http://www.misalpav.com/node/21196 भाग १
http://www.misalpav.com/node/21265 भाग २

संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पोइंत कडे आम्ही निघालो. प्रसिद्ध दुध तलाई लेक जवळ हे ठिकाण आहे. तेथून रोपवे ने डोंगरावर पोहोचलो. तेथे करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात श्वेत मूषक पिंजर्यात बंदिस्त होते. आम्ही मात्र डोळे विस्फारून सूर्यास्त , आणि आकाशातील रंगाची उधळण व त्यात न्हाहून निघालेले उदयपुर पाहत होतो. तेथून ,सिटी पेलेस ..जगमंदिर सारेच गोजिरवाणे दिसत होते.
सिटी पेलेस
चंद्रोदय व चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले उदयपुर
सकाळी आम्ही उदय पूर सोडले आणि गाडी रानकपूरच्या दिशेने जाऊ निघाली.रानकपूर हे अरवलीच्या पर्वत रांगामध्ये वसले असून जैनच्या पा
च पवित्र तीर्थशेत्रांपैकी एक आहे: येथील प्रमुख आकर्षण रानकपूर जैन मंदिर आहे: राणा कुंभाच्या कारकिर्दीत त्यांच्या मदतीने त्याकाळातील सर्वात श्रीमंत भारतीय जो एक जैन व्यापारी होता सेठ धरणा साह ह्याने पंधराव्या शतकात जैनांचे सर्वात मोठे जगप्रसिध्ध मंदिर उभारण्यात आले:म्हणूनच राणा कुंभाच्या आदराप्रीत्यार्थ ह्या जागेचे नाव रानकपुर पडले. व आजही त्यांच्या पवित्र दिवशी ह्या धारणा साह च्या परिवारातील वंशज ह्या मंदिरात येऊन पूजा करतात. :
त्या काळात मंदिर निर्मितीला पन्नास वर्ष लागली: व खर्च त्या काळात एक कोटी रुपये आला:मंदिराच्या आजूबाजूला जंगल असून सर्वत्र घनदाट वनराई आहे.
चार मुखी मंदिर भगवान ऋषभदेवाला समर्पित असून मंदिर्याच्या मुख्य मंडपात जैनांचे पहिले तीर्थकर आदिनाथ ह्यांच्या संगमरावराच्या चार भव्य अश्य७२ इंची मुर्त्या मंदिराच्या चारही बाजूंना आहेत: म्हणूनच ह्या मंदिराला चतुर्मुख जैन मंदिर व रिषभदेव जैन मंदिर म्हणतात: मंदिर्याच्या चार भव्य प्रवेश दारांपैकी पुढील दारातून आम्ही आता प्रवेश केला: ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १४४४ संगमरवरी नक्षीदार खांब आहेत.जेथे पाहावे थेथे खांबच खांब दिसत होते.आणि त्यांची रचन अश्या खुबीने केली आहे कि कुठंही मंदिराचे मुख्य प्रार्थना स्थळ दिसते. आणि प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीकाम केले आहे. मंदिरात २४ मोठ्या खोल्या आहेत.मंदिराच्या मंडपात जैनच्या २४ तीर्थकरांची शिल्पे कोरली आहेत. मंदिरात चार मोठे प्रार्थनेसाठी मंडप आणि चार पूजाअर्चा करण्याचे मंडप आहेत. मंदिराच्या भव्य आवारात नेमीनाथ आणि पारसनाथ ,सूर्य , आणि आंबा मातेचे अशी अन्य मंदिरे सुद्धा आहेत. ज्यावरील नक्षीकाम खाजुरावो च्या शैलीत केले आहे. आणि ८ व्या शतकात बांधलेल्या सूर्य मंदिरात योद्धे आणि घोड्याची शिल्पे साकारली आहेत.
हे चित्र पाहुन मान काही केल्या खाली करवत नव्हती .
येथील मुख्य पुजार्याने अजून एक महत्वाची माहिती दिली कि मुघल आक्रमणात मंदिरातील प्रमुख मुर्त्या तळघरात लपवून ठेवल्या. पुढे अनेक वर्षानंतर ह्यातील काही मुर्त्या शोधून वर परत प्रस्थपित करण्यात आल्या.
मात्र अनेक मूर्त्यांचा अजून शोध लागला नाही आहे. ह्या तळघरात मुख्य पुजारी ध्यान करतात. त्यांनी पुढे मंदिराच्या उत्तरेला स्थित रायन झाड दाखवले. अत्यंत प्राचीन . ह्या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक अवस्थेत गणेशाचे शिल्प आहे. ते पाहतच माझे हात आपसुकच जोडल्या गेले. ह्या शिवाय संगमरवरी तुकड्यावर ऋषभ देवाचे पायाची चिन्हे दिसून येतात. ह्या दोन मजली मंदिरात अनेक तळघरे आहेत. ती त्याकाळातील भावी परकीय आक्रमणांचा विचार करून हि तळघरे बांधण्यात आली.
गणपती बाप्पा मोरया .( नैसर्गिक स्वरुपात प्रकटलेला गणराया )

रणकपुरात आम्ही रमलो होतो. पण आम्हाला मनावर केम्पात जायचे होते. हा केंम्प भर वाळवंटात उभारला होता. आणि एक राजेशाही अनुभव घेण्य आम्ही आतुर झालो होतो. येथे जवळच रणकपूर चे अभयारण्य होते. पण लवकरच भारतातील प्रसिद्ध रंथांभोर ह्या वाघांच्या गुहेत आम्ही जंगल सफारी करणार होतो. म्हणून तो मोह टाळून मानवर केंपाकडे मार्गस्थ झालो.

वाचने
6300
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! मस्तच.....
मस्त रे धन्यवाद.
मस्त रे निनाद.
छान
व्वा ,बसल्या बसल्या सफर घडवत
खूपच छान!
>>>गणपती बाप्पा मोरया .(
अरे हा भाग घाई घाईत
In reply to >>>गणपती बाप्पा मोरया .( by यकु
यावेळचे फोटो जास्त
वाचतेय
सुंदर.. फुकटची सफर घडवून
निनाद ..फोटोझ कुनि
मस्त ... फटू आवडल्या गेले
अधिक लोभसवाणा किल्ला कोणता ?
मस्त रे निनाद... फोटो मस्त