✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास

स
संजय क्षीरसागर यांनी
Sat, 04/14/2012 - 13:14  ·  लेख
लेख
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" चिऊ आणि काऊ : काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे मिथक : आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला. चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत. (अवलोकन : अजून कथा संपलेली नाही तरी सर्वांनी बसून घ्यावे) मिथक : अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. मिथक : आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? चिऊ आणि काऊ : पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच (अवलोकन : काऊ हा जरी वरून दिसायला कावळा असला तरी तो अती चतुर असून त्याला अजयच्या आधी `काय सार्थ आणि काय व्यर्थ' ते समजलंय. त्यानं माची वगैरे प्रकार गतजन्मीच केलेत आणि मृत्यू इत्यादि किरकोळ प्रकार त्याला रोजचेच आहेत त्यामुळे चिऊ आणि काऊ लवकर आटोपली आहे इतकंच.) मिथक : स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते. चिऊ आणि काऊ : काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही" (अवलोकन : चिऊ देखील स्नेहापेक्षा जास्त समंजस आहे तिला डायरेक्ट काऊचे वेड आहे, ऊगीच कशाला वेळ घालवायचा?) मिथक : "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल" चिऊ आणि काऊ : तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात. (अवलोकन : अजय आणि स्नेहापेक्षा काऊ आणि चिऊला आयुष्यात नेमकं काय करायला हवं ते लवकर कळलंय) मिथक : अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला. चिऊ आणि काऊ : जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग" (अवलोकन : "आय नीड क्लोजर" च्या दोन वेगवेगळ्या छटा) मिथक : अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत. (अवलोकन : जे मिळवायला अजयला नसते सायास करायला लागले तेच आत्मिक समाधान चिऊनं केवळ काऊच्या कुशित झोपून मिळवलंय. समाधान कुणी मिळवलं अजयनं की चिऊनं हे गौण आहे, कसं मिळवलं ते लक्षात घेण्यासारखं आहे) मिथक : अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते. चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत. (अवलोकन : स्वत:च्या अत्मोन्नतीत काहीच विषेश नाही ती काय कुणी ही करेल, पत्नीला समाधीप्रत नेऊन काऊनं अजयवर मात केली आहे म्हणून वरील ओळी पुन्हा टाकण्यात आल्या आहेत)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
17897 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

भले....

मुक्त विहारि
Sat, 04/14/2012 - 14:29 नवीन
"संजय" हे महाभारत कालीन नाव आपण सार्थ ठरवलेत.... ह्या "काऊ-चिवू" आणि "मिथक" ह्या कलाक्रुतीतील साम्ये आपण योग्य त्या रीतीने दाखवुन माझी वाचनद्रुष्टी (?)कशी आहे हे जाणवुन दिलेत...
  • Log in or register to post comments

मुक्त विहारी आपण मला महाभारतात नेऊन विषय भरकटवतायं

संजय क्षीरसागर
Sat, 04/14/2012 - 13:58 नवीन
आणि मला दूरचं बघायला चष्मा आहे त्यामुळे जवळच्याजवळ काय असेल ते पाहतो. असो, असे प्रतिसाद न देता आपल्या सूक्ष्म अवलोकनाद्वारे केवळ साम्यस्थळांवर चर्चा व्हावी अशी नम्र विनंती करतो. अवलोकन : मी आपल्याला `ऋषी द्विजा' म्हटल्यावर आपण लगेच मला `महाभारतातील संजय' म्हटले आहे असे वाटते तरी आता यावर खुलासा करू नये.
  • Log in or register to post comments

सुंदर !

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/14/2012 - 14:49 नवीन
आमच्या घासुगुर्जींची उणिव आज भरुन निघाली.
  • Log in or register to post comments

हं...असेल असेही असेल...

मुक्त विहारि
Sat, 04/14/2012 - 15:02 नवीन
दिलीप गेला , दिलीप आला...(क्रिकेटचे २ सम्राट).. हीच जग रहाटी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छ्या!

