पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
लेखनविषय:
.
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते
जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते
किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते
जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते
कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
- गंगाधर मुटे
---------------------------------
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते
जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते
किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते
जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते
कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते
- गंगाधर मुटे
---------------------------------
वाचने
2087
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
छान
छान !
आवडली
In reply to आवडली by पैसा
+१
याचा अर्थ काय ?
In reply to याचा अर्थ काय ? by अर्धवटराव
मला पण नाही समजलं.
In reply to याचा अर्थ काय ? by अर्धवटराव
तांत्रीक घोळ
In reply to तांत्रीक घोळ by गंगाधर मुटे
तरी नाहि कळलं...
In reply to तांत्रीक घोळ by गंगाधर मुटे
तरी नाहि कळलं...
In reply to तरी नाहि कळलं... by अर्धवटराव
'अभय' हे माझे कवितेत
धमासान की घमासान