✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तीन गझला

J — JAGOMOHANPYARE, Sat, 05/12/2012 - 00:43
------------१-------------------- बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये --------------२------------------------ प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे तुझे अमृताचा कुंभ तव अधरांवरी का सांडला अन तयाला रक्षण्या नजरेतुनी डसणे तुझे सांज येता क्षीण होई हा मनाचा पारवा ये उभारी त्यास जेंव्हा बरसते हसणे तुझे मंदिरी आणी मशीदी रोज जागर चालला जाणले नाही कुणी हृदयामधे वसणे तुझे -------------३----------------- धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे काल बापू आज साई रोज बाबा वेगळा पावला कोणीच नाही घालता मी साकडे जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे

प्रतिक्रिया द्या
1341 वाचन

💬 प्रतिसाद (4)

काल बापू

योगेश सुदाम शिन्दे
Sat, 05/12/2012 - 10:36 नवीन
<< काल बापू आज साई रोज बाबा वेगळा पावला कोणीच नाही घालता मी साकडे >> +१
  • Log in or register to post comments

झाक येकदम

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/12/2012 - 12:26 नवीन
झाक येकदम :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद! ( तीन गझला, निदान

JAGOMOHANPYARE
Sat, 05/12/2012 - 17:27 नवीन
धन्यवाद! ( तीन गझला, निदान तीन तरी प्रतिसाद असावेत म्हणून हा प्रतिसाद लिहिला.)
  • Log in or register to post comments

जामोप्या!

पैसा
Sat, 05/12/2012 - 17:35 नवीन
मस्त लिहिताय की! तुम्ही गंभीरपण लिहू शकता. लै झ्याक!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा