गडांवरील शिल्पे
गडांवर भटकंती करत असता बरीच शिल्पे नजरेस पडत असतात.
गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात.
ह्या शिल्पाकृतींवर गडाचा काळ, त्याचे राज्यकर्ते, गडबांधणीची शैली इ. तपशील कळू शकतो. वास्तविक गडांवरील शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय. पण त्याचे फारसे संकलन केल्याचे फारसे आढळून येत नाही.
ह्या धाग्याद्वारे गडशिल्पांचे संकलन करण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे.
१. रतनगडावरील गणेश दरवाजात कोरलेली गणेशाची चतुर्भुज मूर्ती
२. रतनगडावरच्या हनुमान दरवाज्यात असलेली अर्धे शरीर सर्पाकार असलेली चतुर्भुज मूर्ती
३.मल्हारगडावरील अष्टभुजा
४. सुधागडाच्या निम्म्या चढावात असणारी हनुमान मूर्ती
५. सुधागडाच्या दरवाजानजीक असलेली एका वीराची मूर्ती (जुझांत धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मारक म्हणूनही ही स्थापिली असावी, हा वीरगळ मात्र नाही)
६. सुधागडाच्या दरवाजावरील शरभ शिल्प
७. कोर्लई किल्ल्यावरील पोर्तुगीजांचे जागतिक स्वामित्व दाखवणारे चिन्ह
८. कोर्लईवरीलच पोर्तुगीजांचे 'आर्म्स ऑफ कोट' चिन्ह(शिलालेखाचा संक्षिप्त अर्थ: हा किल्ला बांधण्याची आज्ञा भारताचा व्हाईसरॉय डॉंम फिलिपे मस्कारेन्हास याने १६४६ मध्ये दिली आणि चौलचा कॅप्टन फर्नाओ मिरांडा हेन्रीक्स याने १६८० मध्ये हे काम संपवले. ह्या किल्ल्याचा कॅप्टन(किल्लेदार) क्रिस्ताव डी अबेइरू डी अझेवेदो हा आहे)
९. वासोटा किल्ल्याच्या पायवाटेवरील वीर हनुमान
१०. मकरंदगडावरील देवळातल्या शिल्पप्रतिमा
११. घनगडावरील गारजाई माता
१२. माहुली किल्ल्यावरील दरवाजातील पंख असलेल्या शरभाचे आगळेवेगळे शिल्प
१३. माहुली किल्ल्यावरील रानांत पडलेले त्रिशुळासारखे कोरलेले शिल्प (शैली थोडीशी इस्लामिक आहे)
१४. सरसगडावरील शिलाहारकालीन शिल्प
१५. वसईवरील पोर्तुगीजांचे नाविक सत्तेचे चिन्ह
१६. वसईवरीलच इंग्रजांच्या नाविक सत्तेचे चिन्ह (हे किल्ला पेशव्यानंतर इंग्रजांकडे गेल्यानंतरचे आहे)
१७. वसईवरीलच काठ्या (की मेणबत्त्या?) तोंडात पकडलेल्या कुत्र्यांचे इंग्रजकालीन शिल्प
१८. जीवधनाच्या प्रवेशद्वारावरील चंद्र, सूर्य व मध्ये कलश (बहुधा शिवलिंग) शिल्पाची शैली जरी इस्लामिक वाटत असली तरी हे काम शिलाहारकालीन (९/१० व्या शतकातील) आहे. गधेगाळांवरील बरेच वेळा अशी शिल्प कोरलेली दिसतात.
१९. शिवनेरीच्या प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प
२०. राजमाचीवरील छ्त्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मूर्ती
२१. राजमाचीवरील एका खोदीव गुहेच्या प्रवेशद्वारावरील गणेशपट्टी (वास्तविक ही गुहा सातवाहनकालीन असून गणेशमूर्ती मात्र यादवकालानंतर कोरली गेली असावी)
२२.रोहिड्याच्या प्रवेशद्वारावरील गजशिल्प व त्याच्या शेजारचा देवनागरीतील शिलालेख.
२३. पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली काही उद्धस्त शिल्पे
२४. हडसर किल्ल्याच्या महादेवाच्या रावळातील गरूडमूर्ती
२५. माहुलीवरीलच शिवलिंग
२६. रायगडाच्या महादरवाजावरील शरभ शिल्प
२७. रायगडाच्या बाजारपेठेत असलेल्या नागाचे एक शिल्प
२८. रायगडाच्या नगारखान्यावरील शरभाचे शिल्प
२९. नगारखान्यावरच कोरलेली सहस्त्रदल कमल
३०. राजमाचीवरचा एक वीरगळ

वाचने
16506
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
उत्तम!
In reply to उत्तम! by निनाद
+१ हेच म्हणते
सही है वल्ली.... मस्तच
In reply to सही है वल्ली.... मस्तच by प्यारे१
शरभ म्हणजे सिंहासारखा दिसणारा
पन्हाळा
मस्त रे, सोलापुरच्या भुईकोट
In reply to मस्त रे, सोलापुरच्या भुईकोट by ५० फक्त
बिंधास्त टाका हो ५०. ते
अतिशय उत्तम माहिती
अप्रतिम रे वल्ली...
In reply to अप्रतिम रे वल्ली... by स्पा
+१
मस्त संग्रह...
अप्रतिम!!
छान... मी ही टाकेन काही.....
फोटो आणि माहिती उत्तमच!
ग्रेट संकलन व माहिती...या
वल्ली साहेब, अतिशय मस्त लेख व फोटो.
वल्ली साहेब , अतिशय सुंदर लेख व फोटो.
ग्रेट आहेस.. आम्हाला (मला) तर
वा: ! बर्याच
मस्त
चांगले संकलन. क्र. १८ मधे कलश
मस्त...
मस्तच संकलन
एकदम भन्नाट
एकदम मस्त लेख!
अप्रतिम संकलन ! शरभाचे शिल्प
गंड-भेरुंड, शरभ आणी व्याल
In reply to गंड-भेरुंड, शरभ आणी व्याल by स्वच्छंदी_मनोज
धन्यवाद b manoj
In reply to गंड-भेरुंड, शरभ आणी व्याल by स्वच्छंदी_मनोज
धन्यवाद मनोज. संग्रहातील फोटो
In reply to धन्यवाद मनोज. संग्रहातील फोटो by प्रचेतस
वल्ली सेठ धन्यवाद.
In reply to वल्ली सेठ धन्यवाद. by मदनबाण
धन्यवाद वल्लीजी
In reply to धन्यवाद वल्लीजी by स्वच्छंदी_मनोज
किल्ल्यांवर मुख्यतः शरभाचे
वॉव वल्लीशेठ!
व्वा..
वाह वल्ली! मला वाटतेय असा
वल्लीदा भन्नाट कल्पना आहे आवडली
वा छान संकलन आणि फोटोही छान.
निशब्द मित्रा ! अतिशय छान