Skip to main content

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४)

लेखक जागु यांनी शुक्रवार, 16/12/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
५१) मद्रास कारपेट / मशिपत्री ५२) कुयली ५३) शेरल ५४) रुई ५५) धामण ५६) पळस ५७) वनई/निगडी ५८) उक्षी ५९) भांबुर्डा/भामेड्डा/गंगोत्र ६०) गुलाबी सोनकुसुम ६१) लाजाळू /Touch me not ६२) नोनी ६३) पर्णगुंफी ६४) सोनेरीला ६५) तांबा/Common Leucas 66) कळलावी/नागदौणा/ Glory Lily ६७) Iberian Star Thistle ६८) कांडोळ ६९) पिवळी घाणेरी ७०) उंदीरमारी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11189
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

धन्य आहेस. बरीच नवी रान फुलं पहायला मिळाली. लाजाळूचं फुलही पहिल्यांदाच पाहील. (हल्ली लाजाळूचं झाडं दिसेनासं झालय.)

In reply to by गणपा

>>>>(हल्ली लाजाळूचं झाडं दिसेनासं झालय.) हळूवारपणा असावा लागतो गणपा त्याला. ;) फुलं मस्तच. -प्यारे 'फूल'. ;)

जागु ताई, मला न तुमचा फार्फार हेवा वाटतो! :) हि तुमच्या माहेरच्या बागेतली फुले आहेत का??

ढयान ट ढयान...................... पुन्हा एकदा....... अतिशय आवडले.पिवळा रंग घाणेरीचा काय सही आहे !!!!

गणपा, वल्ली, जाई, इरसाल धन्यवाद. परी ती फुले मी जिथे कुठे जाईन तिथे कॅमेर्‍यात टिपली आहेत. त्यात माहेर-सासर-कोकण अशी ठिकाणे आहेत.

व्वा व्वा जागु ताई...खुप मजा आली फुलं पहातांना...काही नावं सुद्धा किती मजेशीर आहेत...मला एका वेळी एकाच जागी ही सगळी फुलं मिळाली ना,तर रांगोळी काढायला काय बहार येइल..! रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे... वेडाहि मीच थोडा देवाजिच्या मुलांचा वेडास वेढणार्‍या रानातल्या फुलांचा... @-अतिशय अवडणार्‍या रानफुलांना-एका रानमुलाकडुन अर्पण

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा! समर्पक कविता. जेवढी सुंदर फुले तेवढेच वर्णनही मनस्वी! रानफुलांचे एवढे वेड लागत असेल तर "अत्रुप्त आत्मा" व्हायलाही हरकत नाही.

जागुताईचा रानफुलांचा धागा म्हटल्यावर उत्साहात उघडला आणि सार्थक झालं. या चित्रमालिकेत अनेक नवनवीन फुलं बघायला मिळत आहेत. या सर्व रान फुलांची नावं कशी ठाऊक होतात?

एकदम मस्त ताई, सगळे भाग खुप आवडले, या रानफुलां बद्दल काहि माहिति असल्यास वाचन्यास उत्सुक, जसे 'उंदिरमारी' हे नाव का पडले असावे?

फोटो घेणं समजू शकतो आपण.. पण बाई तुला त्यांची इतकी नावं मिळतात कुठून? आणि लक्षात सुद्धा राहतात हे विशेष!! धन्य आहेस बाई!

सुंदर छायाचित्रे! जागु तुझ्यातल्या निसर्गाच्या वेडामुळेच तु ही छान छायाचित्रे घेऊ शकलीस. सुंदर कविता! अतृप्त आत्मा तुमच्या कवितेतला आध्यात्मिक पाया मनाला भावला.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ह्या फुलांची काही नावे मला फ्लॉवर्स ऑफ इंडीया ह्या साईटवरून मिळाली. उंदीरमारीचे झाड आसपास असल्यास उंदरांची पैदास कमी होते. काही शेतकर्‍यांनी उंदरापासून संरक्षण होण्यासाठी ह्या झाडांची कुंपणाला लागवड केलेली नोंद आहे. कळलावी ह्या वेलेचा उपयोग औषध म्हणून गरोदर स्त्रीला बाळंतीण होण्यासाठी कळा लवकर येण्याकरीता केला जातो. अतृप्त आत्मा खुप सुंदर कवीता रचलीत. फुलांना न्याय दिलात.