पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय
पूर्वपिठीका:
"पौराणिक विमाने" या चर्चेच्या निमित्ताने येथे माशेलकरांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्यातील माझ्या लेखी महत्वाचा आणि व्यावहारीक भाग पेटंट्सच्या संद्रर्भात होता. त्याला मी जरी हा प्रतिसाद दिला होता, त्यातील माशेलकरांसंदर्भातील भागः
विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत. त्यांनी भारतात या संदर्भात सरकारपासून औद्योगिक क्षेत्रात जागृती आणली. भारतातील (आणि तेच इतरत्रही) अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचे पेटंट करण्याचा घाट आंतर्राष्ट्रीय कंपन्यांनी घातला होता/ आहे. त्यातील भारतासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे हळद आणि बासमती... या दोन्हींच्या संदर्भात त्यांच्या नेतॄत्वाखाली युएस (सरकारी) पेटंट संस्थेत आणि आंतर्राष्ट्रीय पेटंट संस्थेत त्यांनी लढत दिली. परीणामी हळद आणि बासमती वाचलेच पण नैसर्गिक साधन संपत्तीचे पेटंट कसे करावे आणि नाही करावे या संदर्भात नवीन धोरणे तयर झाली, ज्याची मदत इतर विकसनशील राष्ट्रांनाही झाली. पेटंट देताना अधिकारी आधी ते ज्ञान उपलब्ध माझ्या लेखी त्यांनी हे काम अॅक्टीविझम/चळवळेपणा करण्याऐवजी, सध्याच्या नितीनियमांनुसार केले. सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदायला हव्यात, थोडक्यात इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण होऊन त्यातून वैभव निर्मिती होयला हवी असे काहीसे त्यांचे मत होते/आहे, जे त्यांनी त्यांच्या मर्यादीत क्षमतेत उद्योग आणि सरकारमधे जागृत केले आहे असे वाटते.त्यावरून अधिक लिहीण्याची इच्छा होती. मात्र आधीच्या पुराणातल्या वानगीच्या चर्चेमुळे या अधुनिक आणि व्यावहारीक जगातील घडामोडीचे वांग्यातले भरीत होऊ नये म्हणून हा वेगळा लेखनप्रपंच. :-)
_______________________________
१९९३ साली मिसिसिपी विद्यापिठाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय संस्थेने "Use of turmeric in wound healing " साठी अमेरीकन पेटंट संस्थेकडे पेटंट मागितले आणि तसे त्यांना मिळाले देखील. त्यानंतर भारतातील Council of Scientific and Industrial Research (सी एस आय आर) या संस्थेने १९९६ च्या सुमारास या पेटंट्च्या विरोधात अमेरीकन कोर्टात दावा केला की हे आमचे पारंपारीक ज्ञान आहे आणि अशा मुक्तस्त्रोत ज्ञानाचे पेटंट होता कामा नये. येथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की यात भारत सरकारने प्रत्यक्ष भुमिका घेतली नव्हती. सी एस आय आर ही निमसरकारी संस्था असल्याने फारतर सरकार अप्रत्यक्ष होते असे म्हणता येईल. पण खटला अमेरीकन पेटंट्स ऑफिसच्या विरोधात आणि अमेरीकन कोर्टात असल्याने अमेरीकन सरकार मात्र प्रत्यक्ष गुंतले होते. याचा दोन्ही देशात आणि जगात बराच गाजावाजा झाला. सरतेशेवटी कोर्टात सीएसआयआर जिंकले आणि कोर्टच्या आदेशामुळे युएसपेटंट ऑफिसला माघार घ्यावी लागली.