दादा कोंडके
Sat, 04/14/2012 - 15:47 नवीन
महत्वाचा फरक म्हणजे कथेतली पत्रं आहेत. मिथक म्हणजे फारफार तर साउथिइंडीयन बी ग्रेड सिनेमा आहे. आणि चिउ-काउ म्हणल्यावर "ओल्ड हॅग अँड टीन्स" किंवा "माय फ्रेंन्ड्स मॉम" सुद्धा नाही तर "बिझारे" सारखं वाटलं. :)
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Sat, 04/14/2012 - 16:26 नवीन
एकदा होते ती चूक, वारंवार होतो तो मूर्खपणा! 'आपली समज तोकडी पडत असेल का?' असा प्रश्न काही मनुष्यांना आयुष्यभरात पडत नसावा बहुतेक. चालू द्या.
  • Log in or register to post comments

एक ज्येष्ठ सदस्य काय म्हणतायंत याची कथा लेखकांनी नोंद घ्यावी

संजय क्षीरसागर
Sat, 04/14/2012 - 17:23 नवीन
आणि वारंवार अशा कथा लिहू नयेत. `चालू द्या' हे त्यांनी संकेतस्थळाला उद्देशून म्हटले आहे, तुम्हाला नाही. आणि `हम्म' हा त्यांच्या बहुतेक प्रतिसादांचा मूळ स्वर आहे किंवा ती त्यांची सुरूवात करण्याची शैली आहे, त्याचा अर्थ विचारू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

क्षीरसागरसाहेब

रमताराम
Sun, 04/15/2012 - 00:32 नवीन
एकतर तुम्ही फारच भाबडे असावात किंवा फारच धूर्तपणे वेड पांघरून पेडगावला जात आहात. वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशून आहे. काऊ नि चिऊ ही अतिशय सुमार कथा आहे असे 'आमचे मत' आहे (तुमचे वेगळे असू शकते) नि ती मिथकच्या पासंगालाही पुरत नाही. तुमच्या तुलनेच्या पद्धतीने कोणतीही कथा कोणत्याही प्रेम-विरह कथेवरून ढापली असे सिद्ध करता येऊ शकते. उद्या ना. सी. फडकेंच्या काही कथा तुमच्या काऊ नि चिऊ वरून घेतल्या आहेत हे सिद्ध करता येईल. दोष तुमचा नाही. तुम्ही 'काऊ नि चिऊ' च्या पातळीवरून थोडे वर येण्याची गरज आहे. कथेचा तपशील कुठला नि कथाबीज कुठले अथवा कथा मांडणी म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलात तर तुमचा हा लेख किती हास्यास्पद नि 'फुट इन द माउथ' प्रकारचा आहे हे तुमच्याच लक्षात येईल. काऊ आणि चिऊ सारख्या कथा वारंवारच काय कधीच लिहू नयेत! उगाचा उंटा..... जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ररा आपण ज्येष्ठ आहात म्हणून पहिला प्रतिसाद लाईटली घेतला

संजय क्षीरसागर
Sun, 04/15/2012 - 01:08 नवीन
आणि हा देखील तसाच घेतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून

पेशवा
Sat, 04/14/2012 - 21:46 नवीन
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन >> हे चिऊ आनि काऊ काय प्रकरण आहे हे शोधायला जरा वेळ लागला. आधी वाटलेल मराठीतील कुठलीतरी नामवंत कथ वैगेरे आहे जिचा मिथक च्या गाभ्याशी व एकंदर आकृतीबंधाशी भरपूर साम्य आहे व ती मिथकच्या आधी बरेच वर्ष सार्वजनिक रित्या उपलब्ध आहे. त्यामुळे वरील अनुमान निघाले असेल.. पण चिऊ आणि काऊ ही मिपा वर प्रकाशित झालेली (१०/४/२०१२) कथा आहे. कथा वाचली आणि ह्या वरून मिथक "उचलली" हे अनुमान पाहून मात्र ह.ह.पु.वा. झाली. संजय आपण मिथक वरील प्रतिसादात कालनुक्रमाची दखल घेतली आहेत तरी वरील निष्कर्श कसा? हि कथा माय्बोलीवर दिवळी अंक २०१० ह्यात प्रकाशित करण्याआधी दोनेक वर्श लिहिलेली आहे म्हणजे २००७/२००८ च्या सुमारास आणि चिऊ आणि काऊ , तो आणि ती व सन्याशी वैगेरे कथांचा व मिथकचा दुरान्वयेही संबंध नाही. कल्पना चोरी सारखा गंभिर आरोप करताना मिपा व त्यावरील कथा ह्या वैश्वीक साहित्य नाहीत इतका विचार मनात बाळगला तरी पुरे असे वाटले. ह्या कथेवरील एकंदरीतच चर्चा वाचुन खुप मनोरंजन झाले. धन्यवाद ता.क. मानव चिऊ आणि काउ आपण अधी कुठे प्रसिद्ध केली असेल तर त्याची मला कल्पना नाही. तसे असल्यास अधिच दिलगीर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चिर्कुट
गुरुवार, 12/20/2012 - 22:28 नवीन
पेशवे आपल्या प्रतिसादामुळे निदान लेख आहे तरी काय हे कळले..त्यावर प्रतिसाद देण्याची आमची कुवत नाही हे देखील कळले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेशवा

