केशर-पिस्ता अंगुर रबडी / रसमलाई
साहित्य अंगुर रसगुल्ला बनवण्यासाठी:
१/२ लिटर दूध
दीड टेस्पून लिंबाचा रस
३/४ वाटी साखर
दीड वाट्या पाणी
१/२ टीस्पून वेलचीचे दाणे
बर्फ
पत्री खडीसाखर
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्या दूध उकळायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात हळू-हळू लिंबाचा रस घालणे व सतत ढवळणे.
दूध फाटायला / फुटायला / नासायला लगेल व त्याचे पाणी (व्हे)वेगळे होऊ लागेल. त्यात बर्फाचे खडे टाकून गॅस बंद करावा .
बर्फ पूर्ण वितळला की दूध मलमल किंवा सुती कापडावर ओतून , गाळून घेणे. कापडाला घट्ट पिळून पनीरचे पाणी काढून टाकावे.
थंड पाण्याच्या नळाखाली पुरचुंडी / पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१/२ तास पुरचुंडी / पोटली टांगून ठेवावी.
१/२ तासानंतर पनीरला एका ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करा व त्यात पत्री खडीसाखर ठेवा व त्याचा छोटा गोळा बनवा. हलक्या हाताने वळा
एक ही चिर नको. (खडीसाखर चा वापर ऐच्छिक आहे, ती घातल्यामूळे रसगुल्ले आतून पोकळ व हलके होतात, तसेच पनीर चांगले मळले तरी ते हलके होतात)
प्रेशर कुकरमध्ये दीड वाट्या पाणी व वेलची दाणे घालून उकळी काढा. उकळी आली की त्यात साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले छोटे छोटे पनीर चे गोळे हलकेच सोडा व कुकरचे झाकण बंद करा.
२-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा व कुकर लगेच थंड पाण्याच्या नळाखाली धरा म्हणजे वाफ निघून जाईल.
रसगुल्ले तयार होऊन आकाराने दुप्पट झालेले असतील. वेगळ्या बाऊलमध्ये काढून पूर्ण गार होऊ द्या.
साहित्य रबडी /रससाठी:
३ वाट्या दूध
४-५ टेस्पून कंडेन्सड मिल्क
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून केशर
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
उरलेला रसगुल्ल्याचा पाक (गरज पडल्यास)
पाकृ:
दूधातले १/४ वाटी दूध बाजूला काढून ठेवावे .
ते दूध मायक्रोव्हेवमध्ये गरम करुन घ्यावे व त्यात अर्धे केशर घालून मिक्स करावे.
त्यात कंडेन्सड मिल्क घालून एकजीव करावे.
उरलेले दूध उकळवायला ठेवावे. उकळी आली की गॅस बारीक करुन ते घट्ट होईपर्यंत आटवावे.
आता त्यात कंडेन्सड मिल्क व केशर मिश्रीत दूध घालावे व सतत ढवळावे.
गोडपणा कमी वाटत असल्यास रसगुल्ल्याचा पाक आवडीप्रमाणे घालणे. (आमच्यासाठी कंडेन्सड मिल्कचा गोडवा पुरेसा होता.)
हलक्याच हाताने अंगुर रसगुल्ले दाबावे व तयार रबडीत अलगद सोडावे. उरलेले केशर व पिस्ता पण घालावे. ५-७ मिनिटे शिजु द्यावे म्हणजे रस नीट मुरेल .
शेवटी वेलचीपूड घालून मिक्स करणे.
अंगुर रबडी / रसमलाई जरा गार झाली की फ्रिजमध्ये १-२ तास थंड होण्यासाठी ठेवावी.
मग वाट कसली बघताय , मारा ताव ह्या केशर-पिस्ता अंगुर रबडी / रसमलाईवर :)
नोटः
करायला जरी कठीण व वेळखाऊ वाटली तरी तितकी कठीण नाही :)
पनीर थोडे ओलसर हवे व खूप मळावे लागते.
पनीर चांगले मळले तर रवा, मैदा घालायची गरज पडत नाही बाईंडींगसाठी. (घालू पण नका चवीत फरक पडतो)
रसगुल्ले पूर्ण गार झाले की अलगद दाबून आटीव दूधात सोडावे.
१/२ तासानंतर पनीरला एका ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करा व त्यात पत्री खडीसाखर ठेवा व त्याचा छोटा गोळा बनवा. हलक्या हाताने वळा
एक ही चिर नको. (खडीसाखर चा वापर ऐच्छिक आहे, ती घातल्यामूळे रसगुल्ले आतून पोकळ व हलके होतात, तसेच पनीर चांगले मळले तरी ते हलके होतात)
प्रेशर कुकरमध्ये दीड वाट्या पाणी व वेलची दाणे घालून उकळी काढा. उकळी आली की त्यात साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले छोटे छोटे पनीर चे गोळे हलकेच सोडा व कुकरचे झाकण बंद करा.
२-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा व कुकर लगेच थंड पाण्याच्या नळाखाली धरा म्हणजे वाफ निघून जाईल.
रसगुल्ले तयार होऊन आकाराने दुप्पट झालेले असतील. वेगळ्या बाऊलमध्ये काढून पूर्ण गार होऊ द्या.
साहित्य रबडी /रससाठी:
३ वाट्या दूध
४-५ टेस्पून कंडेन्सड मिल्क
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून केशर
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
उरलेला रसगुल्ल्याचा पाक (गरज पडल्यास)
अंगुर रबडी / रसमलाई जरा गार झाली की फ्रिजमध्ये १-२ तास थंड होण्यासाठी ठेवावी.
वाचने
17852
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
फार त्रासदायक आहे नुसतेच फोटो
In reply to फार त्रासदायक आहे नुसतेच फोटो by प्रचेतस
+१
In reply to +१ by गणामास्तर
अर्थातच सानिकाकडे....
(No subject)
शेवटचा
In reply to शेवटचा by jaypal
अगदी ह्येच म्हणतो.....
रेसिपी आणि फोटो बघून.....
In reply to रेसिपी आणि फोटो बघून..... by सूड
बर्फ टाकण्याचं कारण
अता ही रेशिपी मात्र करणारच...
In reply to अता ही रेशिपी मात्र करणारच... by अत्रुप्त आत्मा
मुक्ती का तृप्ती?
In reply to अता ही रेशिपी मात्र करणारच... by अत्रुप्त आत्मा
मुक्ती का तृप्ती?
छान
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! मस्त
छान रेसिपी..
आहाहा...!
आता अंगूर-रबडी किलोने विकत
आमच्या नवीन धोरणानुसार
In reply to आमच्या नवीन धोरणानुसार by चिंतामणी
सह सह सह
:)
एक नंबर!!!
सानिकास्वप्निल जी मस्त रेसिपी
सुपर्ब! मजा आली फोटो आणि
नुसती बघायची?????? ह्यो
शॉल्लिड..........
मस्त आणि सोपी पाककृती
In reply to मस्त आणि सोपी पाककृती by हसरी
गाईचं दूध
In reply to गाईचं दूध by सानिकास्वप्निल
धन्यवाद
उत्तम
In reply to उत्तम by सहज
कमाल आहे...
In reply to उत्तम by सहज
जर आपले नाव सानिकास्वप्नील,
खूप छान रेसिपी
खल्लास ___/\___ आपल्याला नै
अहाहा......... अंतरात्मा शांत
कंट्रोल गेलाच शेवटी!
खडीसाखरेची आयडीया छान आहे....
ज ब र्रा ट !
वा झक्कास फो टो बघुन
धन्यवाद ! ! !
सुरेख पाकृ