या आधी आपण आमच्याबरोबर काही जमातींचा अभ्यास केलात (आधी पंचनामा केलात असे लिहीले होते ) .आज आपण ज्या जमातीवर प्रकाश दिवाकर सोनपितळे टाकणार आहोत, त्या जमातीत सध्यस्थितीत मानव म्हणुन जन्म घेणार्यास किमान एकदा तरी जावे लागते असे सदरहू लेखकांस वाटते, तसे लेखकासं बरच काही वाटते, ऊदा. माझ्या गाडीतला पुसण्याचा कपडा , दर आठवड्याला एक , या क्रमाने ,गायब करणार्याचे, असतील नसतील तेव्हढे कपडे फाडुन चिंध्या कराव्यात , महाप्रचंड तेलकट वड्या मध्ये अर्धे कच्चे शिजलेले बटाटे टाकुन आमची उदर-व्यवस्था बिघडवण्याचे सत्कर्म करण्यार्या वडापाव वाल्याला हात -पाय बांधुन गुदगुल्या कराव्यात, डॉक्टर असुन आयटी कारकुनाशी का लग्न केले म्हणुन वारंवार बायकोला डिवचणार्या, आमच्या, मृदुभाषि, शर्करामुखी सासूबाईंना हत्तीच्या पायी द्यावे ( हिची आई आहे म्हणुन हत्तीच्या, नाही तर डायनासॉर च्या पायी दिले असते. आणी वर मद्राशी पिक्चरच्या राक्षसासारखा ...असो. ता.क. सासुबाईंना मराठी वाचता येत नाही ) , मिटींग च्या नावाखाली सदा न कदा टाईम-पास करणार्या मॅनेजर ला ४० डिग्री च्या उन्हात, अंगात जाड स्वेटर, कानाला मफलर घालुन दिवसभर उभे करावे. आंजावर जिलब्या टाकणार्याला..............असो.
आज ज्या जमाती विषयी आपण बोलणार आहोत, त्या जमातीला रूग्णाची काळजी असते हे लेखक प्रामाणिक पणे मान्य करतो. पण त्याच मुळे काही गमती-जमती होतात हेच सांगण्याचा प्रयत्न, अर्थात या वाक्यामुळे वाचकांच्या लक्षात आले असेलच , ज्यांच्या नाही आले त्यांच्या करिता , ही जमात म्हणजे रुग्णाला भेटायला जाणारे " Visitor " . ही जमात आपल्याला कुठल्याही ईस्पितळात भेटु शकते , पण या जमातीतील चॅम्पियन बनायचे असेल तर आम्ही खाली दिलेल्या या टिपा ..आपण उदाहरण घेत आहोत ते एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाचे
१ ) सर्वात आधी रूग्ण कुठल्या ईस्पितळा त आहे आणि किमान पक्षी आपल्याला भेटु शकेल याची फोना-फोनी करून माहीती घ्यावी. अपघात आहेच म्हटल्यावर चर्चेला फोनवरच सुरूवात करावी, पहिला प्रश्न, जास्त दारू पिलेला होता का ? ( ईथे आपण क्रिया आणि क्रियापद बदलून ईतर दाखल-ए-कारण करिता वापरू शकता, उदा. हार्ट अटॅक- सिगारेट ओढणे, दमा -पुन्हा सिगारेट ) या प्रश्नाच उत्तर होकारार्थी आल रे आले की लगेच पारा सूरु करावा ' काय राव, त्याला किती वेळा सांगीतले आहे, इतकी नको पित जावु, आम्ही पण पितो आणी टिंब-टिंब भरून पितो. पण किती ही पिलो तरी घरी नीट जातो, आम्हाला नाही कधी अपघात झाला ! " असे सांगुन स्व-कोट्या ची तारीफ करून घ्यावी. मग ज्याच्याशी फोनाफोनी चालु आहे त्यालाच, " आज कुठे बसूयात का ? ई. ई, डिस्कस करून घ्यावे ( पेशंट गेला खड्ड्यात ! ). जर प्रश्नाचे ऊत्तर नकारार्थी आले तर, मग चर्चा वेगळ्या पातळीवर येते, त्यामध्ये, रस्ते, रस्त्यांची दुरा-वस्था, वाढती रहदारी, त्यावर असणारी गर्दी, प्रदुषण, इथून चालु करून गाडी थेट सरकार पर्यंत न्यावी आणि मग ( पुन्हा पेशंट गेला खड्ड्यात ! ) .