काय च्यायला दिवस आलेत...

धन्या
Sun, 04/15/2012 - 21:30 नवीन
काय च्यायला दिवस आलेत...
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
Mon, 04/16/2012 - 11:12 नवीन
अवघड आहे.... वाचकांचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

यु राॅक्स संजय जि.

स्पा
गुरुवार, 12/20/2012 - 18:53 नवीन
यु राॅक्स संजय जि. मस्तच. तुमच्या निरिक्शण शक्तिला सलाम. अफाट knowledge. आहे या माणसाचं
  • Log in or register to post comments

दोन्ही कथांचे दुवे मिळतील का?

राजेश घासकडवी
गुरुवार, 12/20/2012 - 19:47 नवीन
मुळातून वाचायला मिळाल्या तर बरं होईल.
  • Log in or register to post comments

+१

अन्या दातार
गुरुवार, 12/20/2012 - 21:17 नवीन
या गोष्टी मुळातून वाचायला मिळाल्या तर काहीतरी संगती लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मुळापासून वाचा.

बांवरे
Fri, 12/21/2012 - 04:58 नवीन
चिउ आणि काउ इथेच मिपावर आलेली एक कथा आहे. सापडली नाही. शोधलीत तर सापडेल कदाचित. मिथक दुसरा दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हे

रामपुरी
Fri, 12/21/2012 - 05:33 नवीन
कितवीत असताना लिहीलंय?
  • Log in or register to post comments

काहीही...

राजेश घासकडवी
Fri, 12/21/2012 - 08:18 नवीन
मिथक आणि चिऊ काऊ च्या लिंक्स. http://www.misalpav.com/node/21359 http://www.misalpav.com/node/21326 मिथक ही एक परिपूर्ण कथा वाटते. चिऊ काऊ हे कथाबीजापलिकडे गेलेलं नाही. या दोघांची तुलना करायची म्हणजे एखाद्या समर्थ चित्रकाराने काढलेलं घोडा आणि त्यावरच्या स्वाराच्या चित्राची तुलना दुसरीतल्या पोराने गिरगटवलेल्या घोड्याच्या चित्राशी करण्यासारखी वाटते. उगाच 'या घोड्याला पुढचा उजवा पाय आहे, याही घोड्याला पुढचा उजवा पाय आहे' वगैरे तोडून गोष्टी दाखवणं फारच हास्यास्पद. कार्यमग्न नवरा आणि त्याची वाट बघणारी बायको इतपत साम्य आहे म्हणून एकाने दुसऱ्याची चोरी केली वगैरे म्हणणं म्हणजे किंग लिअरमध्ये दुःखी म्हातारा आहे म्हणून कुठच्याही दुःखी म्हाताऱ्याच्या कथेची शेक्स्पिअरने केलेली चोरी आहे असं म्हणण्याइतकं बालिश वाटतं.
  • Log in or register to post comments

ओह.

स्पा
Fri, 12/21/2012 - 09:14 नवीन
ओह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अहो, पण सगळ्या 'गोष्टी'

इनिगोय
Fri, 12/21/2012 - 09:54 नवीन
अहो, पण सगळ्या 'गोष्टी' सोप्या करणं हे काम सुद्धा करायला हवं ना कोणीतरी? आता ते केल्यावर गोष्टी सोप्या होतात का कसं ते आता विचारू नका ब्वा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पूर्णपणे नास्तिक असणं हे

Dhananjay Borgaonkar
Fri, 12/21/2012 - 15:20 नवीन
पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे. प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच! कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..
___/\___ ताई दंडवत स्विकारावं या पामराचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

मिपावर आलं की दिसतं काय काय,

इनिगोय
Fri, 12/21/2012 - 15:30 नवीन
मिपावर आलं की दिसतं काय काय, मग सुचतं असं काय काय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

सुपर्ब..