त्याच सुमारास बासमती चे टेक्स्टमती, नीम वगैरेचे पेटंट किस्से उदयास येऊ लागले. असे पेटंटचे हक्क कोणीतरी मिळवल्यावर मग कळणार आणि मग कोर्टात लढायचे... हे चित्र कसे बदलायचे हा प्रश्न होता. भारतापुरते त्याचे उत्तर १९९९ साली सीएसआयआर आणि तत्कालीन Ministry of Health & Family Welfare च्या अख्त्यारीतील Department of Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (Dept. of AYUSH) ने तत्वतः शोधला. त्याचे नाव आहे: Traditional Knowledge Digital Library. (टीकेडीएल). इंग्रजी, डच, स्पॅनिश, फ्रेंच आणि जपानी भाषेत असलेल्या या ग्रंथसंग्रहालयात २००१ ते २०१० च्या काळात प्रामुख्याने वैद्यकीय वनस्पती आणि त्यांचे पारंपारीक ज्ञानाप्रमाणे असलेले उपयोग एकत्रीत केले आहेत. त्याच अनुषंगाने Traditional Knowledge Resource Classification (TKRC) देखील तयार केले गेले आहे. आयुर्वेदीक, उन्नानी, सिद्ध आणि योग अशा पारंपारीक शाखांमधले वैद्यकीय ज्ञान एकत्र करून ते पेटंट ऑफिसर्सना (जे पेटंट्स प्रस्तावाची ग्राह्यता तपासतात) यांना उपलब्ध करून दिले गेले आहे. १४८ पुस्तकांमधली ३४ मिलियन्स पाने संकलीत करून त्यांचे वर सांगितलेल्या भाषांमधे भाषांतर केले गेले आहे. युरोप, युके आणि युएस येथील पेटंट ऑफिसेसना ह्या माहितीचा उपयोग पारंपारीक ज्ञानाचा गैरवापर करून होणारी बायोपायरसी टाळण्यासाठी होत आहे.
वर्ल्ड बँकेच्या २००२ च्या अंदाजानुसार असल्या प्रकारच्या पेटंट्समुळे आणि तत्संदर्भातील जागतीक (TRIP) करारामुळे भारतापुरते बोलायचे तर अंदाजे $३ बिलीयन्सचा तोटा होता. मात्र टिकेडीएल सारख्या प्रकल्पामुळे आता असली पेटंट्स करणे अवघड होऊ शकले.
२०१० पर्यंत युरोपात ३६ तर अमेरीकेत ४० पेटंट्सच्या अर्जांमध्ये या विदाचा उपयोग केला गेला आहे. या संदर्भातील रोचक माहिती तसेच एकूणच या प्रकल्पाची टाईमलाईन येथे बघता येईल. काही उदाहरणादाखलः
Uniliver Nv,Netherland have withdrawn their application no EP1607006 for "Functional berry composition" dated 04 August 2009 after submission of TKDL prior art evidence( s ) .
Purimed Co. Ltd. Seoul, Korea have withdrawn their application no EP1781309 for "Nelumbinis semen extract for preventing and treating ischemic heart disease and pharmaceutical composition and health food containing the same" dated 30 October 2009 after submission of TKDL prior art evidences.
Clara's ApS, Denmark have withdrawn their application no EP2044850 for "Method for altering the metabolism characteristic of food products
Jumpsun Bio-Medicine (Shanghai) Co. Ltd, China have withdrawn their application no EP1889638 for "Medicaments and food for treatment or prevention of obesity and/or diabetes containing cicer arietinum extract"
MDIP LLC, Post Office Box 2630 Montgomery Village, MD, 20886-2630, US, filed a patent application with publication no. 20100291249 entitled "Pomegranate-derived Products for the Treatment of Skin Sores and Lesions", the Examiner rejected claims based on the TKDL evidences
अणि असे बरेच....
प्रतिक्रिया
रोचक दुवा
माहितीपूर्ण...
माशेलकरांसंदर्भातील आणि
खरंच मोलाची माहिती. आवडले!
छान माहीती आहे.
माहितीबद्दल धन्यवाद !!
उपयुक्त माहिती.
सही!!!!! हा डेटाबेस इतका
ही खुप खुप मोलाची माहिती इथं
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल
First Turmeric and Neem, now Ginger..!!
लिन्क ड्कवाञला हवी होति..... :(
विकास, छान लिहिलंत....
महत्वाची माहिती
माहितीपूर्ण लेखाबद्दल
धन्यवाद + थोडे अधिक
तुमचे शेवटचे वाक्य सत्य आणि
+१
आसं होय?
धन्यवाद!
+१