साहित्यः
१ वाटी लापशी रवा
(दलिया )
१ वाटी चिरलेला गुळ
(साधारण एवढा लागतो, तरी आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
१ वाटी दूध
१ वाटी पाणी
१/२ वाटी खवलेला ओला नारळ
( आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
२-३ टेस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून वेलचीपूड
काजु, बदामाचे काप, बेदाणे
पाकृ:
प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून लापशी रवा मंद आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्या.

दुसर्या भांड्यात दूध व पाणी एकत्र करुन त्यात परतलेला रवा घालून प्रेशर कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्या.

कढईत शिजवलेला लापशी रवा व गुळ एकत्र करा व मंद आचेवर गुळ विरघळेपर्यंत परतून घ्या.

आता त्यात सुका-मेवा व ओला नारळ घालून सगळे एकत्र करा. सतत परता कारण गुळामुळे सांजा लागू शकतो.

वेलचीपूड घाला आणी एकत्र करा. आवडत असल्यास वरुन साजूक तूप सोडा.

गरमा-गरम गोडाचा सांजा खायला सुरु करा :)

गुळामुळे सांजा खमंग लागतो .
प्रतिक्रिया
अप्रतिम
पदार्थ एकदम अनोखा नसला तरी
इथे बघा
In reply to पदार्थ एकदम अनोखा नसला तरी by गवि
परत परत काय प्रतिक्रिया
नेहेमीचा प्रतिसाद दिला आहे
+१
In reply to नेहेमीचा प्रतिसाद दिला आहे by अत्रुप्त आत्मा
वा!
धन्यवाद पैसाताई
In reply to वा! by पैसा
कुकरमध्येच शिजवलेला
In reply to धन्यवाद पैसाताई by सानिकास्वप्निल
गोड सांजा
ह्या बाइंना
नको. काळं पाणी घालून काहीतरी
In reply to ह्या बाइंना by इरसाल
RIP
जरा बरे शब्द तोंडातून काढायला
In reply to RIP by परिकथेतील राजकुमार
सानिके, असा सांजा मी प्रथमच
अरे वाह!
In reply to सानिके, असा सांजा मी प्रथमच by रेवती
हॅट्स ऑफ.
मस्त मस्त मस्त!!!!
ज ब री
लापशी रवा म्हणजे केशरी रवाच
छान आहे. दलिया आणुन ठेवलाय पण
जरा तिखट मिठाचं काही होतं का
In reply to छान आहे. दलिया आणुन ठेवलाय पण by शिल्पा ब
तिखट मिठाचा सांजा
In reply to जरा तिखट मिठाचं काही होतं का by गवि
हा वेगळा आणि मी वर म्हटलेला
In reply to तिखट मिठाचा सांजा by पैसा
हे पण बरोबर आहे.
In reply to हा वेगळा आणि मी वर म्हटलेला by गवि
शिल्पातै, या दलियाला कोरडे
In reply to छान आहे. दलिया आणुन ठेवलाय पण by शिल्पा ब
बेस्ट. तुमची अन गविंची पाकृ
In reply to शिल्पातै, या दलियाला कोरडे by रेवती
हा पहा, मी म्हणत असलेला
In reply to बेस्ट. तुमची अन गविंची पाकृ by शिल्पा ब
आमच्या लहानपणी शिरा नव्हता
ह्याला लापशी म्हणतात
गव्हाची लापशी. तों. पा. सु.
सुंदर, अतोनात सुंदर......
मस्तच -- लहानपणची आठवण झाली,
वाह! खल्लास
वॉव्...एकदम तोंपासु!!