चिगो
Sat, 12/22/2012 - 12:19 नवीन
"पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे. प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच! कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा.." अत्यंत सुंदर आणि चपखल विधान.. ताई, ह्या नुसत्या एका विधानाच्या जोरावर तुम्ही कुठलीतरी 'देवी/माँ' बनू शकता..;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

स्पा

संजय क्षीरसागर
Fri, 12/21/2012 - 11:23 नवीन
यु राॅक्स संजय जि. मस्तच. तुमच्या निरिक्शण शक्तिला सलाम. अफाट knowledge. आहे या माणसाचं
तुम्ही असे प्रतिसाद दिलेत की इतरांना प्रचंड त्रास होतो. मिथकवर बर्‍यापैकी चर्चा झाली आणि माझ्या आकलनावर इथल्या मान्यवर सदस्यांनी कमेंटस केल्या पण शेवटी खुद्द लेखकानं असं म्हटल्यावर : कथा पटकन आकलन होत नाही हा तुमचा फीड्बॅक कदाचित रास्त आहे कारण ह्या आधीसुधा ह्या कथे संदर्भात तो मिळाला आहे. कदाचित तो माझ्या लेखनातील दोष आहे. पण कोणतीही कथा / कवीता /कलाकृती जे प्रष्ण जो अर्थ रसिकाच्या मनात निर्माण करते त्याची उत्तरे शोधायची जबाबदारी त्या रसिकावरच असते. जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले. ....मान्यवरांचा नाईलाज झाला. माझ्या आकलनापेक्षा त्यांनी उगीच माना डोलवल्या होत्या हे स्पष्ट झालं. असे प्रतिवाद न करता येऊ शकणारे मग व्यक्तिगत पातळीवर उतरून विडंबनं वगैरे टाकतात आणि त्यावर इतरही तश्याच मानसिकतेची नाराज मंडळी तिथे हात धुवून घेतात. मी ही पोस्ट गंमत म्हणून लिहिली होती त्यात विषेश काही नाही. मत्सर हा कामापेक्षाही मोठा रिपु आहे. मत्सर मनाच्या तळ्यात इतका खोल गेलाय की आपण किती उघडपणे लेखनावरचे (याच नाही तर इतर कित्येक) प्रशंसा करणारे आणि इतरांना उपयोगी झालेले प्रतिसाद नजरेआड केलेत किंवा आपल्या कृतीनं आपणच उघडे पडतोय हे लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments

leave it संजयजी.

स्पा
Fri, 12/21/2012 - 11:47 नवीन
leave it संजयजी. कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही, this ppl jealous of ur detail knowledge in all topics.,nothing else
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही, येस!

संजय क्षीरसागर
Fri, 12/21/2012 - 12:30 नवीन
`नाही जमत ना आपल्याला उंची गाठायला, खेच दुसर्‍याला खाली' ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणताही गुण स्वतःत विकसित होण्याची शक्यता नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+100

स्पा
Fri, 12/21/2012 - 12:36 नवीन
तुम्हि ती उंची गाठायला किति कष्ट केलेत हे कोणाला कळणार णाहि असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता बास की रे स्पावड्या...

गवि
Fri, 12/21/2012 - 14:01 नवीन
आता बास की रे स्पावड्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@गवि

किसन शिंदे
Fri, 12/21/2012 - 14:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बोला बोला तुम्ही बिचा-या

५० फक्त
Fri, 12/21/2012 - 14:58 नवीन
बोला बोला तुम्ही बिचा-या मिस्पालाच, थोडा वेळ द्या, एकदा का ..... असो, आमचं ट्रेड सिक्रेट आहे ते मग नंतर बघु आम्ही सगळ्यांकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

श्री. स्पा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/21/2012 - 15:02 नवीन
तुम्ही खोटे बोलता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ठिक आहे.

स्पा
Fri, 12/21/2012 - 15:07 नवीन
ठिक आहे. वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा. असो आमचा लेखन विराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओक्के !

