आजकाल घरी जितक्या लग्नपत्रिका येतात तितकेच, किंबहुना एखाद दोन चढच, घटस्फोटांचे प्रसंग कानावर येतात. मर्जीप्रमाणे शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण का वाढले आहे ?
दोन घटना अगदी समोर आहेत.
संकेत अभियांत्रिकी पदवीधर. बाळबोध वळणाचे मराठी घराणे. सहा आकडी पॅकेजवाली नोकरी. दिल्लीमध्ये संकेत कंपनीच्या फ्लॅट मध्ये रहात असलेला. कर्नाटक सीमेवरच्या लहानशा गावातली साध्या घरातली मध्यमवर्गीय सुशिक्षित पण जॉब न करणारी मुलगी पाहून लग्न झाले. दोनेक महिन्यांनी वधूवर संकेत अन संमिता दिल्लीला राहावयास गेले. साधारण सहा महिन्यांनी कुरबुरी कानावर येऊ लागल्या. आणखी दोन महिन्यांनी संमिता दिल्लीतून परस्परच माहेरी गेली. दिवाळसण दोघांनी आपापल्या घरीच साजरा केला. चार महिन्यांनी संकेतही नोकरी सोडून महाराष्ट्रात परत आला.
चौकशी नंतर समजले. संमिताला छानछोकीची अति हौस. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. पगार झाला की नवनवीन खरेदीचा अन रोजच बाहेर खाण्याचा षोक. पगार पुरेना. मग वाद सुरु झाले. काही समजावण्याचा प्रयत्न केला की संमिता वाद घाली अगर रुसून बसे. एकदा मित्र मंडळींच्या समक्ष तिने यावरून संकेतचा अपमान केला. झाले. बोलाचाली विकोपाला गेली अन ती माहेरी निघून गेली.
प्रतिपक्षाकडे मध्यस्थांना पाठवून चौकशी केली तर तिचे म्हणणे नवरा काही हौस मौज करीत नाही. सतत कामात असतो. सुट्ट्या घेत नाही. सदा घरचेच खाणे त्याला हवे असते. माझी कामातून सुटका नाही इ.
किरकोळ कारणे. पण खूपदा मध्यस्थीचा प्रयत्न करूनही वाद शेवट पर्यंत सुटला नाही. परिणाम घटस्फोट.
एक वर्षाने संकेतचे दुसरे लग्न झाले. साधारण तशाच परिस्थितीतील मुलीशी. आता सर्व ठीक आहे. संकेत आईवडिलांच्या घरीच रुपालीसह राहतो अन दोघेही शांत अन समाधानी आहेत.
नेहा बी. ए. एम. एस. पदवीधर. लग्नापुर्वीची मेडिकल प्रॅक्टिस सासू सासऱ्यांच्या विनंतीखातर सोडली. पती राकेश उद्योगपती. १२ तास बिझी. घराचे वळण असे की कामाशिवाय अन सासू- सासऱ्यांच्या परवानगीशिवाय बाहेरसुद्धा पडायचे नाही. नेहाने राकेशच्या कानावर घालून ही पद्धत बदलण्याचा म्हणजे सांगून जाणे ठीक पण परवानगीची गरज आहे का इ. सांगण्याचा प्रयत्न केला. पण राकेशचे म्हणणे तू काहीही कर, माझ्या आईवडिलांना दुखवू नको.
एकदा महिला मंडळाची एक नाटिका होती. त्यात नेहाने भाग घेतला. घरी सांगितले तर परवानगी मिळणार नाही म्हणून फक्त पाहायला जाते म्हणून सांगितले. सासरी सुनेने नाटकात काम केलेले समजताच गहजब झाला. नेहाला जाब विचारण्यात आला. राकेश मध्ये बोलायला तयार नाही. नेहाने खंबीरपणे आपली बाजू मांडली. पण तिच्या म्हणण्याला किंमत दिली गेली नाही.
नेहा माहेरी निघून आली. मध्यस्थीचे प्रयत्न फसले. परिणाम घटस्फोट.
