Skip to main content

गरमागरम चहा

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 11/05/2012 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक कप एक बशी एक चमचा चांगली गाळणी एक छोटेसे पातेले गॅस शेगडी (शिलींडरसह) लायटर अर्धा कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर एक चमचा चहापावडर चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर कृती : प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे. पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे. लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी. अधुन मधून चमच्याने ढवळावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी. आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा. कपाच्या खाली बशी ठेवावी. आणिक काय ? प्यावा सुर्र करुन :) हवे असल्यास बरोबर बिस्कीट, वगैरे खावे आवडीनिवडीनुसार !! विशेष सुचना : १) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे. चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे. आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे. मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये. मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये. त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे. आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते. २) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.

वाचने 26731
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

आणि फोटोतला चहा वेगवेगळा असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. अर्धा कप पाणी आणि एक कप दूध, एक चमचा चहा पावडर या प्रमाणात चहा इतका लाल कसा काय झाला? आणखी काही शंका आहेत. उदा. १) चहा प्यायल्यानंतर सगळी ओटाभर पसरलेली भांडी साफ कोणी करायची आहेत? २) २ चमचे साखर कशासाठी? ३) ही पाकृ सांगणारा मनुष्य बायको बिनसाखरेचा चहा देते म्हणून त्रासलेला असावा आणि नान्याने फक्त पाकृ इथे चिकटवण्याचे काम केले असावे. @प्रीतमोहर, तुझ्यासारख्या कन्येच्या भावी नवर्‍याने पाकृचा क्लास लावावा. @गवि, तुमच्याकडे लॉन असलेला बंगला आणि नोकर, तसेच टी कोझीसहित चहाची किटली, आणि उंची ग्रीन लीफ टी आहे याचं ज्ञान झालं. चहा प्यायला कधी बोलवताय?

In reply to by पैसा

१) चहा प्यायल्यानंतर सगळी ओटाभर पसरलेली भांडी साफ कोणी करायची आहेत? सर्व भांडी सिंकमधे ठेवून वरुन पाणी सोडून द्यायचे. दुसर्‍या दिवशी त्यातले पाणी काढून पुन्हा भांडी वापरायची २) २ चमचे साखर कशासाठी? चहात घालण्यासाठी ३) ही पाकृ सांगणारा मनुष्य बायको बिनसाखरेचा चहा देते म्हणून त्रासलेला असावा आणि नान्याने फक्त पाकृ इथे चिकटवण्याचे काम केले असावे. हे आपले विधान आहे की ठाम निष्कर्ष? विधान असल्यास बिनबुडाचे आहे. निष्कर्ष असल्यास चुकलेला आहे.

In reply to by नाना चेंगट

पोकळ विधाने आम्ही कधीच करत नाही. बर्‍याच ब्याचलरांचा आणि त्रासलेल्या विवाहित पुरुषांचा विदा गोळा करून काढलेला अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे तो! एकवेळ चुकेल पण बिनबुडाचा नक्कीच नाही!

In reply to by पैसा

काही दिवसांपूर्वी 'कट्टा करु..कट्टा करु' म्हणून १४-१५ जणांनी ठाण्यात नेऊन भोळ्या गविला कुठल्याशा हॉटेलाचं बिल द्यायला लावलं. बिचार्‍याचं फार नुकसान झालं. आता बंगला मंगलानं घेतलाय, लॉन डॉननं घेतलं, नोकर जोकर म्हणून सर्कशीत लागलाय, टी कोझी सारकोझीनं घेतली, किटली इटलीला गेली. राह्यलं काय, तर उंची ग्रीन लीफ टी (तो गवती चहा असल्याचे मागाहून समजले.) तू सांगू नकोस हे कुण्णाला.. :)

In reply to by योगप्रभू

एखाद्या नवकवीचा गंडा बांधलात की काय? काय यमकांच्या जोड्या दिल्यात आहेत हो. हे वाचून कुठे कुठे काव्यकळ लागते ते बघू या. कि तुम्हीच घेताय सुपारी यातून एखादी गजल पाडण्याची?

>>प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन आमच्याकडं शिलेंडर नाय. असो ज्यांच्याकडे ग्यास आहे अशा हुच्चभ्रूंसाठीची पाककृती :(

हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा करता येइल, याबद्दल कुणी जाणकार मार्गदर्शन करतील काय? तसेच चहा झाला की नाही, हे तपासण्यासाठी मधूनमधून सुरी किंवा मोठी सुई इ. वापरुन तपासायचे का? बाकी @ यकु, सूड, आणि पोरेटोरे कं. : दूध फुटल्यास फेविकॉलने चिकटवावे आणि फाटल्यास स्वच्छ पांढरा दोरा सुईमध्ये ओवून त्यानी शिवून वापरावे.

In reply to by कवितानागेश

>>हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा .... करु की , त्यात काय... पण आधी मायक्रोवेव चालवण्यासाठी वीज शोधुन ठेवा , नाय तर आम्ही मार्गदर्शन करायचो आन मग तुम्ही म्हणायच्या "आता इथे वीज शोधणे आले"

In reply to by कवितानागेश

आम्ही पुण्यात नाही रहात. वीज असते आमच्याकडे.
'पुणे तिथे काय उणे' ही म्हण आपल्याला माहित नसावी असे म्हणण्याचे धाडस तर मी करू शकत नाही, मग ह्याला पुण्याबद्दलचा दुस्वास म्हणावे काय? ;) - (सध्या चेन्नैत असलेला पुणेकर) सोकाजी

In reply to by कवितानागेश

आम्ही पुण्यात नाही रहात.
सहानुभूती आहे ग माऊ ;)
वीज असते आमच्याकडे.
अरे! तरीही (पुण्यात न राहूनही) वीज असते तुमच्याकडे? वा वा! अभिनंदन!!! ;)

In reply to by शुचि

जबरा. (नान्या तुझ्या धाग्याची गाडी आता पुण्याच्या ठेसनात आली. आणखी शंभर म्हणशील तरी सहज होणार बघ.)

