीत आपण नापास झालो हे आजोबांनी लगेच ओळखायचं असतं.' इति नापास आजोबा भाईकाका.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पाहिलांदा क्रमांकानुसार नौ

किचेन
Fri, 06/01/2012 - 16:06 नवीन
पाहिलांदा क्रमांकानुसार नौ मुलांना एक ते नौ क्रमाकाच्या म्हशी द्याव्यात.नंतर ज्याला एक क्रमाकाची महेस आलीये मयाला ८१ क्रमांकाची मिस द्यावी.तसाच उलट करत जावे. १-८१-१०-७२-१९-६३-२८-५४-४५=३७३ २-८०-११-७१-२०-६२-२९-५३-४४=३७३ ३-७९-१२-७०-२१-६१-३०-५२-४३=३७३ ४-७८-१३-६९-२२-६०-३१-५१-४२=३७३ ५-७७-१४-६८-२३-५९-३२-५०-४१=३७३ ६-७६-१५-६७-२४-५८-३३-४९-४०=३७३ ७-७५-१६-६६-२५-५७-३४-४८-३९=३७३ ८-७४-१७-६५-२६-५६-३५-४७-३८=३७३ ९-७३-१८-६४-२७-५५-३६-४६-३७=३७३
  • Log in or register to post comments

तुमच्या घरच्या म्हशी हायेत का

प्यारे१
Fri, 06/01/2012 - 16:17 नवीन
तुमच्या घरच्या म्हशी हायेत का वो? ;) चार चार लिटर दूध वाढीव द्येतायसा? बाकीचे सग्गळे ३६९ म्हणत असताना तुम्ही ३७३ चा आकडा कुठून काढलात हो किचेन तै? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

एवढे दिवस शुद्धलेखनाचाच

५० फक्त
Fri, 06/01/2012 - 22:28 नवीन
एवढे दिवस शुद्धलेखनाचाच प्रोब्लेम होता ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

माझ पण बरोबर आहे.आणि आम्चा कि

किचेन
Sun, 06/03/2012 - 16:10 नवीन
माझ पण बरोबर आहे.आणि आम्चा कि नै चितळ्यांच्या दुधाचा होलसेल बिझनेस आहे.म्हनुन मिच बरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मायला एकदम झक्कास बघा उद्या

विजुभाऊ
Fri, 06/01/2012 - 16:21 नवीन
मायला एकदम झक्कास बघा उद्या ट्राय करतो कल्यान शुभराशी एक्का दुग्गी पंजा ओपनला नव्व्या मिंडी आन राणी क्लोजला
  • Log in or register to post comments

जमला का खेळ?

नाना चेंगट
Fri, 06/01/2012 - 18:49 नवीन
जमला का खेळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

