राम्राम मंडळी...
स्पा सारख्या आमच्या पाड्यावरच्या नवशिक्या होतकरु मित्रांसाठी ही पेशल पा कृ: वालाच्या शेंगांची रस्सा भाजी अन घडीच्या चपात्या.
साहित्य :
१) वालाच्या शेंगा ( नीट निवडुन , नाकी काढुन , कापुन) ( इकडे मिळतात तशा , पणं आमच्या मातोश्रीनी नीट साफ करुन वाळवुन डबा भरुन दिलाय. त्या शेंगा मी कुकर मध्ये वाफवुन घेतल्या)
२) २ हिरव्या मिरच्या
३) १ मोठी लसुण पाकळी
४) मुठभर शेंगदाणे
५) १ जुडी कोथिंबीर ( निवडुन ) , कोण रे तो कोथिंबीरीच्या काड्या बोलला तो. नको असलेल्या काड्या आमच्या बिका ला द्याव्यात.
६) १ चमचा तेल , फोडणी साठी
७) हिंग-जिरे-मोहोरी-हळद इ. ठेवलेला मसाल्याचा डबा.
८) मीठ
कृती:
वालाच्या शेंगा कुकर मध्ये शिजवायला लावा , अन तोवर चटणीची तयारी करा.
प्रथम २ हिरव्या मिरच्या अन मुठभर शेंगदाणे भाजुन घ्या.
तिकडे कुकरच्या २ शिट्या झाल्या की कुकरच्या खाली असलेला गॅस बंद करा.
कोथिंबीर , भाजलेल्या २ हिरव्या मिरच्या अन मुठभर शेंगदाणे , लसणाची पाकळी मिक्सर मध्ये टाकुन चटणी करुन घ्या.
एका कढईत थोडे तेल तापवायला ठेवा, तेल तापले की हिंग-जिरे-मोहोरी याची फोडणी द्या. अन मग त्यात चटणी + हळद टाका. हे सगळे मिश्रण चांगली एकजीव होईल अशा पद्धतीने चमच्याने / कलथ्याने ठवळत रहा.
२-५ मिनिटात हे चांगले परतले गेले की चटणीच्या रिकाम्या भांड्यात थोडे पाणी टाकुन ते भांडे चांगली विसळुन घ्या , तेच पाणी भाजीत वापरता येईल. तिकडे गार झालेला असेल कुकर. तो उघडा अन त्यातल्या शेंगा कढईत टाका अन गॅस मोठा करुन वरुन झाकण ठेउन द्या.
भाजीला चांगली उकळी आली की गॅस बंद करुन टाका.
आता भाजी चांगली शिजेपर्यंत चपाती साठी कणीक भिजवायला घ्या. ज्यांना चपाती जमणार नसेल त्यानी यापुढील भाग ऑप्शनला टाकला तरी चालेल असे लोक मौ भाताबरोबर ( स्पा ऐकतोयेस ना :-) ) ही भाजी खाउ शकतात.
तर , एका स्वच्छ ताटात कणीक घ्या , प्रमाण : ४ पोळ्यासाठी साधारण पणे ५-६ मुठी कणीक पुरावी असा माझा अंदाज.
थोडे थोडे पाणी टाकत ही कणीक भिजवा.
चांगली तिंबवा कणीक ;-) , त्यासाठी आपण बॉसला चांगले बुकलुन काढतोय अशी कल्पना करा.
मग त्या तंबलेल्या कणकेचे साधापण टे टे चे चेंड्युच्या ( पिंग पाँग बॉल ) आकाराचे गोळे करा अन त्यांना कणकेत लडबडुन घ्या. ( छ्या ... दमलो ब्वॉ टंकुन टंकुन , लोक मेगाबाय्टी प्रतिसाद कसे टंकतात बुवा ? )
तर ...
ह्या गोळ्याला पोळपाटावर ठेवुन पुरीच्या / लंबगोलाकृती आकारात लाटुन घ्या.
ह्या आकाराला दोन बोटांनी खालील प्रमाणी फुलपाखरा सारखा आकार द्या.
मग हे २ भाग एकावर एक ठेवुन कडा चांगल्या जुळवुन घ्या.
एककडे गॅस चालु करौन त्यावर तवा तापायला ठेवा.
चार पदरी पोळी पायजेल का , तर मग अजुन एक घडी मारा.
बनलेल्या या आकाराला पुन्हा एकदा कणकेत लडबडुन घ्या , म्हणजे चपाती लाटताना पोळपाटाला चिटकणार/चिकटणार नाही. लाटण्याने पोळी लाटा.
चपाती चांगली गोल जमली की नै ? मग .. सोप्प आहे ते.
दुसरी चपाती लाटता लाटता , तव्यावर टाकलेली चपाती अधुन मधुन उलटत रहा. दोन्ही बाजुन चपाती चांगली शेकली गेली पाहिजे.
अशा पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या चपात्या करुन घ्या.
एका ताटलीत भाजी अन ताटात चपात्या घ्या , लॅपटॉप वर एखादा झकास पैकी पिक्चर लावा अन ओरपा.
समाप्त.. ;-)

