राम राम मिसळपावकर ग्रामस्थ मंडळी!
या सदरात आपल्या सर्व मिसळपाव ग्रामस्थांची गावकी भरवण्यात येत आहे -
गावकीपुढील आजचा विषय -
इस्कुट नावाच्या ग्रामस्थाने मिसळपाववरील अन्य एका ग्रामस्थाला संदर्भहीन तसेच मूर्खासारखा मजकूर असलेले/ली पोष्टकार्ड/कार्डे पाठवले/ली आहे/आहेत अशी तक्रार मिसळपावचेच एक सन्माननीय ग्रामस्थ मनिष यांनी आमच्याकडे केली आहे. तरी आम्ही मनिष यांना अशी विनंती करतो की त्यांनी इस्कुटरावांनी त्यांना पाठवलेले/ली पोष्टकार्डे/कार्डे इथे प्रसिद्ध करावीत. पोष्टकार्डातील मजकूर अगदीच आक्षेपार्ह किंवा इथे चारचौघात प्रसिद्ध करावयास प्रशस्त नसेल तर कृपया मनिषरावांनी तो मजकूर मिसळपाव पंचायत समितीला पोष्टकार्डाने पाठवावा!
इस्कुटरावांनादेखील अर्थातच येथे काय तो खुलासा करण्यास पूर्ण मुभा/अधिकार आहे!
पंचायत समितीनेदेखील तिचा काय तो निर्णय (न्यायालयीन आदेश!) इथे भर गावकीतच जाहीरपणे द्यावा. म्हणजे पंचायत समितीच्या आदेशाप्रमाणे संबंधित ग्रामस्थावर प्रशासकीय अनुमती, किंवा इतरांना व्य नि पाठवण्यास निर्बंध, किंवा मिसळपाववरून सदर सदस्याची उचलबांगडी यासारखे उपाय सरपंचांना करता येतील! :)
मिसळपावच्या इतर ग्रामस्थांनीही त्यांच्या वरीलप्रमाणे फौजदारी स्वरुपाच्या तक्रारी यापुढे इथेच या सदरात मांडाव्यात ही विनंती!
मिसळपाववरील तांत्रिक बाबी किंवा इतर दिवाणी स्वरुपाच्या तक्रारी कृपया इथे गावकीसमोर मांडू नयेत, त्या त्यांनी कृपया इथे मांडाव्यात किंवा मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांत यांना पोष्टकार्ड पाठवून कळवाव्यात ही विनंती!
आपला,
(फौजदारी/दिवाणीची विलक्षण हौस आणि आवड असलेला एक कट्टर लोकशाहीवादी कोकणी!) तात्या देवगडकर!
:)
वाचने
10912
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या
तक्रार का नाही केलीत??
In reply to तात्या by लबाड बोका
पारदर्शकता
In reply to तात्या by लबाड बोका
मलाही
धन्यवाद दादा...
In reply to मलाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा सूर्य आणि हा जयद्रथ - इस्कुटरावांचा प्रतिसाद
ओ इस्कुटराव - तेजरावांचा प्रतिसाद
In reply to हा सूर्य आणि हा जयद्रथ - इस्कुटरावांचा प्रतिसाद by सरपंच
सरपंच साहेब,
In reply to ओ इस्कुटराव - तेजरावांचा प्रतिसाद by सरपंच
परिणाम?
अरे बापरे
मनिषराव,
In reply to अरे बापरे by मनिष
काहिच हरकत नाही...