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/21/2012 - 15:11 नवीन
वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.
पण प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

परा मला वाटत स्पा खुपच विवेकी

Dhananjay Borgaonkar
Fri, 12/21/2012 - 15:41 नवीन
परा मला वाटत स्पा खुपच विवेकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तू धीर सोडू नको स्पा, कोणी

इनिगोय
Fri, 12/21/2012 - 15:24 नवीन
तू धीर सोडू नको स्पा, कोणी काही म्हणू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही

किसन शिंदे
Fri, 12/21/2012 - 16:06 नवीन
वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.
ब्वाॅर्रर्र..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

थोडा बदल,

५० फक्त
Fri, 12/21/2012 - 15:08 नवीन
श्री.मिस्पा, तुम्हीच (फक्त) खोटं बोलता असं तुम्हाला वाटतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

स्पा यु पण रॉक्स बरका...

Dhananjay Borgaonkar
Fri, 12/21/2012 - 15:22 नवीन
स्पा यु पण रॉक्स बरका...:P
  • Log in or register to post comments

आमचं नाव चौकटराजा ...

चौकटराजा
Fri, 12/21/2012 - 15:33 नवीन
आम्ही मिपावर आलो तेंव्हा असे दिसले की इथे लई भारी मानसं अदूगरच म्वाठं चांगलं लिखाण लिहून राहिलेयत.मग आपण संजय सूरकर दिगदर्शित दिलीप प्रभावळकर अभिनित मंद माठ चौकटराजाप्रमाणे आहोत असे आढळून आले. संजय क्षीरसागर यांचे काही धागे वाचले की आमच्या सुरवातीच्या कल्पकतेचे आम्हालाच कौतुक वाटते. सबब आता आणखी बुध्यांक चाचणीची( आमच्या) -( हो, नाहीतर बाजार का काय म्हनत्यान ना? ते नको .) गरज वाटत नाही आमास्नी. संजय दादा लगे रहो ! तुम्हाला बदामा राजा, किलवर राजा . इस्पिक राजा, जोकर ई ई प्रतिसादासाठी मिळोत.
  • Log in or register to post comments

स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!'

प्यारे१
Fri, 12/21/2012 - 15:36 नवीन
स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!' ;) सरळ प्रतिसाद देण्यात स्पाचा हात कुणीच धरु शकत नाही. भावी संपादकपदासाठी स्पाचं नाव जाहीर करुयात काय? ;)
  • Log in or register to post comments

थांबा..घाई करु नका. कोहलीला

Dhananjay Borgaonkar
Fri, 12/21/2012 - 15:45 नवीन
थांबा..घाई करु नका. कोहलीला उपकर्णधार पद दिल आणि त्याचा फॉर्म हरपत चाल्ला आहे. आपल्या स्पाच तस झालेल चालेल का तुम्हाला?त्याची खेळी बहरुदे अजुन मग त्याला संपादकपद बहाल करा अस मी सुचवु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>त्याची खेळी बहरुदे अजुन

प्यारे१
Fri, 12/21/2012 - 16:20 नवीन
>>>त्याची खेळी बहरुदे अजुन आँ????? आता तो 'आंतरराष्ट्रीय खेळाडूं'समोर 'खेळायला तयार' आहे असं नाही का वाटत बरं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

हुम्म

इरसाल
Fri, 12/21/2012 - 16:24 नवीन
संजय क्षीरसागरांवर मिपावर मतदान चालु आहे हे त्यांना कळत नाही की ते खरचं त्यांना कळत नाही.
  • Log in or register to post comments

स्पा, वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो!