असे काही ऐकले की मला माझ्या दूरच्या नात्यातल्या सुमा अक्काची आठवण येते. माझ्यापेक्षा ती दहा वर्षांनी मोठी. पन्नाशीत नुकतेच पदार्पण केले असेल. पण ती अन माझे भाऊजी यांना अजुनी एकमेकांशिवाय दोन दिवसही राहवत नाही. सुमा अक्काशिवाय राजा भाउजींचे पानही हलत नाही. ती माहेरी आली की दुसऱ्या दिवशी भाउजी तिच्या पाठी , काही एक विसरलेली वस्तू द्यायला म्हणून येत. मग १ दिवस राहून ते गेले की तिसऱ्या दिवशी तिच्या सासूबाईंचा फोन येई. 'अगं, माझा पाय दुखावला आहे, आज ये तू.' पाठोपाठ भाउजी तिला न्यायला हजर ! झाले ! मग सुमा अक्काचीही लगबग सुरु होई सामान गुंडाळायची. आम्ही भावंडे, सुमा अक्काला २ दिवसांपेक्षा जास्त माहेरी राहू देत नाहीत म्हणून भाऊजींशी वाद घालायचो. भाउजी नुसते हसून उडवून लावीत.
तीन मुले आता मोठी झाली आहेत अन आमच्याबरोबर तीही भाऊजींच्या सारखे ‘सुमा सुमा’ करण्यावरून त्यांची नर्म चेष्टाही करतात. भाउजी म्हणतात, 'काय रे, तुमच्या बायका अन नवरे तुमच्याशी गुलुगुलू करत नाहीत म्हणून जळता काय ?'
कधी कधी निवांतपणे गप्पा मारताना सुमा अक्का सांगत असे.
'अगं, सोळाव्या वर्षी लग्न झालं माझं. हे तेव्हा अठरा वर्षाचे. का S ही समजत नव्हतं. दोनेक वर्षं तर मी सासूबाईंजवळच झोपायची. दिवसभर हे कॉलेजला जात. मी सासुबाईंच्या हाताखाली बारीक सारीक काम करी.
मी काही सुरुवातीला यांच्याशी बोलतच नसे. संध्याकाळी ते आल्यावर बोलायचा प्रयत्न करीत. हळू हळू भीड चेपली. मग एकमेकांची ओळख होत गेली. स्वभावाचे कंगोरे ध्यानात येऊ लागले. एकमेकांमध्ये रस वाटू लागला. कधी बोलावे, कधी गप्प बसावे, अनुभवाने समजू लागले. कधी भांडणे होत. एखादा दिवस अबोल्यात जाई. पण अळवावरच्या पाण्यासारखा तो कधी गळून जाई ते लक्षातहि येत नसे. शिवाय सासू सासऱ्यांची ढाल असेच आडोशाला. तेही आम्हा मुलांच्या या खेळावर मजेने लक्ष ठेवत.
एकमेकांचे बारकावे समजून घेण्याची घाई नसायची. दर दिवशी नवीन ओळख होई एकमेकांचे नवे पैलू समजत. दोघांच्या आवडीनिवडी बरोबरीने विकसित होत गेल्या. लवचिक वयात तडजोड सोपी असते म्हणतात. दुसऱ्याची नावडीची गोष्ट सहज टाळण्यात काही विशेष त्रास वाटायचा नाही.
मुले झाली तीही सर्व पंचविशीच्या आत. तुझे भाउजी मुलांनाही सांभाळण्यात आघाडीवर असायचे. कारण मुलांचे उरकल्याशिवाय त्यांना माझा सहवास मिळणे मुश्कील ! सासुबाई असेपर्यंत तर आम्ही भरपूर हिंडणे फिरणे, उनाडक्या केल्या. त्या गेल्यावर आंम्ही एकमेकांच्या अन मुलांच्या अधिकच जवळ आलो.
अन आता तर मला त्यांच्या अन माझ्या वेगळ्या अशा काही बाबी आहेत असं काही वाटतच नाही. जे त्यांचं ते माझं अन जे माझं ते त्यांचं ! आता माहेरच परकं वाटतं बघ !'
