Skip to main content

एक विनंती

लेखक राजो यांनी शुक्रवार, 20/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे. इथले साहित्य खरंच अत्यंत वाचनीय असते. काही लेखक आपले लेख एकापेक्षा अधिक भागांमध्ये प्रकाशित करतात. हे भाग प्रकाशित होण्यास काही दिवसांचा/आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. नवीन वाचकांना आधीचे भाग शोधण्यासाठी सर्व साहित्य धुंडाळावे लागते. (इथे हे खेदाने नमूद करू इच्छितो कि मिपाचे सर्च अतिशय unreliable आहे) काही लेखक लेखाच्या नवीन भागामध्ये आधीच्या सर्व भागांचे दुवे देतातही (त्यासाठी त्यांना दुवा देतो :) ) तर नवीन लेख प्रकाशित करण्याआधी अशी काही सोय करण्यात येउ शकते का? (i.e. the article to be linked to any previous article?) जेणेकरून पूर्वीच्या सर्व भागांपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे?

वाचने 1917
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

प्रत्येक लेख/चर्चा/काव्य वगैरेच्या शेवटी (प्रतिक्रीया सुरू होण्या आधी) त्या लेखकाच्या "इतर लेखनाचा" दुवा असतो त्यावर टिचकी मारली तर आधीचे लेख मिळू शकतात. उ.दा. तुमच्या या लेखाच्या खाली मी "गुरूघंटाल यांचे इतर लेखन" यावर टिचकी मारली तर (प्रकार - शीर्षक - प्रतिसाद) "जे न देखे रवी... एक कविता 5 " याचा दुवा मिळाला.

अजून एक उपाय केला जाऊ शकतो, तो म्हणजे १) मि.पा. च्या सर्च विंडोमध्ये तुम्हाला काय शोधायचे आहे ते टाइप करा (पण 'शोधा' बटणावर क्लिक करू नका) आणि मग ते टाइप केलेले कॉपी पेस्ट करून गूगल वर सर्च करा. तुम्हाला बहुतेक वेळा लगेचच हव्या त्या लिन्क्स मिळतील २) तरीही हवे ते रिजल्ट न मिळाल्यास, तुम्हाला जे शोधायचे आहे मि.पा. वर ते> + मिसळपाव असे मि.पा. च्या सर्च विंडोमध्ये लिहून ते गुगलच्या सर्च विन्डो मध्ये कॉपी पेस्ट करून गुगल सर्च करा. तुम्हाला हव्या त्या लिन्क्स मिळतील