खालील पाककृती शिरीन अनवर ह्यांची आहे :)
साहित्यः
१ कप चण्याची डाळ
१/२ कप तूरीची डाळ
१ टेस्पून कसूरी मेथी
१/२ टीस्पून हळद
१/४ टेस्पून हींग
वरील सर्व साहित्य प्रेशर कुकरला लावून ७-८ शिट्ट्या काढून शिजवून घेणे
मसाल्याचे साहित्यः
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
एक टोमॅटो बारीक चिरलेला
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून बारीक चिरलेले आले
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
कढीपत्ता काही पाने
२-३ टेस्पून साजूक तूप (तेवढे लागतेच ;))
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
शिजवलेली डाळ पातेल्यात काढून थोडे पाणी घालून उकळी काढा.
दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे घाला. जीरे तडतडू लागले की त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.
आता त्यात बारीक चिरलेले आले व लसूण घालून परतून घ्या. (कच्चा वास गेला पाहीजे.)
चिरलेला कांदा व टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर परता.
त्यावर लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धणेपूड घाला व सगळा मसाला तूप सुटेपर्यंत परता.
शिजवलेल्या डाळीत हा परतलेला मसाला घाला व झाकून ७-८ मिनिटे शिजवा.
चिरलेली कोथींबीर घाला. आवडत असल्यास वरुन एक चमचा तूप सोडा.
ही डाळ जरा घट्टचं असते , पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे.
ही डाळ तुम्ही साध्या भाताबरोबर, जीरा-राईस किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करु शकता.

वाचने
12467
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
करणार !
शाकाहारी मेजवानी...
हेच म्हणतो
In reply to शाकाहारी मेजवानी... by प्रभाकर पेठकर
सानिका तुझा सर्व करण्याचा जो
भुकेश...! व्हा की मग. करा
In reply to सानिका तुझा सर्व करण्याचा जो by जेनी...
व्वा ! मस्तच.....
व्वा!! शेवटचा काय किंवा फोडणी
व्वा व्वा अतिशय आवडता
मस्त!!
मस्त मस्त...!!!!
ओह्ह त्तेरी की दाल बनाई है
(No subject)
शेवटचा फोटू ग्रेट! बाकीचे
छान पा़कृ सानिका
खुप दिवसांनी पाहिली डिश.
लंगरवाली दाल आठवली.. कसली
आणिक काय बोलू? शब्दच संपलेत
लय भारी !!!!
वारलो !!
वा... मस्त.... करायलाच पाहीजे
छान दिसतेय डाळ म्हणजे चवीला
चला, आता इकडे सानिका शो धणं
बरं
In reply to चला, आता इकडे सानिका शो धणं by प्यारे१
आजच करणार साहित्य सगळं
मस्तच...मला फ़ार आवडते
छान पाककृती.
सगळं साहित्य होतच म्हणून लगेच
दाल फ़्राय पुढे फ्लॉवरची भाजी
In reply to सगळं साहित्य होतच म्हणून लगेच by रेवती
सगळ्यांचे आभार
धागा वाचण्यात आला आहे.
फोटू ग्रेट! आहेत मग चवही असणार.
प्रचंड विरोध
मावसाहारी!!!???
In reply to प्रचंड विरोध by रघु सावंत
जिराराईसच्या जोडीने ही दाल
मानवंदना
या विकांताला ही दाल केली