या पार्श्वभूमीवर वाटते की इतके उच्च शिक्षण घेतलेल्या अन बाह्य जगाचा अनुभव असलेल्या या तरुण तरुणींचं अन त्यांच्या आईवडिलांचं काही चुकतंय का ? तत्वांमध्ये सुधारणा करण्याची तयारी नसते का ? की लग्नसंस्था ही व्यक्तिगत आशा आकांक्षां अन मानसन्मानापुढे दुय्यम समजली जात आहे ? मुळात आज लग्नसंस्थेची कुणाला गरज तरी राहिली आहे का, अशी शंका ही घटस्फोटांची प्रकरणे पाहून येऊ लागली आहे. यावर विचारी वाचकांकडून कारणमिमांसा अपेक्षित आहेत.
वाचने
11328
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्ली मिळतो लवकर म्हणून जास्त
मान्यवर संसारी सदस्यांच्या
नुस्ते पॉपकॉर्न गिळण्यापेक्षा
In reply to मान्यवर संसारी सदस्यांच्या by स्पा
आजकाल खिचडी, पुर्या, खीर,
In reply to नुस्ते पॉपकॉर्न गिळण्यापेक्षा by गवि
पण मग पर्याय काय?
का हो
In reply to पण मग पर्याय काय? by योगप्रभू
रामा..प्रत्येक शब्दाकडे संशयानेच बघणार का?
In reply to का हो by रमताराम
अरेच्या
In reply to रामा..प्रत्येक शब्दाकडे संशयानेच बघणार का? by योगप्रभू
तुमची संस्कृती अद्याप फारशी समजलेली नाही..
In reply to अरेच्या by रमताराम
मिंगल
In reply to तुमची संस्कृती अद्याप फारशी समजलेली नाही.. by योगप्रभू
ज्यांचे घटस्फोट ..
काय
अपेक्षा
कानुन
अच्छा हात का?
In reply to कानुन by विनायक प्रभू
कानुन
माघार
माघार
पायीची वहाण पायी बरी,
कृपया स्पष्ट कराल का?
In reply to पायीची वहाण पायी बरी, by ज्ञानोबाचे पैजार
मला समजले ते असे
In reply to कृपया स्पष्ट कराल का? by Pearl
अरे बापरे....
In reply to मला समजले ते असे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्वी टाकल्या जाणार्या,
विषय अनंत आहे.
स्वातंत्र्याचा साईड इफेक्ट
-
रा. रा. माननीय परा यांनी
In reply to - by अमोल केळकर
हायकोडताचा सल्ला...
आजच्या काळात सीतेसारखं राहणं
In reply to हायकोडताचा सल्ला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भ
In reply to हायकोडताचा सल्ला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते
माझ्या
In reply to मला वाटते by सूर्यपुत्र
डिवोर्सचं एकमेव कारण पती-पत्नीचं न जमणं आहे
>>> विवाहसंस्था हा समग्र
In reply to डिवोर्सचं एकमेव कारण पती-पत्नीचं न जमणं आहे by संजय क्षीरसागर
बालविवाह!
भारत सरकारला जर कळवणारच असाल
In reply to बालविवाह! by साती
>>३क. पुरूषांसोबत कसलेही
In reply to भारत सरकारला जर कळवणारच असाल by मस्त कलंदर
सातीताई, कृपया हे लक्षात
In reply to बालविवाह! by साती
-
In reply to सातीताई, कृपया हे लक्षात by सस्नेह
घटस्फोटाचे प्रमाण वाढले
हम्म
In reply to घटस्फोटाचे प्रमाण वाढले by कवितानागेश
वाढले
सहमत
In reply to वाढले by नितिन थत्ते
मराठी संकेतस्थळे वाढली
जमलं तर ठीक नाहीच जमलं तर (अन
पोरांची समस्या कोणीच गृहीत धरत नाहीये..
In reply to जमलं तर ठीक नाहीच जमलं तर (अन by शिल्पा ब
ओळखीत एक व्यक्ती आहे तिला दोन
In reply to पोरांची समस्या कोणीच गृहीत धरत नाहीये.. by गवि