तमाम भारतीयांच्या लाडक्या सचिनला राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदारकी मिळणार म्हणल्यापासून विविध प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. त्यात विशेष करून पक्षिय राजकारणाचा वाद देखील आलेला दिसून येतो. मला तो मान्य नाही असे आधीच स्पष्ट करतो. म्हणजे, सत्ताधार्यांनी यात राजकारण केले आहे यात शंका नाही. पण ते कोणीही केले असते. त्यात नवल नाही. पण घटने प्रमाणे: राष्ट्रपती नियुक्त खासदार हा कुठल्याही पक्षाचा नसतो. अर्थात त्याला/तिला सहा महीन्यात (हव्या त्या) पक्षात प्रवेश करण्याची मुभा आहे. पंडीत नेहरूंच्या शब्दातः "…The President has nominated some members of the Council of States who, if I may say so, are among the most distinguished, taking everybody in Parliament altogether – it is true, distinguished in arts, science, etc. – and our Constitution in its wisdom gave that. They do not represent political parties or anything, but they represent really the high watermark of literature or art or culture or whatever it may be."
लोकशाही असल्याने कुणी राजकारणात जायचे, जायचे असल्यास कुठल्या पक्षात जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अमिताभ, राजेश खन्ना, गोविंदा, जयाप्रदा, हेमा मालिनी, वैजयंती माला, धर्मेन्द्र वगैरे अनेक लोकप्रिय कलाकारांनी राजकारणात (दिवे लावत) यशस्वी होण्याचा प्रयत्न केला. त्यात आता सचिनची भर पडली म्हणून आणि ती देखील केवळ काँग्रेसने नाव सुचवले म्हणून पोटशूळ उठायची काहीच गरज नाही असे वाटते.
पण तरी देखील एक महत्वाचा प्रश्न पडला, जो आशा करतो की काँग्रेसच्या आणि सचिनच्या मधे येणार नाही:
आजपर्यंत जे सरकार खासदारकी देण्यास तयार आहे तेच सरकार सचिनला भारतरत्न का देऊ शकले नाही? कारण भारताच्या प्रथम राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांनी भारतरत्न पारीतोषिक जाहीर केले तेंव्हा ते कला, वाड्मय, विज्ञान आणि समाजसेवा (Literature, science, art and social service) यांच्यापुरतेच मर्यादीत होते म्हणून. आता त्यात क्रिडा पण घातले गेले आहे. नियम बदलला गेला आहे. त्यामुळे आता मिळू शकेल आणि आशा करतो मिळेल.
पण राष्ट्रपती नियुक्त खासदारकी हे भारतरत्नापेक्षाही अधिक महत्वाचे प्रकरण आहे. कारण, नियुक्त खासदारकी हा राज्यघटनेचा भाग आहे. भारतीय घटनेच्या ८०व्या कलमा (आर्टीकल) नुसार राष्ट्रपती १२ व्यक्तींना खासदार म्हणून नियुक्त करू शकतात. पण घटनेत लिहील्याप्रमाणे:The members to be nominated by the President under sub clause (a) of clause shall consist of persons having special knowledge or practical experience in respect of such matters as the following, namely: Literature, science, art and social service (अधोरेखीत मी केले आहे).
भारतरत्नासाठीचा नियम बदलणे हे मंत्रिमंडळाला शक्य आहे. पण राष्ट्रपतीनियुक्त खासदारकीत "क्रिडा" क्षेत्र घालण्यासाठी घटनादुरूस्तीची अवशक्यता आहे असे वाटते. तशी घटनादुरुस्ती करून ८०व्या कलमात क्रिडाक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे का? मी जे काही शोधण्याचा प्रयत्न केला त्यातून तरी काही त्या पुष्ट्यर्थ मिळालेले नाही. आत्ता पर्यंत केवळ दारासिंग हाच राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे जो खेळाडू आहे, पण त्याच बरोबर कलाकार देखील आहे (म्हणून शक्य झाले).
मग सचिनची अशी नियुक्ती करणे हे घटनाबाह्य ठरणार नाही का? तुम्हाला काय वाटते अथवा यासंदर्भात माहीत आहे? एकदा का सचिनने खासदारकीवर सही केली त्याचे नंतर हसे होऊ नये म्हणून हा प्रश्न आहे.
वाचने
12304
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोहा गरम है , मार दो हतौडा !!
