प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं.
आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत. या सर्व खगोलशास्त्रज्ञांसाठी शुक्रवारी संध्याकाळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. कालच श्रीमती प्राची (आडनाव विसरले, ढोबळे का काहीतरी) यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम झाला. माझ्यासारख्या औरंगजेबांना विचाराल तर कार्यक्रम उत्तम झाला. पण विषेश सांगण्यासारखी गोष्ट ही की श्रीमती प्राची आणि त्यांचे तबला आणि पेटी वाजवणारे दोन साथीदार यांना पुष्पगुच्छ दिला नाही तर एक-एक छोटं रोपटं देण्यात आलं. "झाडे लावा, झाडे जगवा" असे बोर्ड्स कितीतरी ठिकाणी दिसतात. पण अशा पद्धतीनं त्याचं आचरण फार वेळा दिसत नाही. फुलं काय आत्तापर्यंत कोमेजलीही असती, पण ती रोपटी या कलाकारांना खगोलशास्त्राची आणि शास्त्रज्ञांची आठवण नक्की देतील ... आम्ही विश्वाच्या पसाय्राचा, उत्पत्तीचा अभ्यास करत असलो तरी आमचे पाय जमिनीवरच आहेत हे सांगणारी ती रोपं.
ही कल्पना कोणाची ते विचारायचं मला तेव्हा सुचलं नाही, पण ज्यांनी कोणी ही कल्पना सुचवली, आणि अंमलातही आणली त्यांचं मला फार कौतुक वाटलं. आणि त्यांचं जाहीर अभिनंदन करावंसं वाटलं म्हणून हा उद्योग!
(वसुंधराप्रेमी) यमी
वाचने
8551
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वानी .....
है शाब्बास...
अवांतर
In reply to है शाब्बास... by प्राजु
सोय आणि आवड.....
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
बियाणं
In reply to सोय आणि आवड..... by भडकमकर मास्तर
वृक्षवल्ली आम्हां!
हल्लीच
In reply to वृक्षवल्ली आम्हां! by श्रीकृष्ण सामंत
आमचे पाय जमिनीवरच आहेत
उत्तम
मग त्याच
In reply to उत्तम by भडकमकर मास्तर
मास्तर ... ह्.ह.मे
In reply to उत्तम by भडकमकर मास्तर
दुबळे दांपत्य
In reply to मास्तर ... ह्.ह.मे by टारझन
आवाजातली ताकद
In reply to मास्तर ... ह्.ह.मे by टारझन
मेलो.... =))
In reply to आवाजातली ताकद by ३_१४ विक्षिप्त अदिती
रोपटे
खरंच उत्तम
रोपट्यांऐवजी
डु चो दु (ध चा मा)
चर्चाकारांनो
++++++++++१
In reply to चर्चाकारांनो by सहज
उत्तम
नारळीकर - एक अनुभव
स्वारी पण
In reply to नारळीकर - एक अनुभव by प्रकाश घाटपांडे
मुळ लेखाशी थेट संबंध नाही
In reply to स्वारी पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
छान