काही दिवसांपूर्वी बालगुन्हेगारी, बालगुन्हेगारांची मानसिकता, पालक आणि पाल्य ह्यात वाढत जाणारी दरी ह्या सर्वच विषयांची सांगड घालत काही एक लिखाण करत होतो. ह्या सगळ्यासाठी काही त्या त्या क्षेत्रातील मान्यवर लोकांची मते जाणून घेणे देखील आवश्यक होतेच. अशा काही लोकांना इकडच्या तिकडच्या ओळखी काढून भेटीसाठी जात होतो. अशातच सायबर क्राईम खात्यातील काही मान्यवरांची गाठ घेण्याचे ठरले. अर्थात त्यांच्यापर्यंत पोचणे हे नेहमीप्रमाणे अवघडच होते. अशातच आठवण झाली मिपाकर प्रसन्नदा अर्थात प्रसन्न केसकर ह्यांची. हाडाचा पत्रकार, सर्व थरात ओळखी असणारा हा माणूस सध्या DNA वर्तमानपत्रासाठी काम करत आहे. प्रसन्नदांना फोन करून अडचण सांगितल्यावरती ताबडतोब २/३ कॉन्टॅक्ट नंबर्स आणि नावे मिळून प्रश्न सूटला. मी काय विषयावरती लिहितोय हे जाणून घेतल्यावरती त्यांनी मला एका खास कार्यक्रमाचे ताबडतोब आमंत्रण देखील देऊन टाकले. कार्यक्रमाचे नाव होते 'नो किडिंग'.
**शुभम शिर्के या सोळा वर्षाच्या मुलाचे दिघीतील त्याच्या घरून त्याच्याच तीन किशोरवयीन मित्रांनी नुकतेच अपहरण केले. या मित्रांनी शुभमला आडबाजूला नेऊन ठार तर केलेच पण त्याच्या आईवडीलांकडून खंडणीही वसूल केली. शुभमच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शुभमच्या खुन्यांना पकडले तेव्हा त्यातील दोघे अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे वाढत्या वयाच्या मुलांच्या प्रश्नाचे भयानक स्वरूप पुन्हा एकदा समोर आले. वाढत्या वयाची मुले आणि त्यांच्या पालकांमधील समन्वयाचा अभाव, अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण होणारे स्थूलतेसारखे विकार, मुलांशी कसे वागावे याबाबतचा पालकांमधील गोंधळ, माध्यमांमधून सातत्याने होणार्या हिंसाचाराच्या उदात्त्तीकरणाने मुलांमध्ये वाढत असलेली अनैतिकता आणि ननैतिकता असे अनेक प्रश्न आज पालकांना भेडसावत आहेत. या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देखील अनेकदा सहजपणे मिळत नाही. या समस्येवर उपाय शोधण्यास पालकांना मदत करण्यासाठी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नाईन टू नाईंटिन क्लिनिकमधील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुढाकार घेतला. डीएनए वृत्तपत्र आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या वतीने वाढत्या वयाच्या मुलांच्या पालकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी नो किडिंग या चर्चासत्राचे शनिवार दि. १४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे स्वरूप साधारण असे होते :-
प्रास्ताविक - डॉ. वैशाली देशमुख
मुलांबाबत प्रश्न का निर्माण होतात - डॉ रश्मी गुपचुप
परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे - डॉ प्रतिभा कुलकर्णी
शाळकरी मुलांना काय वाटते (मुलांशी बोलून जमवलेली माहिती) - पल्लवी इनामदार
चर्चासत्र - सहभाग डॉ विद्या जोशी, डॉ वाटवे, पल्लवी, वैशाली, श्री पत्की. सूत्रसंचालन डॉ सुनील गोडबोले.
समारोप - डॉ. सुनील गोडबोले. **
कार्यक्रमाला पालकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. माझ्या लिखाणाला देखील अधिक काही खाद्य मिळेल ह्या हेतूने मी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. पुणे असूनही कार्यक्रम अगदी ठरल्या वेळेनुसार सुरू झाला. एकदा कार्यक्रम सुरू झाल्यावरती निव्वळ टिपण्या घेण्याच्या हेतूने आलेलो मी त्या कार्यक्रमात कधी रंगून गेलो ते कळलेच नाही. एक पालक नसूनही ह्या कार्यक्रमात तज्ज्ञ मांडत असलेली मते, त्यांचे विचार एक नागरिक म्हणून कुठेतरी हालवून गेले.
'काय करू नये ह्या पेक्षा काय करावे ' हे पालकांनी मुलांना आधी समजावणे आवश्यक असल्याचे मत मांडत डॉक्टर वैशाली कुलकर्णी ह्यांनी ह्या चर्चासत्राची सुरुवात केली. त्यानंतर अनेक तज्ज्ञांनी आपली मते, विचार आणि अनुभव व्यक्त केले. त्या विचारातील काही मोजके विचार तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यातून काही चांगली चर्चा घडण्याच्या हेतूने हा लेखन प्रपंच.
१) पालकांनी आणि शिक्षकांनी परस्परसंबंधाने मुलांवरती ठेवलेले लक्ष आणि संस्कार महत्त्वाचे.
२) कुठे चालला / चालली?, हे काय कपडे आहेत का? इ. इ. प्रश्नांनी 'वॉचडॉग अॅटिट्यूड' ठेवण्यापेक्षा मित्रत्वाचे नात्याने संवाद साधणे गरजेचे.
