साहित्य गार्लिक -कोरीएंडर नान :
१ वाटी मैदा
२ टेस्पून दही
२ टेस्पून कोमट पाणी
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
२-३ लसूण पाकळ्या
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून कलौंजी
२-३ कोथंबीरीच्या काड्या
३/४ टीस्पून इझी ब्लेंड ड्राईड यीस्ट
१ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार
पाकृ:
मैदा, मीठ व धणेपूड एकत्र चाळून घ्या.
त्यात छोटा खळगा करून त्यात कोमट पाणी, दही, कलौंजी व तेल घालावे.
बारीक चिरलेला लसूण घालावा.
मी इथे इझी ब्लेंड ड्राईड यीस्ट वापरले आहे जे थेट मैद्याच्या मिश्रणात घालू शकतो. तुम्हाला जर का हे नाही मिळाले तर तुम्ही यीस्ट, कोमट पाणी व साखर एकत्र करुन , झाकून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. पाणी जेव्हा फेसाळ होईल तेव्हा ते यीस्ट्-मिश्रीत पाणी मैद्यात घालून पीठ चांगले मळून घेणे.
आता मैदा चांगला १० मिनिटे मळून घ्या. तेल लावलेल्या भांड्यात मैद्याचा गोळा ठेवा व त्यावर ओला कपडा ठेवून , झाकून उबदार ठिकाणी १-२ तास ठेवून द्या.
१-२ तासांनी पीठ फुगून दुप्पट झाले असेल. त्यावर मुक्के मारून चांगले मळून घ्या व त्याचे ४ सारखे भाग करुन घ्या.
एका गोळ्याची लाबंटसर पोळी लाटून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व कलौंजी भुरभुरा.
ओव्हन ला २५० डिग्रीवर प्री-हिट करुन घ्या. बेकिंग ट्रेवर तयार नान ठेवून ओव्हनमध्ये ५ मिनिटे भाजा. नान फुगला पाहिजे.
तयार नानवर बटर लावा.
साहित्य मटर- पनीरः
२ वाट्या मटारचे दाणे
१ वाटी पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर शॅलो फ्राय केलेले
२ कांद्यांची प्युरे
३ टोमॅटोंची प्युरे
१ टीस्पून जीरे
१ टेस्पून आले +लसूण पेस्ट
दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टीस्पून हळद
२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर (रंगासाठी)
१-१/४ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून गरम-मसाला
१ टीस्पून कसूरी मेथी
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये तेल गरम करुन जीरे घालावे.
जीरे तडतडू लागले की त्यात आले + लसूण पेस्ट घालावी.
आले + लसूण पेस्ट चांगली परतली गेली की त्यात कांद्याची प्युरे घालून परतावे. कच्चा वास कांद्याचा गेला पाहिजे.
आता त्यात टोमॅटोची प्युरे, मीठ व सर्व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
त्यात मटारचे दाणे व गरजेप्रमाणे (ग्रेव्ही किती दाट हावी त्याप्रमाणे) पाणी घालून उकळी काढावी.
उकळी आली की त्यात तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालावे व ७-८ मिनिटे शिजु द्यावे.
शेवटी वरून चमचाभर बटर सोडावे.
कोथिंबीर घालून गरमा-गरम गार्लिक - कोरिएंडर नान बरोबर खायला सुरुवात करणे :)

१-२ तासांनी पीठ फुगून दुप्पट झाले असेल. त्यावर मुक्के मारून चांगले मळून घ्या व त्याचे ४ सारखे भाग करुन घ्या.
एका गोळ्याची लाबंटसर पोळी लाटून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व कलौंजी भुरभुरा.
कोथिंबीर घालून गरमा-गरम गार्लिक - कोरिएंडर नान बरोबर खायला सुरुवात करणे :)
वाचने
9658
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाजवाब.
खरंच! अगदी लाजवाब! सुंदर
In reply to लाजवाब. by गणपा
ऑसम!!!
अशक्य
कातिल झाला आहे हो ना आणी मटर
अप्रतिम
खल्लास. शॉल्लेट प्रेझेंटेशन.
स्विकार क्रा
खल्लास. तोंपासु परत भुक
अवघड आहे!
प्रेझेंटेशन
वॉव !!!!!!!!! आय लव्ह मटर-
मस्तच....
आँ???? हे म्हणजे अतिच
In reply to मस्तच.... by मुक्त विहारि
हं , झाले आहे...
In reply to आँ???? हे म्हणजे अतिच by प्यारे१
सानिकास्वप्निल जी, मस्त पा़कॄ
सत्यानाश !
ही पाकृ पनीर न घालता
In reply to सत्यानाश ! by परिकथेतील राजकुमार
मला पण हे पनीर आवडत नाही...
In reply to सत्यानाश ! by परिकथेतील राजकुमार
एक वेळ पनीर चालेल पण ते गाजर
In reply to मला पण हे पनीर आवडत नाही... by मुक्त विहारि
टोफू (बीन कर्ड)
In reply to सत्यानाश ! by परिकथेतील राजकुमार
झकास...
मस्त !!
_/\_ _/\_ _/\_
सानिकाजी, एवढे खतरनाक फोटो
ऐला काय जबरदस्त पाकृ हो
सगळे फोटू व पाकृ
शॉलिट्ट ! (पनीर प्रेमी)
(No subject)
आवडले..
तुमच्या धाग्यांवर प्रतिसाद
छान!
करा लेको चैन! खा लसणाची पोळी
रसिकतेचे कौतुक...
मस्तच गं..... टेम्पटिंग