या कोड्याचा संबंध महाभारत

यकु
Sat, 06/02/2012 - 05:08 नवीन
या कोड्याचा संबंध महाभारत काळातील महिष्मती (गुप्तकाशी किंवा महेश्वर ) चा राजा नीलाची सुंदर कन्या आणि अग्निच्या प्रेमप्रकरणाशी आहे. हा अग्नि म्हणजे आपण बाहेर पेटवतो ती आग नसून माणूस जेव्हा जागृत होतो तेव्हा त्याची कुंडलिनी प्रदीप्त होते तो अग्नि. ज्यांनी ब्रह्म जाणलंय त्यांच्यात हा अग्नि पेटलेला असतो. In Mahabharata, there is description[1] of an unusual custom of non-prevalence of marriages in Mahishmati. As per the legend, there was a king named Nila who ruled over Mahishmati. King Nila had a daughter who was exceedingly beautiful. So much so that god Agni(fire) fell in love with her. She always used to stay near the sacred fire of her father, causing it to blaze up with vigour. And it so happened that king Nila's fire, even if fanned, would not blaze up till agitated by the gentle breath of that girl's fair lips. And it was said in King Nila's palace and in the house of all his subjects that the god Agni desired that beautiful girl for his bride. And it so happened that Agni was accepted by the girl herself. A secret love affair began between god Agni, who assumed the form of a Brahman, and the beautiful princess. But, one day the couple was discovered by the king, who became furious. Nila thereupon ordered the Brahmana to be punished according to law. At this the illustrious deity flamed up in wrath and beholding the terrible flame, the king felt terrified and bent his head low on the ground. The legend abruptly comes to a conclusion (perhaps due to narration changes it underwent in later centuries before being written) and from that time, the girls of the city of Mahishmati became rather unacceptable to others as wives. God Agni by his boon granted them sexual liberty, so that the women of that town always roam about at will, each unbound to a particular husband. http://en.wikipedia.org/wiki/Maheshwar The nine Naths are the incarnations of Nine Narayanas who help Lord Narayan in taking care of the worldly activities. The Navnath sampradaya spreads the message of Krishna that God exists everywhere and not just in a particular form or lack thereof. http://en.wikipedia.org/wiki/Navnath ज्या नवरत्न नाथांनी मला महेश्वर येथे सूर्यनारायणाकडे पहायला लाऊन दीक्षा दिली त्यांनीच काल पुन्हा परकाया प्रवेशाने इंदूरात येऊन मला इंदूर स्टेशन परिसरात भेटायला बोलावले. तिथे त्यांना शोधत असताना मला रेल्वे रुळाच्या आजूबाजूला चनिया-चोली घातलेल्या काही मुली दिसल्या, त्यांच्याकडे पाहून खूपच विचित्र वाटत होतं. म्हणजे मी अतृप्त आत्मे पहातोय असं वाटत होतं. नाथांची तिथे भेट झाली नाही, पण त्यामागे या आत्म्यांचं दर्शन घडवणं हा हेतू होता काय, नाथच जाणे. दीक्षा मिळाल्यापासून मला भेटणारा जो-तो (अर्थातच नाथांचा परकाया प्रवेश) सतत 'सिर्फ एक चाहिये, सिर्फ एक चाहिये' म्हणत होता. दीक्षा मिळालेली असली तरी माझं मन तसंच शाबूत होतं - म्हणजे झाले दोन. त्यांना एक हवं होतं. मिपावरील सागर.... मध्‍ये परकाया प्रवेश करुन त्यांनी मला 'बुल्स आय' म्हणजे गर्भित अर्थाने तृतीय नेत्रावर लक्ष केंद्रीत करण्याचा इशारा केला. सागर.... द्वारे आलेल्या 'बुल्स आय' च्या प्रतिसादावर मी *'डावीकडे उजवीकडे होतंय ते तुटलं पाहिजे म्हणजे स्फोट होतो, खरंय का?' अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर क्षणभरातच नाथ लिंगदेह रुपात माझ्‍यात प्रवेशले आणि यौगिक प्रक्रियेद्वारे दोनाचे 'एक' करुन, त्यांनी माझ्याकडून 'उर्ध्वरेतन' करुन घेतले. गुप्तकाशीतील योगी या माझ्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया आणि मला या लेखमालेदरम्यान येथील मित्रांचे आलेले फोन (श्रामो, मनोबा, मदनबाण) या नवरत्न नाथांच्या परकाया प्रवेशाचाच परिपाक आहेत. गणामास्तर, कवटी, नीश, प्यारे आणि कित्येक लोकांच्या प्रतिक्रियांमार्फत नाथांनी मला संदेश पाठविले. * डावीकडे-उजवीकडे म्हणजे डावा मेंदू आणि उजवा मेंदू. पैकी डावा मेंदू मी माझ्या संमतीने वरील पौराणिक कथेचा संदर्भ असलेल्या आत्म्यांसाठी वापरण्यास दिला आहे. म्हणजे थोडक्यात आता माझ्या शरीरात स्‍त्री आणि पुरुष एकाच वेळी उपस्थित आहेत आणि ते कुंडलिनीच्या अग्नि मार्फत 'अलख निरंजन' किंवा सुप्रीम सोल किंवा परमात्म्याला उर्ध्वरेतनाद्वारे हविर्भाग देत आहेत. नाथ, या शरीराला उर्ध्वरेतन पूर्णपणे अवगत झालेलं नाही, कृपा करा. पियूशाला हा कोडं टाकण्याची बुद्धी देखील नाथांचीच प्रेरणा, किंवा परकाया प्रवेश. अलख निरंजन !!
  • Log in or register to post comments

हे नक्की काय आहे?

राजेश घासकडवी
Sat, 06/02/2012 - 05:13 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हे नक्की काय आहे ते मला

यकु
Sat, 06/02/2012 - 05:22 नवीन
हे नक्की काय आहे ते मला पूर्णपणे कळू शकत नाही. मी केवळ माझी स्थिती आणि या सगळ्या गोष्‍टींची संगती लावलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काय काय विचारता!

Nile
Sat, 06/02/2012 - 05:35 नवीन
हे नक्की काय आहे?
जास्तीचा गांजा असेल. म्हणजे काय, थोडा जास्त गांजा घेतल्यामुळे जाणिवनेणिवेच्या खोलात जाऊन पुराणातील महत्त्वाच्या गोष्टी दिसतात तसला प्रकार दिसतो आहे, असं म्हणतोय मी. बाकी खरं खोटं तो अर्धनारीनटेश्वरच जाणो! -हिरोईनच्या नशेतला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

नाही. कालच सांगितलंय - नवरत्न

यकु
Sat, 06/02/2012 - 08:38 नवीन
नाही. कालच सांगितलंय - नवरत्न नाथांच्या सोबत प्रत्यक्ष देहात उपस्थितीशिवाय गांजा घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा