साहित्य :- १वाटी मुगाची डाळ, ५-६ लसणाच्या पाकळ्या, १चमचा खिसलेले आले, ३/४ हिरव्य मिरच्या, १ चमचा मीठ. साखर चवीनुसार,१ लिंबाचा रस , १ चमचा हळद १ वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर, १ सॅशे इनो. फोडणीसाठी - १ टेबलस्पुन तेल, १चमचा मोहरी, १ चमचा हिंग.
कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचारस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.प्रेशर कुकरमधे पाणि घालुन उकळ्ण्यास ठेववे. एका पसरट भांड्याला थोडेसे तेल लावावे.बाउल मधिल मिश्रणात सॅशे मधला इनो घालुन चमच्याने ढवळुन मिश्रण तेल लावलेल्या पसरट भांड्यात घालुन ते भांडे कुकरमधे ठेवावे . झाकण लावुन शिट्टि काढुन टाकुन १५ मिनिटे मिश्रण वाफवावे. गॅस बंद करुन ५मिनिटे तसेच ठेवावे. नंतर वाफवलेले मिश्रण कुकर मधुन काढुन त्याच्या वड्या पाडाव्या.
एका छोट्या कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडलि कि हिंग घालुन गॅस बंद करवा. तयार झालेल्या फोडणीत १/४ वाटी पाणि घालावे. हे तयार मिश्रण ढोकळ्यावर पसरावे. वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी.ढोकळा तयार.
साहित्य :
कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचा रस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.
बाउलमधिल मिश्रणात सॅशे मधला इनो घालावा.
तयार ढोकळा.
अवांतर- इनो ढो़कळ्यात घालण्यासाठी आहे. तसेच जळजळ, पोट्दुखी साठीसुद्धा जरूर घ्यावा.
कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचा रस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.
बाउलमधिल मिश्रणात सॅशे मधला इनो घालावा.
तयार ढोकळा.
अवांतर- इनो ढो़कळ्यात घालण्यासाठी आहे. तसेच जळजळ, पोट्दुखी साठीसुद्धा जरूर घ्यावा.
वाचने
8900
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त पण फोटो कुठे आहेत.
फोटो टाकलेत बघा.
In reply to मस्त पण फोटो कुठे आहेत. by धनुअमिता
नेहरिन,
नाहि हो .............परा काय
In reply to नेहरिन, by प्रास
हम्म्म
अरे हलकट माणसा.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
छान दिसतोय
मस्त
अरे
छान. फोटू पाहिला पण हा ढोकळा
अरे भारिय ही पद्धत ..सोप्पि
पाकृ करतानाच इनोचा वापर
नविनच
मला ढोकळा आवडतो असा , कधी
अस बी असते व्हय.