वा वा! चहा म्हणजे अत्यंत आवडता... त्याचे पाकृ इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्याकडे हीच पाकृ जरा वेगळ्या पद्धतीने करतात. दूध वगळता बाकीचे मिश्रण एकत्र करून त्याला आधी उकळी आणली जाते आणि २ -३ मिनीट उकळल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा थोडे उकळले जाते. असो. ही पाकृ चहा न घेणार्‍या नवर्‍याकडून कशी करून घ्यावी?

In reply to by स्मिता.

चहा न घेणार्‍या की 'तुमच्या हातचा चहा' न घेणार्‍या हे स्पष्ट केले तर बरे होईल. (गायबलो आहे)

In reply to by रमताराम

चहा न घेणार्‍या की 'तुमच्या हातचा चहा' न घेणार्‍या हे स्पष्ट केले तर बरे होईल.
एक वेळ माझ्या हातचा चहा न घेणारा नवरा परवडला असता, पण अजिबातच चहा न घेणारा असल्याने कधी म्हणजे कधी आयता चहा मिळण्याचे सुख नाही हो आमच्या नशिबी ;)

In reply to by स्मिता.

आपण घेत नसलो म्हणून इतरांनाही न पाजणार्‍याच्या नावे नेहमीच इतर बोटे मोडतात. पेयं/नातं कुठलंही असो.

नानाजी, नको असलेल्या पाहुण्यांना पळविण्यासाठी यात कशाची अ‍ॅडिशन करावी हे कृपया सांगावे.

In reply to by सस्नेह

आल्या अ‍ॅवजी सुन्ठ घालायचि आनि साखर घालायचीच नाय , पावने परत येत नायत आलेच तरि चहा पिन्यासाठी थांबत नायत :P

नुकताच इथे ( नाशिक ) तुफान पाउस पडल्यामुळे पाकृ समयोचित वाटली. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता इथं (फुकट) चा पाजणारा मित्र शोधणं आलं ;)

नाना चेंगट यांच्याकडून दुसर्‍या इनिंगमधे खूप अपेक्षा होत्या. असो....चालायचेच. -दिलीप बिरुटे

मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे)
=)) =)) =)) नीळा गुलाब छान आहे बरका कपावरचा. सुंदर कपबशी दाखवून - समस्त स्त्रीवर्गाला भुरळ (धाग्याची ;) ) पाडण्याचा क्षीण प्रयत्न.

In reply to by कुंदन

स्त्रीवर्ग म्हणून जातीयवादी? म्हणजे नाना पुरुषवर्गालादेखील भुरळ पाडू पहातात असं म्हणायचय का तुम्हाला कुंदन ;)

पाकृ आवडलेली आहे आज घरी जाऊन केली जाईल... आणखी काही पाकृ सुचवितो १. पाणी गरम करणे २. हॉटेलातून आणलेले जेवण भांड्यात काढून खाणे ३. लिंबू पाणी ४. फ्रीजमधे पाणी थंड करणे ५. पोळ्यांची पाकृ (झालेली आहे वाटतं आधीच) ६. ......... इत्यादी, इत्यादी....यांचापण मिपावरील बल्लवाचार्यांनी विचार करावा... या सगळ्या नाविन्यपूर्ण पाकृपण येऊ द्या.... :-) बाकी, यक्कुरावांशी फाटलेल्या चहाविषयी सहमत. अमृत

सर्वप्रथम शंभरी गाठल्याबद्दल अभिनंदन! १. एक कप चहाला पाऊणकप पाणी पुरते. २. चहा फक्त पाण्याबरोबर गरम करावा व उकळी येताच लगेच गॅस बंद करुन वर झाकण ठेवावे. ३. चहा मोजून ३ मिनिटे मुरवावा. ४. लगेच कपात गाळून रंग येण्यापुरते दूध घालावे. ५. नंतर लागेल तशी (१ चमचाच) साखर घालावी. मग बघा कसा चहा लागतो ते. वि.सू. - साखर पाण्यात उकळली तर तिचे सक्रोज(जास्त गोड) मधून ग्लुकोज व फ्रक्टोज या घटकांमधे विघटन होते. हे दोन्ही घटक कमी गोड असतात. तसेच थोडी साखर ही चोथ्यावर अ‍ॅडसॉर्ब होते. परिणामी एकूण साखर जास्त लागते. वरील कृतीमधे साखरेची बचत होऊन सुद्धा तेवढाच गोडवा मिळतो. -- (मूळचा पुणेरी) तिरशिंगराव काटकसरे

In reply to by तिमा

चहात वरून साखर घातली की चहाचा सत्यानाश होतो. असला चहा आमच्या पुण्यात कधीच करत नाहीत. उगाच कैच्याकै पुड्या सोडू नका. साखर थोडी जास्त लागली तरी चालेल पण चहा साखर कसे एकजीव होऊन चहा नावाचे रसायन तयार व्हायला हवे राव, मग मस्त मझा येतो. (जन्मजात, अस्सल पेठेतला नि अजूनही पुणेकर) रमताराम

In reply to by रमताराम

ररा आजोबांशी सहमत ;) शिवाय साखर वरून घातली की विरघळेपर्यंत चहा थंड होतो, तेव्हा चहा करतानाच साखर घातलेली केव्हाही बेश्टच!!

इराणमधे साखरेचा क्युब तोंडात धरुन बिनसाखरेचा चहा सिप सिप करुन पितात. संदर्भः इराणीगाथा - मीना प्रभु