Skip to main content

(जत्रा)

लेखक केशवटुकार यांनी मंगळवार, 05/08/2008 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजची टुकारी ओगल्यांची जत्रा. टुकारी करायच्या आधी सर्किटरावांच्या या इनिशिएटिव्ह ने प्रभावित झालो (जत्रा) जाल कविकिरडुंच्या करतात येथ जत्रा पडतात विडंबने तरी भरतात येथ जत्रा ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा ती कला का दयाळू झाली अशी कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा आल्या भरुन संत्रा, देशी आणि विदेशी मारुन फक्त गप्पा सरतात येथ जत्रा आता पुढील शहरी पुन्हा नवीन ठाल्या चंद्रावरी कधीतर भरतील येथ जत्रा. -केशवटुकार
लेखनविषय:

वाचने 2651
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

चांगला प्रयत्न आहे टुक्या.. अजून येउदेत. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा ती कला का दयाळू झाली अशी कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा क्या बात है ! "जालनिश्यांना" वृत्तात बसत नाही. "वेठीस जाल माझे धरतात.." असे केले तर ? बाकी मस्तच !! प्रत्येक विडंबनात सराईतपणा वाढत जातोय ! मोस्ट इंप्रूव्ह्ड विडंबनकार असे काही पारितोषिक असेल, तर त्याचे मानकरी तुम्ही ! तिसर्‍याच विडंबनात गुरूजींचे नाव सार्थ करण्याच्या मागे आहात ! - (संतुष्ट) सर्किट

होते आहे. (सुधारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टुकारशेठ, सुधारणा होत आहे..चालु द्या.. (वाचक निवृत्त)केशवसुमार

एकसे एक विडंबन सुरु आहे. मस्त विषय, चपखल शब्द! घरचा अभ्यास अगदी मन लावून चालू आहे असे दिसते! ;) (स्वगत -ही नवीन मुले फारच सराईत होत चालली आहेत, केसुशेठ जालावरुन प्रायव्हेट शिकवण्या घेतात की काय? :W :? ) चतुरंग

टुकार शेठ, विडंबन सही केले आहेस रे ! :)

जमलंय विडंबन... मूळ जत्रेपेक्षा विडंबनेच जास्त होणार की काय?

हे हे हे :) मस्तय! -('मिसळ'लेला) ऋषिकेश