२ अ ) ज्या ईस्पितळात आपल्याला जायचे आहे, तिथे जी काही भेटायची ठराविक वेळ दिलेली असते, त्या वेळेस, जग उलटं-पालटं झाले तरी, अजिबात जावु नये. हवे तर खाली स्टाफशी भांडण/ विनंती करून मग जावे , असे केल्याने आपला इस्पितळामधील वट्ट तर साबित होतोच शिवाय अपघातग्रस्त व इतर व्यक्तींसमोर भाव ही मारता येतो. स्टाफ शी म्हणजे स्टाफशी च बोलावे, काम करणार्या मावश्या व सफाई कामगांरासमोर अजिबात शायनिंग करू नये, केल्यास ' गॅस बुकींग करण्यार्या स्त्रिया, बिएसएनएल च्या कॉल सेंटर वाले व मराविम च्या फोनवर असलेले ईसम ' हे सर्व मिळुन तुमचा ईतका अपमान करू शकत नाहीत, तितका यांच्या एका वाक्याने होवू शकतो.
२ ब ) जायच्या आधी , शहाळे किंवा पथ्य असणारे जेवण घेवून जावे, किमान शहाळे तरी घेवुन जावे ( आम्ही एकदा एकाला भेटायला जाताना नेले होते, त्या दिवशी आम्ही त्याकरिता नेलेले ते सत्ताविसावे शहाळे होते याची नोंद घ्यावी.) शहाळे-खरेदीसाठी आपल्याला लांबवर जावे लागणार नाही. हल्ली ईस्पितळाच्या प्रांगणात च शहाळे मिळतात, शिवाय सुट्टे पैसै ही न्यावेत, खर्च होतील याची पुर्ण शाश्वती असते, शहाळे खरेदी शिवाय पार्किंग असतेच.
३ ) पुर्वसूचना : रुग्ण गोळ्या खाऊन झोपलेला असल्यास त्यास खुशाल उठवावे, आणि वर " अरे झोपला आहेस का ? " असे विचारावे. अपघातग्रस्त व्यक्तीकडे पोचल्या-पोचल्या , तिथे तिथेच रहाण्याची ड्युटी करणारा एखादा नातेवाईक असतोच, इथे बर्याच जणांना ' नेमके कसे झाले? ' असा प्रश्न विचारायचा मोह होवू शकतो, पण... त्याच्या कडे व इस्पितळाच्या भिंतींकडे तुच्छपणे पहात. ' हिथे का अॅडमीट केलेत ' अस विचारून सूरूवात करावी. ' इथुन जवळच , माझ्या मित्राचे/मावशीचे/ चुलतभावाचे/चुलत-चुलत भावाचे/मावशीच्या नणंदेच्या भाचीच्या जावयाच्या मामीच्या मुलाचे हॉस्पिटल आहे, तिथे माझी ओळख आहे, चांगली सोय झाली असती, शिवाय बिलात ही !! " असे सांगुन आधीच बिलाच्या भितीने गाळण उडालेल्या पेशंट ची चाळण करावी, वर " माझ्या मित्राला/मावशीला/ चुलतभावाला/चुलत-चुलत भावाला/मावशीच्या नणंदेच्या भाचीच्या जावयाच्या मामीच्या मुलाला ईथेच अॅडमीट केले होते.. जीव गेला बिचार्यांचा, खुप चुकीचा इलाज केला त्यांच्यावर " असे म्हणुन साग्र-संगीत मीठ चोळावे.
