साहित्यः
१० लिंब
२ चमचे हळद
दिड चमचे लाल तिखट
पाव चमचा हिंग
८ चमचे मिठ
३-४ चमचे मोहरी डाळ
दिड चमचा मेथी
२ मोठ्या पळ्या तेल
(मी जास्त लिंबांच केलय लोणच. मोजून बघा :हाहा:)
पाककृती :
प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसुन त्याच्या आपल्या आवडी प्रमाणे प्रत्येक लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करुन घ्या.
आता एकीकडे मेथी थोड्या तेलावर भाजून वाटून घ्या. ती गार झाली की मिक्सरमध्ये तिची पुड करा. (साहित्याच्या फोटोत छोट्या वाटीत आहे)
लिंबाच्या फोडींवर मिठ टाकुन कालवून ठेवा.
१ पळीभर तेल चांगले गरम करून गॅस बंद करा व त्यात मोहरीची डाळ टाका.
आता ही फोडनी पुर्ण थंड होऊ द्या. हिंग, हळद, मिरचीपुड, मेथीपुडवर ही थंड झालेली फोडणी ओतून मिसळा.
आता हे मिश्रण मिठ चोळलेल्या लिंबांमध्ये एकजीव करा.
आता ह्या मसाला मिश्रीत फोडी एका बरणीत दाबून दाबून भरा.
राहीलेल तेल गरम करुन पुर्ण थंड करा व बरणीतील लोणच्यात ओता. झाकण घट्ट बंद करून ८-१० दिवस चांगले मुरल्यावर खायला घ्या.
अधिक टिपा:
लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता पण त्यात माझ्यामते मजा येत नाही.
मेथीपुड बाजारात मिळते पण घरी केलेल्या पुडीला जास्त खमंगपणा असतो.
कोणत्याही लोणच्यात लोणच्याच्या फोडी बुडेपर्यंत तेल बरणीत घालावे म्हणजे लोणच्याला बुरशी चढत नाही.
याद्या
12326
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वॉव्व जागु तै क्या बात है....
लोणची म्हणजे माझा विक पॉईंट
चिंतामणी पाकृ आहे पण फोटो
वोक्के.
In reply to चिंतामणी पाकृ आहे पण फोटो by जागु
पाकृ माझ्याकडे आहे पण
In reply to चिंतामणी पाकृ आहे पण फोटो by जागु
चिंतामणी पाकृ आहे पण फोटो
तोंडाला पाणी सुटले.
वा ! मस्त ..
तों.पा.सु
लोणचं मुरवत ठेव. मी पार्सल
वा,,,मस्तच ! तै, तुला
नेहमी नेहमी काय
व्वा, त्या लिंबाच्या फोडिंचा
मदनबाण येते ना आंबोशीचे
रेशिपी छानच !! बरणीभर
व्व्व्व्व्व्व्व्व्वा मस्तच्च्च्च्च्च्च्च्च्च्च
जबरा, तुम्ही हे कसं ओळखु शकता
In reply to व्व्व्व्व्व्व्व्व्वा मस्तच्च्च्च्च्च्च्च्च्च्च by RUPALI POYEKAR
उदय धन्यवाद. २-३ दिवसाचे अंतर
हा हा हा (इथे काम न करायला
In reply to उदय धन्यवाद. २-३ दिवसाचे अंतर by जागु
व्व्व्व्व्व्व्व्व्वा मस्तच्च्च्च्च्च्च्च्च्च्च
अग आई ग...
छे!
त्रास...त्रास....त्रास....
छान. आता या लोणच्याच्या पाच
छान लोणचे..
विशाखा, कार्यकर्ते, अतृप्त
खूपच
चला तयारी करुया...
निवेदिता ताई, प्रभाकर
सुपर्ब!!!
वाह !