सचिनपण कलाकार आहे.. पेप्सीची
पण मग
In reply to सचिनपण कलाकार आहे.. पेप्सीची by JAGOMOHANPYARE
भारत रत्न व्हायला त्याची
In reply to पण मग by विकास
नाही कसा?
...
In reply to नाही कसा? by पैसा
बरोबर आहे!
In reply to ... by विकास
सचिन सोशल सर्विस सुद्धा
त्यासाठीदेखील
In reply to सचिन सोशल सर्विस सुद्धा by JAGOMOHANPYARE
पुन्हा तेच! त्याची सोशल
In reply to त्यासाठीदेखील by विकास
बरं
In reply to पुन्हा तेच! त्याची सोशल by JAGOMOHANPYARE
'असेल तर' म्हणजे? आहेच
In reply to बरं by विकास
का म्हणून?
-स्वयंघोषित स्वयंसेवक ....
In reply to का म्हणून? by पिवळा डांबिस
कला
In reply to -स्वयंघोषित स्वयंसेवक .... by अर्धवटराव
नाहीहो...
In reply to का म्हणून? by पिवळा डांबिस
ईथे
हम्म
In reply to ईथे by चिरोटा
दारा सिंग त्यांचा गांधी
In reply to हम्म by विकास
प्रश्न तो नाही
In reply to दारा सिंग त्यांचा गांधी by निनाद मुक्काम …
अनेक नादान राज्यकर्ते हे
In reply to प्रश्न तो नाही by विकास
ह्म्म्म
In reply to अनेक नादान राज्यकर्ते हे by निनाद मुक्काम …
पद्मविभूषण
In reply to ह्म्म्म by नितिन थत्ते
फेणाणी ह्याचे संगीतात स्वतःचे
In reply to पद्मविभूषण by विकास
बेजबाबदार ?
In reply to फेणाणी ह्याचे संगीतात स्वतःचे by निनाद मुक्काम …
पैसा शी सहमत
सरासरी
फलंदाजीची कला
समाजसेवक
पण
In reply to समाजसेवक by क्लिंटन
+
In reply to समाजसेवक by क्लिंटन
खासदार सचिन
आयला...
The members to be nominated
आयला
In reply to The members to be nominated by सुधीर१३७
तीन शंका :-
अडवानीना संपर्क करा... या
In reply to तीन शंका :- by परिकथेतील राजकुमार
एकदम अडवानी कशाला ?
In reply to अडवानीना संपर्क करा... या by JAGOMOHANPYARE
रामदास आठवले आमचे नाहीत..
In reply to एकदम अडवानी कशाला ? by परिकथेतील राजकुमार
=))
In reply to रामदास आठवले आमचे नाहीत.. by JAGOMOHANPYARE
'तुमचे' आठवले असे तुम्हीच तर
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
पराशेठ आणि जागोमोहनप्यारे या
In reply to 'तुमचे' आठवले असे तुम्हीच तर by JAGOMOHANPYARE
लिहायला मी काही लिहिन हो.
In reply to 'तुमचे' आठवले असे तुम्हीच तर by JAGOMOHANPYARE
प्रस्ताव
In reply to तीन शंका :- by परिकथेतील राजकुमार
काय विकासराव.
सुधीर यांच्याशी सहमत
+/-
In reply to सुधीर यांच्याशी सहमत by ऋषिकेश
संदिग्धता
In reply to सुधीर यांच्याशी सहमत by ऋषिकेश
चांगली चर्चा.
विकास
ज्या देशात अजूनही "पडोगे,
अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रकरण दाखल.
ज्युरिस्डिक्शन
In reply to अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रकरण दाखल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कदाचीत
In reply to ज्युरिस्डिक्शन by नितिन थत्ते
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा
In reply to ज्युरिस्डिक्शन by नितिन थत्ते
आयपीएल च्य ऐवजी पीआयएल
In reply to अलाहाबाद उच्च न्यायालयाचा by पुण्याचे वटवाघूळ
लक्षवेधी सवाल!
In reply to ज्युरिस्डिक्शन by नितिन थत्ते
.
In reply to लक्षवेधी सवाल! by पिवळा डांबिस
१९७५
In reply to लक्षवेधी सवाल! by पिवळा डांबिस
माझं मत.
In reply to १९७५ by नितिन थत्ते
७ मे ला अलाहाबाद
In reply to १९७५ by नितिन थत्ते
तुम्हाला उद्देशून नाही
In reply to ७ मे ला अलाहाबाद by विकास