४ ) आपण नेलेले पथ्य असलेले , बेचव जेवण, बिस्कीट वा शहाळे थेट (लग्नात जसे वर वा वधुच्या हाताच आहेर देतो तसे ) रुग्णाच्या हातात द्यावे, प्लास्टर ई. ई. ची अजिबात पर्वा करू नये, ते प्लास्टर केवळ संदेश लिहीण्याकरिताच असते. हे झाल्यावर मग शांतपणे " नेमके कसे झाले ? " हे विचारावे. मग त्यावर रूग्ण आधी दहा वेळा सांगीतलेली कथा , पुन्हा एकदा सांगायला सुरूवात करतो, विश्वास ठेवा, दरवेळी सांगताना त्या मध्ये नावीन्य असते, अॅडीशन असते, त्यामुळे आपण बोअर होण्याचा प्रश्न च नसतो.
५) आणी मग आपण आणलेले (बेचव) खाद्य-पदार्थ रुग्णास खावयासं उद्युक्त करावे, तो लाजे -काजे ते आपणांस खावयास ऑफर करेलच, तेव्हा , " नको रे आत्ताच, मिसळपाव/ वडाशॅंम्पल/ मसाला कट डोसा/गरमा-गरम कांदा भजी/ बटर चिकन/ खरपूस साबुदाणा वडा/भेळ/ दाल वडे ...(वा शक्य तितक्या चमचमीत पदार्थ) खावून आलो " असे सांगुन रूग्णाच्या तोडांची चव घालवावी. शिवाय त्यामुळे रुग्णास लवकरात कवकर बरे होवुन कधी एकदा हे पदार्थ खातो असे वाटते. त्यामुळे एका अर्थी आपण त्याची मदतच करतो.
असो ...तुर्तास ईतकेच..लवकरच आमचा , "वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना भेटावयाला जायच्या आधीची पुर्वतयारी " हा (लिहीण्याआधी ) सुप्रसिध्द झालेला ग्रंथ प्रसिध्द होणार आहे, त्यात आम्ही डायबेटीस ते खोकला ( कोण म्हणत खोकला झालेल्या रुग्णाला भेटत नाहीत ते ? एखाद्या सूंदर मुलीला होवु द्या एकदा मग बघा ;) ) सर्व काही कव्हर करणार आहोत .......आजच कॉपी बुक करा....;)
वाचने
7152
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहाहा!
हाण्ण तिच्या मारी...! तोडून
In reply to हाहाहाहाहा! by पैसा
हाहाहा
सुरेख!!!
लैच.....
लै भारी..
:)
प्रायव्हेट रूम
क ह र
:)
=)) =))
लै भारी.
अरारारा! लैच जिव्हाळ्याचा
निर्वाण...
सुहास'जी.... लय भारी!!..
In reply to निर्वाण... by अत्रुप्त आत्मा
लै भारी
एकदम मस्त.....
हा हा हा... मारतोय सुहास्या
' गॅस बुकींग करण्यार्या
घ्या......हे असं होतय. एरवी
ही ही ही रेवाकाकू
In reply to घ्या......हे असं होतय. एरवी by रेवती
हे राम... आणि अशी आठवण पुन्हा
In reply to घ्या......हे असं होतय. एरवी by रेवती
वाचुन समाधान पावल्यासारखं
हा हा हा
जब-या
मजा आली वाचायला!
काय लिहु? आता नवा शब्द
हा हा हा
हा हा हा !! मस्तच !! आणखी एक
मस्तच
धागा वरती आणण्यात येत आहे हो!!!!
नवे आहात काय मराठी संस्थळांवर
In reply to धागा वरती आणण्यात येत आहे हो!!!! by एस
ते माहीत होतं हो जुणेजाणते!
In reply to नवे आहात काय मराठी संस्थळांवर by प्यारे१
आयला. हा धाग कसा सुटला
अरेरे, एवढा जबरी धागा वाचायचा