३) ह्या वयात मुलांच्या विचारांबरोबरच हार्मोन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती बदल घडत असतात, मुले जास्ती आक्रमक होत असतात. हे सगळे ध्यानात घेणे महत्त्वाचे.
४) पालकत्वाची भिती बाळगणारे पालक ही देखील सध्या भेडसावत असलेली एक समस्या आहे.
ह्या सर्वांबरोबर अधिक विस्ताराने चर्चा करताना अनेक तज्ज्ञांनी दोन पिढ्यांमधील संवाद का तुटत असतो हे देखील समजावले. विशेषतः पालकांनी आपल्या आणि आजच्या पिढीतल्या फरकाकडे डोळझाक करणे चालणार नाही. पालकांची पिढी ही 'ह्याला हात लावू नको असे सांगितल्यावरती कायमच त्या गोष्टी पासून लांब राहणारी, तर आजची पिढी त्या वस्तूला हात लावून त्यातून स्वतःचे मत बनवणारी आणि अनुभव घेणारी आहे' हे लक्षात घेतले पाहिजे. जुन्या पिढीत आजसारखी रॅट रेस किंवा कटथ्रॉट कॉम्पिटिशन नव्हती हे देखील मान्य करायला हवे.
आजकाल खरे सांगायचे तर मुलांची विचार करण्याची बरीचशी ताकद ही संगणकाने खाऊन टाकलेली आहे. एका बटणात सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध होत असल्याने बर्याचदा मुलांकडून मेंदूचा व्हायला हवा तेवढा वापर होत नाही, अशा रिकाम्या मेंदूत मग नको नको त्या कल्पना आकार घ्यायला लागतात. कधीतरी काहीही न करता शांत बसणे हे देखील मनासाठी आणि शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे हे मुलांच्या आणि पालकांच्या दोघांच्या ध्यानात येत नाही. मुळात हे लक्षात यायला मुलांनी आधी कधी आपल्या पालकांनाच असे करताना पाहिलेले नसते. सोमवार ते शनिवार काम आणि रविवारी मुलांना वेळ देऊ शकत नाही ह्या भावनेतून दिवसभर मांडलेला चित्रपट, हॉटेल, पार्क ह्यांचा खेळ. ह्यातून स्वस्थ बसलेले पालक मुलांना बघायला मिळणार तरी कधी?
कायद्याने सुजाण नाहीत म्हणून ही अडनिड्या वयातली मुले सुजाण नसतात असे बिलकुल समजू नये. ते काय विचार करतात, त्यांच्या आवडी निवडी काय आहेत, ते टीव्ही वरती नक्की काय पाहतात, कोणते खेळ खेळतात ह्या सर्वांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व दिसत असते, आणि त्याकडे प्रत्येक पालकाने डोळस नजरेने पाहणे हे मोठ्या गरजेचे आहे.
चर्चासत्र जवळजवळ २ तास चालले. त्या काळात अनेक पालकांनी आपल्या अडचणी देखील विचारल्या, काहींनी त्यांच्या घरात घडत असलेल्या गमती जमती देखील शेअर केल्या. ह्या सगळ्याच घटनाक्रमाचा संपूर्ण आढावा घेणे खरंच शक्य नसल्याने, ह्या कार्यक्रमाचे थोडेफार सार मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
धन्यवाद.
**प्रसन्नदांच्या कार्यक्रमाच्या माहितीतून साभार**

वाचने
7130
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
**प्रसन्नदांच्या
हेच
In reply to **प्रसन्नदांच्या by सुहास..
झकास वृत्तांत. तुमचे लिखाण
लिंक मिळणारे नाही.
In reply to झकास वृत्तांत. तुमचे लिखाण by यकु
पालकत्वाची नीट जाण असणार्या सर्वासाठी
मस्त
DNA व दिनानाथ मंगेशकर
वेल डन.
चांगला विषय...
+
In reply to चांगला विषय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to + by कुंदन
उत्तम लेख. पालक म्हणून
आवडले
कार्यक्रमाची माहिती देणारा
सहमत
In reply to कार्यक्रमाची माहिती देणारा by भडकमकर मास्तर
परा, मस्त विषय आहे!
धन्यवाद
जगाकडे खुलेपणाने पाहण्यास समर्थ करणारे शिक्षण हवे आहे
चांगली माहिती व चांगला चर्चा
या गोष्टीमुळे असेच शाळेत
In reply to चांगली माहिती व चांगला चर्चा by रेवती
मितान ही आपल्या मिपावर असलेली
In reply to या गोष्टीमुळे असेच शाळेत by भडकमकर मास्तर
मलाही एकदा लहानपणी वर्गातल्या
In reply to या गोष्टीमुळे असेच शाळेत by भडकमकर मास्तर
तुमच्या उदा. मधील मुलाला
In reply to चांगली माहिती व चांगला चर्चा by रेवती
सहमत.
In reply to तुमच्या उदा. मधील मुलाला by शिल्पा ब
संवाद महत्त्वाचा...
उत्तम माहिती
प्रसन्नदां व परा तुम्हा
चांगला कार्यक्रम
माझ्यामते एकदम मोठं झाल्यावर
In reply to चांगला कार्यक्रम by पैसा
चांगला लेख.
उत्तम लेख
<<<आज किती घरी मुलांना
In reply to उत्तम लेख by अमितसांगली
+१
In reply to <<<आज किती घरी मुलांना by शिल्पा ब
कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन
माझ्या माहितीत घडलेली एक
अरे बापरे!!! माझं बाळ पण आता
In reply to माझ्या माहितीत घडलेली एक by अमोल खरे
अशा विधायक उपक्रमांचे नुसतेच