वाचने
18202
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
भाजीत घालण्याआधीच संपेल.
In reply to मस्त by शुचि
भाऊजी, पोळी मस्तच जमलिये.
भाजीचे फटू असे लांबून का काढलेत?
In reply to भाऊजी, पोळी मस्तच जमलिये. by रेवती
____/\___!!! आज पुरले नवस,
भाजीची रेसीपी छान....वाटण ही
चामारी
(No subject)
ह्म्म्म
सहज राव,
In reply to ह्म्म्म by सहज
वा भिडू.
झकास हो कुंदनशेठ.
मला तर मुळात शेंगाच दिसल्या
कडवे वाल म्हणजे बिरडं.
In reply to मला तर मुळात शेंगाच दिसल्या by ५० फक्त
?

वा रे कुंद्या!
अरे वा
भाजी झकासच झाली असणार,
म्हणजे त्याचे असे आहे
In reply to भाजी झकासच झाली असणार, by सूड
भेंडी !
In reply to म्हणजे त्याचे असे आहे by कुंदन
ते

पण पोळ्या म्हणजे हल्लीच्या
In reply to भाजी झकासच झाली असणार, by सूड
>>सुडा हे वाचलस ना ? वाचलं की
In reply to पण पोळ्या म्हणजे हल्लीच्या by पियुशा
भाजीतल्या शेंगा दिसेच ना राव.
गणप्या
In reply to भाजीतल्या शेंगा दिसेच ना राव. by गणपा
...
In reply to गणप्या by कुंदन
@कुन्द्र्या हाड मौ करू का?
In reply to ... by स्पा
आता कळळ तु दुबैत हाटीलात
त्याच
In reply to आता कळळ तु दुबैत हाटीलात by नाना चेंगट
ते पण शेफ च्या हाताखाली (
+१
In reply to ते पण शेफ च्या हाताखाली ( by सुहास..
शेंगांची पेस्ट केली का ????
शेंगांची पेस्ट केली का ????
कुठे दिसतच नाहित शेंगा..
In reply to शेंगांची पेस्ट केली का ???? by नेहरिन
छान छान
बर्याच वेळा केली जाते...
In reply to छान छान by स्मिता.
व्वा!!!
कुंद्या बाकी कसाही असला तरी
धन्यवाद रे बिप्स
In reply to कुंद्या बाकी कसाही असला तरी by बिपिन कार्यकर्ते
दाणे लावून भाजी...
तेल??
वातड
In reply to तेल?? by प्रभाकर पेठकर
कुंदन, पुढच्या वेळेस ताटली
अय्या!
In reply to कुंदन, पुढच्या वेळेस ताटली by ३_१४ विक्षिप्त अदिती
आई...
In reply to अय्या! by स्मिता.
आम्ही काय, वाल निवडून
In reply to आई... by प्रभाकर पेठकर
भयंकर विनोद
In reply to आम्ही काय, वाल निवडून by ३_१४ विक्षिप्त अदिती
महाभयंकर विनोद !!
In reply to भयंकर विनोद by परिकथेतील राजकुमार
हो तर!
In reply to भयंकर विनोद by परिकथेतील राजकुमार
=)) =))
In reply to हो तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
भाजीची पा़कृ