चीझ चीली टोस्ट आणी चीझ अॅंड क्रॅकर्स
साहित्य चीझ चीली टोस्ट:
५-६ ब्रेड स्लाईसेस (जास्त ही घेऊ शकता )
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली (कुठल्याही रंगाची घेऊ शकता )
बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेले चीझ आवडीप्रमाणे (मी मॉझ्झरेला वापरले आहे, आपल्या आवडीप्रमाणे कुठले ही चीझ घेऊ शकता)
१/२ टीस्पून काळीमिरीपूड
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
पाकृ:
एका भांड्यात चीझ, कांदा, भोपळी मिरची, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर सगळे एकत्र करुन घेणे. (मी मीठ वेगळे घातले नाही कारण चीझमध्ये मीठ असतं)
ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण नीट लावून घ्यावे. त्यावर थोडी काळीमिरीपूड व ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.
२०० डीग्री सें वर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये तयार ब्रेड स्लाईस ठेवून ८-१० मिनिटे भाजवे. (ओव्हन नसल्यास तव्यावर किंवा ग्रील पॅनवर ही भाजु शकता.)
टोस्ट तयार झाले की त्रिकोणी आकारात कापून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
साहित्य चीझ अॅंड क्रॅकर्स :
१०-१२ क्रॅकर्स बिस्किटे (हे नाही मिळाल्यास मोनॅको बिस्किटांचा वापर करु शकता)
तयार हिरवी चटणी ( ओला नारळ + थोडा जास्त पुदिना + कोथिंबीर + हि.मिरच्या + मीठ + लिंबाचा रस + चवीपुरती साखर एकत्र करून चटणी तयार करावी )
चेरी टोमॅटो मधून कापून दोन भाग करणे
चीझ चे तुकडे (मी चेडर चीझ वापरले आहे )
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
पाकृ:
क्रॅकर्स बिस्किटांवर थोडी हिरवी चटणी लावावी.
त्यावर चीझ चे तुकडे लावावे व अर्धा चेरी टोमॅटो लावावा. त्यावर थोडे ड्राईड हर्ब्स भुरभुरावे.
चीझ चीली टोस्ट आणी चीझ अॅंड क्रॅकर्स तयार आहे :) मस्त चहासोबत हे तुम्ही खाऊ शकता, कुठल्याही पार्टीसाठी, लहान मुलांसाठी / मोठ्यांसाठी झटपट खाऊ बनवू शकता :)

वाचने
12456
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
सॉल्लीड !!! ज.ह्.ब.ह्.रा
सानिकास्वप्निल या आयडीला
In reply to सानिकास्वप्निल या आयडीला by प्यारे१
अनुमोदन...
यिप्प्प्प्प्प्पी
In reply to यिप्प्प्प्प्प्पी by परिकथेतील राजकुमार
यावेळी पराभाउंना काहीही
दोन्ही पदार्थ मस्त!!!! काय हा
आमच्याकडून सानिका तैस
धन्यवाद..
In reply to धन्यवाद.. by गवि
गवि,
In reply to गवि, by प्रास
बाकी, आपल्याला क्रीम क्रॅकर
In reply to बाकी, आपल्याला क्रीम क्रॅकर by गवि
असहमत
In reply to असहमत by सानिकास्वप्निल
भारतात ब्रिटानियाची मिळतात.
In reply to भारतात ब्रिटानियाची मिळतात. by गवि
येस्स ओ गवि, इथं भावी
In reply to गवि, by प्रास
चीझ चिली टोस्ट अफलातून आहेत..
In reply to चीझ चिली टोस्ट अफलातून आहेत.. by गवि
संध्याकाळ झाली की माझे पाय चीजकडे वळतात
सॉल्लीड
शॉल्लेट.
मला त्या क्रॅकर्स
In reply to मला त्या क्रॅकर्स by मृत्युन्जय
मला त्या क्रॅकर्स
In reply to मला त्या क्रॅकर्स by मृत्युन्जय
+१
भयानक!
__/\__
खल्लास....
कातिल!!
चीझ चीली टोस्ट नक्कि करुन
आयला लय भारी
प्रेझेंटेशनास...
सोय झाली
_/\_ _/\_ _/\_
सुप्पर....
खपलो!!!!
सुरेख पा.कृ.
भ ...न्ना....ट
पहिली पाकृ एकदम सोप्पीय.
क्लासिक यार....... कसले
आता छान, मस्त, उत्तम असे
मस्त प्रेझेंटेशन!
, दोन्ही पदार्थ मस्त, चीझ चिली टोस्ट अफलातून, -
झकास....................अत्त्
कमाल फोटोज आहेत!
ओ म्याडम........
In reply to ओ म्याडम........ by इरसाल
बोलते की ओ इरसालभौ
In reply to बोलते की ओ इरसालभौ by सानिकास्वप्निल
आम्चेही
ख आणि ल्ला आणि स
बस्स! संपलं!! काय बोलायच बाकी
प्राजुशी
रेसीपी दिसत नाही.