Skip to main content

((अलगद कापला कराने गळा.)) विडंबन

लेखक रामजोशी यांनी सोमवार, 21/05/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
कापला रेशमाच्या सुताने गळा जाणवू ना दिल्या वेदना ना कळा अलगद कापला कराने गळा. घेतला आळ नाही पवारांवरी त्यांच्या आडून खाल्ले मी हजारवेळा मागून शिव्या दिल्या खरे हे जरी का खाखाकार वाचूनी मी लुळापांगळा राहतो मी येथे, दिसतो मी बावळा सापडेना कुणा इरसाल मी खरा. भाग ओसाड सबसिडी गाळतो तेथे करा परी कर भरतोय आंधळा. सबसिडी घेण्या तू वेळ लावू नये ही हापसून लाव कराचा सापळा. राजकारणी पक्का, काळा न पडे राजकारण भाग्यात, पिंडावरी कावळा मार्ग सारेच धुंडाळतो सारखा करदात्यांचा पैसा राजरोस लाटण्या टोपी शाबूत म्हणजे “न्हावी” रिकामे गप्पा जरी थोर अंतरी नाना कळा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1259
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वेगळ्या विषयावरचं विडंबन आवडलं.