उबंटूचा घोळ - एफ १!!एफ १!!एफ १!!एफ १!!
विंडोज ७ नीट सुरु असतानाही मी माझ्या अंक उच्चावर ( लॅपटॉप हो! ) उबंटू ११.१० ही आवृत्ती स्थापित केली होती (झक मारलीन उबंटू इन्स्टॉल केलं असं झालंय, कारण पूर्ण सिस्टीम क्लीन करुनही उबंटूमुळं कोणतीही सिस्टिम इन्स्टॉल होऊ शकत नाहीय म्हणे :( )
त्यात पार्टिशन वगैरे भानगडी आल्याच. बरेच महिने दोन्ही प्रणाली व्यवस्थित चालू होत्या. पण गेल्या काही दिवसात विंडोज ७ भ्रष्ट झाले, आणि त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी उबंटूनेही मान टाकली.
आम्ही काय करावं? आम्ही चांगला एक घनपाठी इंजिनियर (पक्षी लॅपटॉप दुरुस्तीगीर, चांगली भरभक्कम दक्षिणा देऊन हेवेसांनल) शोधला आणि लॅपटॉप समोर अनुष्टाणाला बसवला. गेले आठ दिवस त्याचं हे अनुष्ठाण चालूच आहे पण त्याला ना मेलेल्या उबंटूला जीवंत करता येत आहे, ना विंडोज ७ ला.
बायस लॉक असल्याने लॅपटॉपमध्ये कोणतीच प्रणाली ( पक्षी: विंडोज ७, उबंटू, एक्सपी वगैरे) या क्षणी स्थापित होऊ शकत नाहिये असं तो त्याच्या लॅपटॉप दुरुस्ती अनुष्टाणादरम्यान म्हणाला, वरुन 'बहोत रिसर्च करना पडेगा' वगैरेही कुजबुजला आणि मलाही त्यानं या लॅपटॉप दुरुस्ती अनुष्ठाणात ओढ्लं आहे, म्हणून हे यज्ञकुंड पेटवलं आहे. जेणेकरुन सध्याची पीसीहीन अवस्था दूर व्हावी आणि लवकरात लवकर पूर्ववत, आरोग्यसंपन्न लॅपटॉप वापरता यावा.
उबंटू + विंडोज ७ वापरणार्या कुणाच्या मागे पूर्वी असले शुक्लकाष्ट लागले होते काय? असेल तर काय उपाय करुन लॅपटॉप पुनर्जीवित केला हे कृपया सांगावे.
१. हा घनपाठी इंजिनियर लॅपटॅप निर्माता कंपनीचा प्रतिनिधी किंवा आम्ही लॅपटॉप ज्याच्याकडून खरेदी केला तो विक्रेता नाही, भाडोत्री आहे.
२. लॅपटॉपचं दुखणंबहाणं निर्माता कंपनीकडून होऊ शकतं, पण त्यासाठी मूळ विक्रेत्याकडं ४५० कि. मी. वर जाणे आले.
तर कृपया सांगा ह्या दुखण्यावर काय उपाय करता येईल?
दुसरे,
१. ३२० जीबी स्मरणशक्ती आणि १ जीबी रॅम असलेल्या अंक उच्चावर यापुढे पार्टिशन करुन उबंटू स्थापन करावे की न करावे?
प्रतिक्रिया
एस्केप!
तुमचा
परिक्रमा अर्धवट केलीत ना,
=)) दंडवत.
हहपुवा
यकु
बघा काहि मदत मिळते का ते
मी उबंटू इन्स्टॉल करण्याच्या
यकु, सरळ लाइव सीडीवरुन बूट कर
उन्हाळ्याच्या
..
उबंटू हि तशी बऱ्यापैकी घोळ
VMWARE वापरा
@ पैसा: आता एकच ठेवतोय. @
यकू?????? गोड खावस वाटतंय का?
try this
उबंटू हे नावच विचित्र
मी म्हणतो दोन दोन संचालन
ह्या ह्या ह्या
धडा
धन्या: ठीक आहे, डोक्यावर
हं...
>>>>>परिक्रमा अर्धवट केलीस
दुवीधामें
धाग्याचे नाव
अरे देवा कशाला टाकली ही ओएस.
..
छे
धन्स.
अॅ बरहात नाही.
भले शाब्बास, परा!
एक उपाय आहे करुन पहा:
मित्रहो, आपणा सर्वांच्या
ओक्के. पण...
Failure ID नाही दिसत एचपीकडून
लेख
लेख दिसतोय, प्रतिसाद दिसत
हम्म undated दिसले ...आता लेख