संजय क्षीरसागर
Fri, 12/21/2012 - 19:23 नवीन
या तुझ्या वाक्यानं हसूं आलं! इतक्या जनरेट्यात तू लिहू शकलास हेच तुझं साहस आहे. प्रश्न माझ्या लेखनाचा नाही, स्वतःच्या मताशी तुम्ही किती इमान राखून आहात हा आहे. इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही. आय एम रायटींग टू अ फेसलेस मॉब. त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता. इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन! जर त्यात तुम्हाला स्वत्व दिसलं तर ते तुमचं स्वत्व आहे, अहंकार दिसला तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. लेखनातली अनेकविधता भावली तर तुम्हाला व्यासंग करावसा वाटेल, निरर्थकता जाणवली तर तुम्हाला नव्या गोष्टींची आस नाही असा अर्थ आहे. प्रतिवाद करता येत नाही म्हणजे मी स्वतःच म्हणणं खरं करतो असा समज करून घेतलात तर तो तुमचा अँगल आहे पण आपल्या धारणाच ठिसूळ आहेत ही त्यातली खरी मेख आहे. मला प्रशंसेची आस नाही पण `देव आहे अशी पाटी गळ्यात अडकवून फिरणारे' जेंव्हा विडंबन करतात तेंव्हा त्यांना फार काही कळलंय अशी गोष्ट नसते. केवळ एका भंपक कल्पनेला मी शह दिला आणि त्यांना प्रतिवाद करता येत नाही म्हणून त्यांनी टाकलेली ती पिंक असते. प्रणयतृप्तीवरच्या मनःपूर्वक लेखनामागे तुमचं सहजीवन सुखी व्हावं हा प्रामाणिक हेतु असतो आणि जहीर त्याची व्य.नि.तून दाद देखील देतो. सोकाजी, अतृप्ताआत्मा, पूजा खुष होऊन जातात. पण ते शिवधनुष्य आता कसं पेलणार किंवा ज्यांनी सहजीवनच नाकारलय अश्याना ते काय कळणार? ते फ्रस्टेट होतात आणि मग विडंबनाच्या गंगेत आपल्या तिरकस प्रतिसादाच घोडं नहावून घेतात.
  • Log in or register to post comments

ज्यांनी सहजीवनच नाकारलय

कवितानागेश
Fri, 12/21/2012 - 21:29 नवीन
ज्यांनी सहजीवनच नाकारलय अश्याना ते काय कळणार? ते फ्रस्टेट होतात आणि मग विडंबनाच्या गंगेत आपल्या तिरकस प्रतिसादाच घोडं नहावून घेतात.>> 'सहजीवन नाकारलय' हे नक्की कुणाला उद्देश्यून आहे?? please explain. तुम्ही जर का इथे कुणालाही ओळखत नाही, तर कुणाच्याही सहजीवनाबद्दल अश्या प्रकारची कॉमेंट कशाबद्दल आहे? --- ( इथल्या अनेकांना प्रत्यक्ष ओळखणारी सदस्य) माउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे तर्कशास्त्र कळाले नाही ब्वॉ

लंबूटांग
Fri, 12/21/2012 - 20:23 नवीन
इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही. आय एम रायटींग टू अ फेसलेस मॉब. त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता. तुम्ही फेसलेस मॉब साठी लिहीत आहात म्हणून तो फेसलेस मॉब तुमच्या लेखनात स्वतःला पाहतो हा निष्कर्ष कसा काय काढलात?
  • Log in or register to post comments

:)

क्लिंटन
Fri, 12/21/2012 - 22:12 नवीन
तुम्ही फेसलेस मॉब साठी लिहीत आहात म्हणून तो फेसलेस मॉब तुमच्या लेखनात स्वतःला पाहतो हा निष्कर्ष कसा काय काढलात?
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

फेसलेस मॉब

संजय क्षीरसागर
Fri, 12/21/2012 - 22:53 नवीन
इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाही
ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद लेखनाला असतो, लेखकाला नाही. ही पहिली गोष्ट. आता याचाच दुसरा पैलू आहे
इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन!
ही देखील वस्तुस्थिती आहे कारण तुम्ही मला ओळखत नाही. त्यामुळे लेखनाचा अर्थ हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे. एकाच वेळी काही लोक प्रशंसा करतात, त्यांना ते उपयोगी वाटतं आणि काही लोक लेखन निरर्थक आहे म्हणतात यावरनं ते सिद्ध होतं.
संक्षी यांनी मांडलेले मुद्दे अतिशय रोचक आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या विचारात मूलभूत विचार नेहमीच दिसतात
असं गवि म्हणतो तर माझ्याविरूद्ध लिहिणारे विडंबनकार मात्र मी काहीच्याबाही लिहितो म्हणतात...त्यामुळे इंटरप्रिटेशन तुमचय. इट इज यू इंटरप्रेटींग योरसेल्फ थ्रू द मिनींग. मी असंबद्ध किंवा अंतर्विरोधी लिहित असतो तर इथे माझा कुणीही प्रतिवाद केला असता. इंटरनेट रायटींग इतकं ब्लॅक अँड व्हाइट आहे की तिथे अभ्यास नसताना लिहिलेलं पब्लिक लगेच हाणून पाडतं. सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

एक शंका...

मोदक
Fri, 12/21/2012 - 23:42 नवीन
सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे? "सहजीवन" चा नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे आपल्याला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा