Skip to main content

)) नेहमीच ... तुझ्यामुळे ((

लेखक बिनडोक बनी यांनी सोमवार, 04/08/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ घेतो चिकार नेहमीच ... तुझ्यामुळे घालतो घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कानांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे गाली ठसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिली धार चढते फार नेहमीच ... तुझ्यामुळे सोड्याचा वीट घेतोय नीट नेहमीच ... तुझ्यामुळे बनीची भेट विडंबन रेट नेहमीच ... तुझ्यामुळे - बिनडोक बनी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3537
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सही रे बनी .. मस्त मस्त !!

एक सो एक विडंबन आहेत :) एकाच कवितेवर ३ विडंबन :) बेसनलाडु , तुमची कविता काय होती हो (विसरले ना मी हे विडंबन वाचुन ) :?

छान आहे विडंबन! (सर्वव्यापी) टिंग्या ;) अवांतर - चारोळ्या सोडुन एकदम विडंबनात कशी काय शिरली तु?

कानांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे गाली ठसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे हाहाहाहा! भारी! (हसरा)बेसनलाडू

बने, मस्त विडंबन गं! :) अवांतर - तुझा आयडी खूप आवडला... :)

>> शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिली धार चढते फार नेहमीच ... तुझ्यामुळे हे तर फारच उच्च..... जियो ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

गाली ठसे आणि सोड्याचा वीट, घेतोय नीट हे आवडले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

(स्वगत - बनी ग बनी काय तुझ्या मनी? चारोळ्यांचे विडंबन आरोळ्या असे होईल का? :W :? ) चतुरंग

मस्तच विडंबन गं! आणि आयडी सुद्धा... -बिनधोक इन्या कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सोड्याचा वीट घेतोय नीट नेहमीच ... तुझ्यामुळे हे जास्त पटले !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पण शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिली धार चढते फार नेहमीच ... तुझ्यामुळे हे भारी होतं... :D :D :D